Marathi govt jobs   »   Maharashtra Police Bharti Physical Requirement Criteria   »   महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रियेला...

महाराष्ट्र पोलीस भरती 2024, 17471 पदांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रियेला सुरुवात

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: दिनांक 05 मार्च 2024 पासून महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 असणार आहे. महाराष्ट्र शासन गृह विभागाने, दि. 01 मार्च 2024 रोजी पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यांतील एकूण 17471 पदांसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार यासाठी दिनांक 05 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रीये बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी अधिसुचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे विहंगावलोकन खाली तक्त्यात पाहू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्र शासन, गृह विभाग
भरतीचे नाव

महाराष्ट्र पोलीस भरती 2024

पदाचे नावे
  • पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई चालक
  • कारागृह शिपाई
  • सशस्त्र पोलीस शिपाई
  • पोलीस शिपाई बँड्समन
रिक्त पदे 17471
अधिकृत संकेतस्थळ https://www.mahapolice.gov.in/

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: अधिसुचना 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (मुंबई पोलीस)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (हिंगोली)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना PDF (SRPF कुसडगाव, दौंड कॅम्प)

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसूचना 01 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 05 मार्च 2024
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 05 मार्च 2024 रोजी सक्रीय झाली आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय)

टीप: सर्व्हर डाऊन असल्यामुळे वेबसाईट लोड होण्यास उशीर होऊ शकतो. कृपया पुन्हा प्रयत्न करा.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज करण्याच्या पायऱ्या

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी अर्ज करण्याच्या पायऱ्या खाली दिल्या आहेत.

पायरी 1: सर्व प्रथम वर दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024, 17471 पदांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात_3.1

पायरी 2: त्यावर गेल्यावर नवीन नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.

पायरी 3: नोंदणी झाल्यावर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल. तो टाकून लॉग इन करा.

पायरी 4: अर्जातील माहिती नीट वाचून अर्ज पूर्णपणे भरा.

पायरी 5: शुल्काचा भरणा करा.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज शुल्क

अ.क्र. पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
1. पोलीस शिपाई रु. 450/- रु. 350/-
2. पोलीस शिपाई चालक रु. 450/- रु. 350/-
3. कारागृह शिपाई रु. 450/- रु. 350/-
4. सशस्त्र पोलीस शिपाई रु. 450/- रु. 350/-
5. पोलीस शिपाई बँड्समन रु. 450/- रु. 350/-

 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024शी संबंधित इतर लेख

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कधी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना 01 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना कोणत्या पदांसाठी जाहीर झाली?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अधिसुचना पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी जाहीर झाली

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे का?

होय, 05 मार्च 2024 पासून महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.