Table of Contents
MPSC Shorts | Group B and C
MPSC Shorts | Group B and C: MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जर MPSC कॅलेंडर 2024 पाहिले असेल, तर आपल्याला माहितच असेल कि लवकरच MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा अधिसुचना 2024 जाहीर होणार आहे. त्यात भरपूर जागा असणार आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असेल. MPSC दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे Adda247 आपल्यासाठी घेऊन येत आहेत MPSC Shorts | Group B and C. या मध्ये रोज आपल्याला परीक्षेच्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. आज या लेखात आपण वनस्पतींचे वर्गीकरण बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन
खालील तक्त्यात संक्षिप्त रुपात आपल्याला MPSC Shorts | Group B and C चे विहंगावलोकन मिळेल.
MPSC Shorts | Group B and C: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | MPSC गट ब आणि क परीक्षा |
विषय | Science (विज्ञान) |
टॉपिक | वनस्पतींचे वर्गीकरण |
वनस्पतींचे वर्गीकरण
सृष्टी : वनस्पती
- पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला ‘वनस्पती’ म्हणून ओळखले जाते.
- वनस्पती हरितद्रव्यांच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत.
- वनस्पतीशास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पतीसृष्टीचे दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला गेला.
अबीजपत्री वनस्पती :
1.थॅलोफायटा (Thallophyta)
- या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात.
- मूळ-खोड-पाने-फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या, हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल (Algae) म्हणतात.
- एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात.
- उदा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम, इत्यादी. यातील काही वनस्पती गोड्या तर काही खारट पाण्यात आढळतात.
- या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतूरूपी असते.
- ह्याच गटात हरीतद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो, त्यास कवके (Fungi) असे म्हणतात.
(थॅलोफायटा वनस्पती)
2. ब्रायोफायटा (Bryophyta)
- ह्या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात.
- त्या निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात.
- यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते.
- ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते.
- या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.
- पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात.
- उदा. मॉस (फ्युनारिआ), मर्केशिया, रिक्सिया, इत्यादी.
(ब्रायोफायटा वनस्पती)
3. टेरिडोफायटा (Pteridophyta)
- या वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात, पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात.
- यांना फुले फळे येत नाहीत.
- त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते.
- उदा., फर्न्स नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया, – टेरीस, एडीअँटम, इक्विसेटम, लायकोपोडियम, इत्यादी.
- या वनस्पतींमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते.
(टेरिडोफायटा वनस्पती)
बीजपत्री वनस्पती :
ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजतांना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो. बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे ह्या वैशिष्ट्यांवरून बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग आहेत.
1. अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)
- अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक असतात.
- या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात.
- पानांचा मुकुट तयार झालेला असतो.
- या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात.
- यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos – न झाकलेले/अनावृत्त, Sperm- बीज.
- उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.
(अनावृत्तबीजी वनस्पती)
2.आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)
- या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत.
- फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात.
- या बियांवर आवरण असते.
- Angios – Cover म्हणजे आवरण, sperm – बी.
- ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात, तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.
तुम्हाला माहित आहे का?
- जगभरातील टेरिडोफाइट्स, हे फर्न, स्पाइकमॉस आणि हॉर्सटेल सारख्या वनस्पती आहेत. त्यांची पाने फ्रॉन्ड्स म्हणून ओळखली जातात. ते जंगलात वाढणारी छोटी रोपे असू शकतात किंवा खोडांसह उंच झाडाचे फर्न असू शकतात.
- आपल्या ग्रहावर ब्रायोफाईट्सच्या 20,000 हून अधिक नावाच्या प्रजाती राहतात. ते बीजाणू सोडवून पुनरुत्पादन करतात. ते जगभरातील इकोसिस्टमसाठी महत्त्वपूर्ण आहेत. उदाहरणार्थ, स्फॅग्नम मॉस माती निरोगी, ओलसर आणि पोषक ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे इतर वनस्पती वाढू शकतात.
- जर तुम्ही बाहेर एखादी वनस्पती पाहत असाल तर ते कदाचित एंजियोस्पर्म आहे. ते जमिनीवरील वनस्पतींचे सर्वात वैविध्यपूर्ण गट आहेत: 300,000 हून अधिक ज्ञात प्रजाती आहेत!
- फुलांच्या रोपट्यांचा ताबा घेण्यापूर्वी जिम्नोस्पर्म्सने पृथ्वीवरील जीवनावर वर्चस्व गाजवले. डायनासोरच्या वयात तुम्ही आजूबाजूला कोनिफरसारखे बरेच जिम्नोस्पर्म पाहिले असतील. जगातील सर्वात मोठी झाडे म्हणजे जायंट सेकोइया सारखी जिम्नोस्पर्म्स.
- सीव्हीड आणि केल्प ही वनस्पती नाहीत! ते एकपेशीय वनस्पती आहेत. शतकानुशतके वनस्पतींच्या वर्गीकरणात शैवालचा समावेश होता.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.