Marathi govt jobs   »   Study Materials   »   समास

समास, अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

समास

समास: अन्न व नागरी पुरवठा विभाग भरतीसाठी मराठी विषयाचे अभ्यास साहित्य या लेख मालिकेत मिळतील. अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती 2023 परीक्षेत मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात समास व त्याच्या सर्व प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.

समास

समास: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव समास
लेखातील प्रमुख मुद्दे
  • समास
  • समासाचे प्रकार
  • नमुना प्रश्न

समास

समास: बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून अर्थपूर्ण एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. (जसे वडाघालून तयार केलेला पाव असे न म्हणता वडापाव) यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

समासाचे प्रकार

समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.

  1. अव्ययीभाव समास
  2. तत्पुरुष समास
  3. व्दंव्द समास
  4. बहुव्रीही समास

1. अव्ययीभाव समास: ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. उदा. आजन्म

2. तत्पुरुष समास: ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात. उदा. तोंडपाठ – तोंडाने पाठ

तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

2a. विभक्ती तत्पुरुष: ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्‍या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. तोंडापाठ – तोंडाने पाठ (तृतीया विभक्ती)

2b. अलुक तत्पुरुष:  ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणारा. उदा. अग्रेसर

2c. उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष:  ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात. उदा. शेतकरी – शेती करणारा.

2d. नत्र तत्पुरुष समास: ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.) अयोग्य, अज्ञान

2e. कर्मधारय तत्पुरुष समास: ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात. उदा. महादेव – महान असा देव

2f. व्दिगू समास: ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात. उदा. नवरात्र – नऊ रात्रींचा समूह

2g. मध्यमपदलोपी समास: ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्‍यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारेय समास असेही म्हणतात. उदा. साखरभात – साखर घालून केलेला भात

3. व्दंव्द समास: ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.

3a. इतरेतर व्दंव्द समास: ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समासअसे म्हणतात. उदा. हरिहर – हरि आणि हर

3b. वैकल्पिक व्दंव्द समास:  ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यासवैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. तीनचार – तीन किवा चार

3c. समाहार व्दंव्द समास: ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात. उदा. मीठभाकर – मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी

4. बहुव्रीही समास: ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

4a. विभक्ती बहुव्रीही समास: ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्यालाविभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. उदा. प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती

4b. नत्र बहुव्रीही समास: ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. उदा. अनंत – नाही अंत ज्याला तो

4c. सहबहुव्रीही समास: ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. उदा. सानंद – आनंदाने सहित असा जो

समास: नमुना प्रश्न 

प्रश्न 1. आमरण या शब्दात कोणता समास आहे?

(a) तत्पुरुष समास

(b) बहुव्रीही समास

(c) अव्ययीभाव समास

(d) द्वंद्व समास

उत्तर- (c)

प्रश्न 2. द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता?

(a) दोनदा जन्मणारा

(b) दोनदा मरणारा

(c) दोनदा वाचवणारा

(d) या पैकी नाही

उत्तर- (a)

प्रश्न 3. दशानन या शब्दात कोणता समास आहे?

(a) तत्पुरुष समास

(b) बहुव्रीही समास

(c) अव्ययीभाव समास

(d) द्वंद्व समास

उत्तर- (b)

प्रश्न 4. पंचपाळे या शब्दात कोणता समास आहे?

(a) तत्पुरुष समास

(b) द्विगु समास

(c) अव्ययीभाव समास

(d) द्वंद्व समास

उत्तर- (b)

प्रश्न 5. बहिणभाऊ या शब्दात कोणता समास आहे?

(a) समाहार द्वंद्व समास

(b) वैकल्पिक द्वंद्व समास

(c) इतरेतर द्वंद्व समास

(d) मध्यमपद लोपी समास

उत्तर- (c)

प्रश्न 6. बाजारहाट या शब्दात कोणता समास आहे?

(a) समाहार द्वंद्व समास

(b) वैकल्पिक द्वंद्व समास

(c) इतरेतर द्वंद्व समास

(d) मध्यमपद लोपी समास

उत्तर- (a)

प्रश्न 7. छोट्यामोठ्या या शब्दात कोणता समास आहे?

(a) समाहार द्वंद्व समास

(b) वैकल्पिक द्वंद्व समास

(c) इतरेतर द्वंद्व समास

(d) मध्यमपद लोपी समास

उत्तर- (b)

प्रश्न 8. नवरात्र या शब्दात कोणता समास आहे?

(a) तत्पुरुष समास

(b) द्विगु समास

(c) अव्ययीभाव समास

(d) द्वंद्व समास

उत्तर- (b)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

समास बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

समास बद्दल माहिती या लेखात दिली आहे.

मराठीत समासाचे किती प्रमुख प्रकार पडतात?

मराठीत समासाचे 4 प्रमुख प्रकार पडतात