Marathi govt jobs   »   Study Materials   »   महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, 2015 म्हणूनही ओळखला जातो. हा कायदा राज्य सरकारने नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सेवा पुरविण्याची तरतूद करतो. या लेखात, तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या PDF बद्दल तपशीलवार माहिती मिळेल.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015: विहंगावलोकन

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग आयुक्त  श्री. मनु कुमार श्रीवास्तव

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015: महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (General Studies) हा खूप महत्वाचा विषय आहे. जर आपण अन्न व नागरी पुरवठा परीक्षेची तयारी करत असाल तर आपणास माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे दोन अधिनियम खूप महत्वाचे आहेत असे लक्षात येईल. आज या लेखात आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याबद्दल माहिती पाहणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विहित सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना इच्छित सेवेसाठी अर्ज करणे, शुल्क भरणा, अर्जाचा मागोवा घेणे आदी बाबी घरबसल्या करता येणार आहेत. सेवा प्राप्त करतानाच्या एकंदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास हेल्पलाईनद्वारे सहाय्यही उपलब्ध आहे.

सेवा हमी अधिनियमांतर्गत 224 सेवांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी आवश्‍यक 46 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभाग, महसूल, पाणीपुरवठा, वन विभाग, मुद्रांक आणि नोंदणी आणि कामगार विभागांच्या सेवांचा समावेश आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग: महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015. या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. श्री. मनु कुमार श्रीवास्तव हे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत.

या कायद्यांतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण आर.टी.एस. महाराष्ट्र या मोबाईल अँप वर किंवा आपले सरकार वेब पोर्टल वर पाहू शकता व सेवा प्राप्त करण्याकरिता ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम अपील, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.

वैशिष्ट्ये

वैशिष्ट्ये: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार नागरिकांना घरबसल्या सेवांचा लाभ घेता येतो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

  • जलद सेवा: लोकसेवा मिळवण्याची प्रक्रिया झाली जलद. दिलेल्या कालावधीत अधिसूचित सेवा मिळण्याची हमी. विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी.
  • सेवा आपल्या दारात: लोकसेवा प्राप्त करण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घर बसल्या ‘आपले सरकार’ पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा.
  • सहज पोहोच: विविध विभागांच्या सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध. अपीलही ऑन-लाईन करता येणार.
  • सोपी शुल्कभरणा: सेवा शुल्क अत्यंत सोप्या व सुरक्षित पद्धतीने पोर्टल द्वारे जमा करण्याची सुविधा.
  • वापरण्यास सोपे: माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण केलेली वापरण्यास सोपी कार्यपद्धती. अर्ज करणे, कागदपत्र जोडणे, अर्जाचा मागोवा घेणे सोपे.
  • वेळेची बचत:  कमीत कमी कागदपत्रांसह ऑन-लाईन अर्ज करण्याच्या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत. पाठपुराव्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन सेवा

ऑनलाईन सेवा: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विविध सेवा पुरवल्या जातात. त्या सर्व सेवांची नावे व त्यांच्याशी संबंधित विभाग खाली दिले आहेत. ज्याचा आगामी परीक्षेत आपणास नक्कीच फायदा होईल.

The Maharashtra State Commission For Right To Public Services | महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग
आपले सरकार पोर्टल

महसूल विभाग

  • वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
  • मिळकतीचे प्रमाणपत्र
  • तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
  • जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र
  • पत दाखला
  • सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
  • प्रमाणित नक्कल मिळणेबाबत अर्ज
  • अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
  • भूमिहीन प्रमाणपत्र
  • शेतकरी असल्याचा दाखला
  • सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
  • डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र

ग्रामविकास व पंचायत राज विभाग

  • जन्म नोंद दाखला
  • मृत्यु नोंद दाखला
  • विवाह नोंदणी दाखला
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
  • हयातीचा दाखला
  • ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
  • निराधार असल्याचा दाखला
  • शौचालयाचा दाखला
  • विधवा असल्याचा दाखला

कामगार विभाग

  • दुकाने आणि अस्थापना नोंदणी
  • दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
  • कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
  • कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
  • कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण

जलसंपदा विभाग

  • जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून घरगुती (पिण्याचे पाणी)प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत
  • जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून औद्योगिक प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत

शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय

  • भाग 2- राजपत्र जाहिरात (नावात बदल)
  • भाग 2- राजपत्र जाहिरात (जन्मतारखेत बदल)
  • भाग 2- राजपत्र जाहिरात (धर्मात बदल)
  • भाग 2- संकीर्ण

कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग

  • नोकरी उत्‍सुक उमेदवारांची नोंदणी
  • सेवानियोजकाची नोंदणी

वन विभाग

  • तेंदू व्यापारी/उत्पादकांची नोंदणी
  • बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची नोंदणी
  • वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई
  • वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य
  • वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई
  • पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर)
  • पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल)
  • आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्णय कळविणे
  • सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे
  • सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 नुसार बिगर आदिवासी अर्जदारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे

नोंदणी व मुद्रांक विभाग

  • शोध उपलब्ध करणे
  • मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
  • दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015: PDF

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015: PDF: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 pdf स्वरुपात डाउनलोड करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 PDF

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015: नमुना प्रश्न

प्रश्न 1. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विहित सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील ______ राज्य ठरले आहे.

(a) दुसरे

(b) तिसरे

(c) पहिले

(d) पाचवे

उत्तर (c)

प्रश्न 2. _________ हे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत.

(a) श्री. दीपक शिंदे

(b) श्री. मनु कुमार श्रीवास्तव

(c) श्री. मनु कुमार शर्मा

(d) श्री. मनु कुमार पांडे

उत्तर (b)

प्रश्न 3. ऑनलाइन सेवा कोणत्या पोर्टलद्वारे उपलब्ध करण्यात आल्या आहेत?

(a) आपले सरकार

(b) महाराष्ट्र सरकार

(c) तुमचे सरकार

(d) माझे सरकार

उत्तर (a)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Maharashtra Mahapack
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विहित सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले आहे?

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विहित सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

कोण राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत?

श्री. मनु कुमार श्रीवास्तव हे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत.