Marathi govt jobs   »   Study Materials   »   MPSC Shorts | Group B and...

MPSC Shorts | Group B and C | Indian Constitution | भारतीय संविधानातील भाग 1

MPSC Shorts | Group B and C

MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत.  आज या लेखात आपण भारतीय संविधानातील भाग 1 बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन

खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.

MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता MPSC गट ब आणि क परीक्षा
विषय Indian Constitution (भारतीय संविधान)
टॉपिक भारतीय संविधानातील भाग 1
भारतीय संविधानातील भाग 1 चे नाव संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र

संघराज्य म्हणजे काय?

केंद्र व राज्य अशा दोन स्तरांवर वेगळे स्वतंत्र शासन असणे म्हणजे संघराज्य होय. अमेरिकेची राज्यव्यवस्था संघराज्य पद्धतीचे उदाहरण आहे. भारतीय राज्यघटनेत ‘संघात्मक राज्य’ व ‘एकात्मक राज्य’ ही दोन्ही वैशिष्ट्ये आढळून येतात.

भारतीय संविधानाच्या भाग 1 मधील कलमे

कलम 1: इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. India that is Bharat shall be the Union of States.

  • भारताच्या भूभागामध्ये यांचा समावेश असेल-
    •  राज्यांचे प्रदेश;
    • पहिल्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेले केंद्रशासित प्रदेश; आणि
    • अधिग्रहित करता येतील असे इतर प्रदेश.

कलम 2: भारत देशात नवीन राज्यांची स्थापना करणे किंवा नवीन राज्य दाखल करून घेणे.

कलम 3: नवीन राज्यांची निर्मिती करणे, तसेच अस्तित्वात असलेल्या राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नाव बदलणे.

कलम 4: जेव्हा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा बदलण्यासाठी आवश्यक असलेल्या सीमांत, आनुषंगिक आणि परिणामी तरतुदींसाठी कलम 2 किंवा 3 अंतर्गत कायदा लागू केला जातो तेव्हा कलम 4 लागू केला जातो.

तुम्हाला माहित आहे का?

  • सिक्कीम हे एक विशेष प्रकरण होते जे नवीन कलम 2A आणि दहाव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या अटींनुसार पूर्णपणे नवीन प्रकारचे राज्य म्हणून समाविष्ट केले गेले होते आणि त्याला ‘सहयोगी राज्य’ म्हटले गेले होते. परंतु हा प्रयोग अयशस्वी झाला आणि नंतर सिक्कीमला 1975च्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आले.
  • 2019 मध्ये जम्मू- काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कलम 2 नुसार करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MPSC Mahapack
MPSC Mahapack

Sharing is caring!

FAQs

MPSC Shorts | Group B and C म्हणजे काय?

MPSC Shorts | Group B and C मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. 

भारतीय संविधानातील भाग 1 मध्ये किती कलमे आहेत?

भारतीय संविधानातील भाग 1 मध्ये 04 कलमे आहेत.

जम्मू- काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे?

जम्मू- काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कलम 2 नुसार करण्यात आली आहे.