Table of Contents
महाज्योती UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण अर्ज 2023-24
महाज्योती UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण अर्ज 2023-24: महाज्योतीने UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणसाठी प्रशिक्षण संस्था निवड करण्याकरिता ऑनलाईन अर्ज प्रणाली चालू केली आहे. महाज्योतीतर्फे एकूण 1750 विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी महाज्योतीने UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षा घेतलेली असून त्याची निवडयादी लवकरच जाहीर केली जाईल. या लेखात महाज्योती UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणसाठी प्रशिक्षण संस्था निवड अर्ज 2023-24 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
महाज्योती UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण अर्ज 2023-24: विहंगावलोकन
महाज्योती UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण अर्ज 2023-24: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
भरती मंडळ | महाज्योती |
लेखाचे नाव | महाज्योती UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण अर्ज 2023-24 |
परिक्षेचे नाव | UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण |
प्रशिक्षणसाठी निवडण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या | 1750 |
संकेतस्थळ | https://mahajyoti.org.in/en/home/ |
महाज्योती UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण संस्था निवड अर्ज लिंक 2023-24
महाज्योतीने UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणसाठी प्रशिक्षण संस्था निवड करण्याकरिता ऑनलाईन अर्ज प्रणाली चालू केली आहे. त्यासंदर्भातील लिंक त्यांनी सक्रीय केली आहे. उमेदवार खालील लिंक वर जाऊन प्रशिक्षण संस्था निवड अर्ज भरू शकतात.
महाज्योती UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण संस्था निवड अर्ज लिंक 2023-24
प्रशिक्षण संस्था निवड कार्यपद्धती
महाज्योतीने UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणसाठी प्रशिक्षण संस्था निवड करण्याकरिता कार्यपद्धती जारी केली आहे. उमेदवार कार्यपद्धती खाली तपासू शकतात:-
1. सर्वप्रथम 1000 + 750 = अशा 1750 विद्यार्थ्यांची मेरीट नूसार प्रवर्ग निहाय व समांतर आरक्षण निहाय यादी लावण्यात येईल.
2. विद्यार्थ्यांना दिल्ली येथे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे की महाराष्ट्रातील पुणे येथे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे हे निवड करण्या करीता पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यार्थी योग्य पर्यायाचा निवड करुन प्रशिक्षण ठिकाणाची निवड करु शकतील.
3. जे विद्यार्थी पुणे येथे प्रशिक्षण घेण्यास तयार होतील त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातुन किंवा मराठी माध्यमातुन प्रशिक्षण घ्यावयाचे आहे याबाबत निवड करण्याचा देखील पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना दिल्ली अथवा पुणे येथील प्रशिक्षण केंद्र ठरवुन देत असताना विद्यार्थ्यांने प्राप्त केलेले गुण व त्याने दिलेला पर्याय याचा विचार करुन उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या पर्यायाला प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणाकरीता पसंती क्रम दिलेला असेल तथापि जागा पूर्ण झाल्यामुळे त्यांना त्या प्रशिक्षणाचे ठिकाण देता येणे शक्य नसेल अशाप्रकरणी त्यांना उपलब्ध असणाऱ्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी प्रशिक्षणाकरीता पाठविले जाईल. जे विद्यार्थी कोणताही पर्याय देणार नाही अश्या विद्यार्थ्यांना उपलब्ध उर्वरीत जागा विचारात घेऊन महाज्योती व्दारे प्रशिक्षणाचे ठिकाण ठरवुन दिल्या जाईल.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.