Marathi govt jobs   »   Maharashtra State GK Quiz

Maharashtra State GK Quiz

Maharashtra State GK Quiz_2.1

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता .महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

MAHARASHTRA STATE GK QUIZ

Q1. लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्हयात कोणत्या तालुक्‍यात आहे?
(a) लांजा
(b) चिपळूण
(c) खेड
(d) दापोली

Q2. खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे.
(a) पवना – पारस
(b) जामखंडे – कोयना
(c) जामखंडे – चाळकेवाडी
(d) चाळकेवाडी – डहाणू

Q3. महाराष्ट्राचे पहिल इलेक्ट्रॉनिक वेस्ट युनिट इको रिसायकलिंग लिमिटेड सुरू झाले आहे. त्याबाबत काय खरे नाही?
(a) ते अंधेरी येथे मुंबईत स्थित आहे.
(b) ते आपल्या घरी /कार्यालयात त्यांची पिक अप व्हॅन पाठवून ई-कचरा गोळा करतात मग ते कॉम्प्युटर
असो वा टिव्ही/सेल फोन.
(c) ते गोळा व्हायला आपल्याला फक्‍त www.elecwasnit.com वर कळवायला लागते.
(d) ई-कचरा सरते शेवटी बेल्जियमला धातू काढण्यास्तव पाठविले जाते.

Q4. खालील विधाने पहा :
1. वरोरा तालुक्‍यातील पिंपळगाव टेकडी येथे लोहखनिज सापडते.
2. रेडी बंदरातून दगडी कोळसा निर्यात केला जातो.
3. भारताच्या एकूण मँगनीज साठ्यापैकी 60% साठा महाराष्ट्रात आहे.
पर्यायी उत्तरे :
(a) फक्त विधान 1 बरोबर आहे.
(b) फक्त विधान 2 बरोबर आहे.
(c) विधाने 1 आणि 2 बरोबर आहेत.
(d) विधाने 2 आणि 3 बरोबर आहेत.

Q5. जेव्हा दगड निळा दिसतो त्या काय दडले असण्याची शक्‍यता असते?
(a) हीरे
(b) सोने
(c) चांदी
(d) तांबे

Q6. कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काडया बनविण्यास वापरले जाते?
(a) सागवान
(b) साल

(c) पॉपलर
(d) निलगिरी

Q7. खालीलपैकी कोणते विधान/विधाने चूक किंवा बरोबर आहे/ आहेत?
1. राज्यवार राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये राजस्थान व तामीळनाडू पेक्षा जास्त आहे.
2. राज्यवार राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये गुजरात व कर्नाटक पेक्षा कमी आहे.
पर्यायी उत्तरे :
(a) 1 व 2 बरोबर
(b) 1 बरोबर 2 चूक
(c) 1 चूक 2 बरोबर
(d) 1 व 2 चूक

Q8. खालीलपैकी कुठली धार्मिक/सांस्कृतिक प्रेक्षणीय स्थळे पुणे जिल्हयात नाहीत?
1. महादजी शिंदे छत्री
2. चतुःश्रृंगी
3. तळयातला गणपती
4. शनिवार वाडा
5. कसबा गणपती
पर्यायी उत्तरे :
(a) 2 आणि 3
(b) 2 आणि 4
(c) 3 आणि 1
(d) वरील पैकी कुठेलच नाही

Q9. वैद्यकीय सोयी-सुविधांच्या विकासामुळे प्रसिद्धीस आलेले परंतू सध्या जेथे वैद्यकीय उपकरणे व स्टील फर्निचरचे उत्पादन केले जाते असे शहर?
(a) मिरज.
(b) औरंगाबाद
(c) सांगली.
(d) वरीलपैकी कोणतेही नाही

Q10. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गवर धुळे वसलेले आहे?
(a) NH1
(b) NH3
(c) NH7
(d) NH10

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

S1. Ans.(c)
Sol. विश्लेषण

(c). लोटेमाळ – तालुका – खेड, जिल्हा – रत्नागिरी
येथे एमआयडीसी क्षेत्र आहे
लोटेमाळ हे रसायन उद्योगासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे
(a) लांजा (रत्नागिरी) – काजूप्रकिया उद्योग प्रसिद्ध आहे. येथे हवामानाचे वैविध्य आढळते.
(b) चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध शहर.
(d) दापोली – थंड हवेमुळे मिनी महाबळेश्वर म्हणतात. येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे.

S2. Ans.(c)
Sol. विश्लेषण
पवनऊर्जा मानव शेकडो वर्षांपासून वापरत आहे.
पवनऊर्जेसाठी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असावा.
पवनऊर्जा : वनकुसवडे, ठोसेघर, चाळकेवाडी (सर्व – सातारा), गुढेपाचगणी, ढालगाव (सर्व सांगली), कवड्या डोंगर (अहमदनगर).

S3. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
भारतचा पहिला ईवेस्ट इको रिसायकलिग प्रोजेक्ट बंगलोरमध्ये भारत सरकारमार्फत सुरु करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे देशातील घनकचरा निर्मितीमधील प्रथम क्रमांकावर आहे.
महाराष्ट्र दरदिवशी 26,820 टन घनकचरा निर्माण करतो.
ई-वेस्ट निर्माण करणारी शहरे :
1. मुंबई – 1,20,000 टन वार्षिक
2. दिल्ली – 98000 टन वार्षिक
3.बंगलोर – 92000 टन वार्षिक
जगात सर्वात जास्त ई वेस्ट प्रोजेक्ट :
1. युरोपियन युनियन – 445
2. चीन – 150
3. युएसए – 86

S4. Ans.(a)
Sol. विश्लेषण :
रेडी बंदर : रेडी बंदर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून येथून लोहाची निर्यात केली जाते.
रेडी बंदरात – बुटक्या टेकड्यात – दोन किमी पर्यंत लोहखनिज साठे आढळतात.
बंदरातील लोहखनिज – हेमेटाईट – क्कार्टझाइटसोबत आढळते.

रेड्डी बंदरातील लोहखनिज धारवाड संघातील आहे.
जांभा खडकाच्या थरात 50 टक्‍क्‍यांपर्यंत लोहखनिज आढळते.

S5. Ans.(d)
Sol. विश्लेषण:
तांबे : तांबे हा उत्तम विद्युतवाहक असून रासायनिक प्रक्रियेमुळे तो झिजत नाही.
तांबे हे सल्फाईड ऑक्साईड किंवा कार्बोनेट इत्यादी रासायनिक पदार्थांच्या खडकात मिश्र स्वरूपात आढळते.
दगड/खडक त्यांच्यातील असलेल्या खनिजाप्रमाणे वेगवेगळे रंग धारण करतात. पृष्ठभागावर असलेल्या हवामानाच्या कारणाने तांबे समृद्ध असलेला खडक निळ्या-हिरव्या रंगाचे होऊ शकतात.
जर भरपूर कार्बोनेट उपलब्ध असेल तर , Azurite(निळा), किंवा Malachite(हिरवा) सारखे खनिजे बनू शकतात.
अग्निज खडकात तांबे सहसा चालकोपायराईट या खनिज स्वरूपात आढळते.

S6. Ans.(c)
Sol. विश्लेषण :
आगपेटी उद्योग : आगपेटी उद्योग हा वनावर आधारित उद्योग आहे. यासाठी कच्चा माल म्हणून मुख्यत: मृदू लाकडाचा वापर केला जातो
1924 मध्ये बरेली, कोलकाता, अंबरनाथ येथे आगपेटी कारखाना सुरूवात करण्यात आले.
भारतात 'पश्‍चिम बंगाल व तमिळनाडू राज्यांत आगपेटी उद्योगाचा अधिक विकास झालेला आहे.
पॉपलर व तेलम या झाडाचे लाकूड आगपेट्या काड्या बनविण्यासाठी वापरतात.
महाराष्ट्रतील आगपेटी चे कारखाने:-
1) अंबरनाथ 2) पुणे 3) चंद्रपूर 4) मुंबई

S7. Ans.(b)
Sol. विश्लेषण :
महाराष्ट्रात 3.37 लाख किमी लांबीच्या रस्त्यांच्या विकासाचे उद्दीष्ट ठेवून रस्ते विकास आराखडा 2001- 2021  केला आहे.
2015-16 नुसार 300789 किमी रस्ते महाराष्ट्रामध्ये आहे.

 

S8. Ans.(d)
Sol. विश्लेषण
पुणे (प्रेक्षणीय स्थळे) :
मुठा नदीच्या तीरावर वसलेले महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर. .
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणुन ओळख.
सांस्कृतिक ठिकाण/स्थळे : शनिवारवाडा, लालमहाल, शिंदे छत्री, आगाखान पॅलेस, सिंहगड किल्ला.
राजा दिनकर केळकर संग्रहालय
महात्मा फुले औद्योगिक संग्रहालय
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय

कसबा गणपती, दगडुशेठ गणपती, चतुःश्रृंगी, तळ्यातला चिंतामणी गणपती इत्यादी ठिकाणे प्रसिध्द आहेत.

S9. Ans.(a)
Sol. विश्लेषण : मिरज:
सांगली जिल्ह्यातील तालुका. सांगली-मीरज अँड कुपवाड मुनिसिपल कॉर्पोरेशन आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध.
किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खान व विष्णु दिगंबर पळुसकर येथेच तयार झाले.
संगीत वाद्यासाठी प्रसिद्ध – सितार, सरोद, तानपुरा यासारखे वाद्य तयार होतात.
वैद्यकीय सोईसाठी प्रसिद्ध. येथे कर्नाटक व अरब देशातून रुग्ण उपचारांसाठी येतात.
औरंगाबाद :
वेरूळ, अजिंठा लेण्यांसाठी प्रसिद्ध
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश आहे.
मलिक अंबरने 1610 मध्ये स्थापन केले.
मूळ नाव – खडकी. देवगिरी किल्ला प्रसिद्ध.
मश्रू आणि हिग्रू शालीसाठी प्रसिद्ध.
दौलताबादमधील सीताफळे प्रसिद्ध.
सांगली :
हळदीचे शहर म्हणून प्रसिद्ध
कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर आहे.
सागरेश्वर अभयारण्य – देवराष्ट्रे हणणांसाठी प्रसिद्ध (खानापूर) मीरज हा सांगली जिल्ह्यातील तालुका.
ब्रम्हनाळ – कृष्णा -येरळा संगम
हरिपूर-कृष्णा-वेण्णा संगम.

S10. Ans.(b)
Sol. विश्लेषण
राष्ट्रीय महामार्ग: 1951 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 30,000 किमी लांबीचे एकूण रस्त होते. तीच लांबी 2011-12 मध्ये 2,42,919 km झाली.
1951मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची लांबी 2,216 किमी होती तर 31मार्च 2015 मध्ये 4766 किमी लांबीची झाली.
राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात सुरू होणारे व महाराष्ट्रात बंद होणारे महामार्ग :
1. पळस्पे-न्हावाशेवा – 4B-(27km)
2. न्हावाशेवा-कळबोली – 4C-(7km)
3. रत्नागिरी – कोल्हापुर – 204-(126km)
4. पुणे नाशिक – 50-(192km)
5. सोलापुर धुळे – 211-(400km)
6. सिन्नर – अहमदनगर – 160-(180km)

महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्र.6 (813km) आहे तर भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्र.7 (2369km) आहे.

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!