Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण विभाज्यतेच्या कसोट्या बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Reasoning (तर्कशक्ती) |
टॉपिक | विभाज्यतेच्या कसोट्या |
विभाज्यतेच्या कसोट्या
गणित विषयातील बरेचसे प्रश्न सोडविण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या माहिती असणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात आपण विविध अंकांच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत.
अंक | विभाज्यतेची कसोटी | उदाहरण |
2 | जर संख्येच्या शेवटच्या अंकाला 2 ने भाग जात असेल तर | 52, 46, 138, 5694 |
3 | अशा सर्व संख्या ज्यांच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो | 12, 54, 723, 5325 |
4 | जर संख्येचे शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग जात असेल तर | 116, 524, 836 |
5 | शेवटचा अंक (0 आणि 5) असल्यास | 25, 80, 435, 790 |
6 | जर एखाद्या संख्येला 2 आणि 3 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो | 36, 48, 528, 624 |
7 | शेवटचा अंक दुप्पट करा आणि उर्वरित अग्रगण्य संख्येमधून वजा करा. जर निकालाला 7 ने भाग जात असेल तर मूळ संख्येला 7 ने निःशेष भाग जाईल. | 49, 105, 161, 343 |
8 | जर संख्येचे शेवटच्या तीन अंकांना 8 ने भाग जात असेल तर | 1768, 9944,10352 |
9 | अशा सर्व संख्या ज्यांच्या अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो | 81, 189, 324, 7866 |
11 | विषम स्थानी असलेल्या अंकांची बेरीज आणि सम स्थानांमधील अंकांची बेरीज यांचा फरक ‘0’ किंवा 11 चा गुणाकार असेल तर त्या संख्येला 11 ने निःशेष भाग जाईल. | 616, 1056, 1573 |
तुम्हाला माहित आहे का?
- a ला जर b ने भाग जात असेल, तर ac ला देखील b ने भाग जाईल.
- a ला जर b ने भाग जात असेल, आणि b ला c ने भाग जात असेल, तर a हा c ने निःशेष भाग जाईल.
- जर n ला d ने भाग जात असेल आणि m ला d ने भाग जात असेल तर (m + n) आणि (m-n) हे दोन्ही d ने निःशेष भाग जातील. याचा एक महत्त्वाचा अर्थ आहे. समजा 48 आणि 528 हे दोन्ही 8 ने निःशेष भाग जात आहेत. तर (528 + 48) तसेच (528 – 48) यांना 8 ने भाग जातो.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.