Table of Contents
अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी जाहीर केले आहे. सदर कागदपत्र पडताळणी 23/01/2024 ते 31/01/2024 रोजी होणार आहे. महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय निकाल 2024 जाहीर केला होता. आज या लेखात आपण अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन
अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | अर्थ व सांख्यिकी संचालनालय (DES), नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, भारत |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 |
पदांची नावे | सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब, सांख्यिकी सहाय्यक गट क, आणि अन्वेषक गट क |
एकूण रिक्त पदे |
260 |
महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षेची तारीख 2023 | 19 व 20 ऑक्टोबर 2023 |
अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 PDF
दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 मधील पात्र उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीचे आयोजन केले आहे. दिनांक 23 ते 31 जानेवारी 2024 रोजी कागदपत्र पडताळणी होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 PDF डाउनलोड करू शकतात.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2024 PDF
कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता
पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी अर्थ व सांख्यिकी संचलनालय, 8वा मजला प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051 येथे उपस्थित रहावे.
कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना
- ज्या उमेदवारांना एका पेक्षा अधिक पदांसाठी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्यात आले असेल त्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाच्या छायाप्रती व त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीच्या प्रथम दिनांकाच्या वेळी घेवून यावीत. अशा उमेदवारांची सर्व पदांसाठीची प्रमाणपत्रे / कागदपत्रांची पडताळणी एकाच वेळी करण्यात येईल.
- एका पेक्षा अधिक पदांसाठी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराने आवश्यक त्या प्रत्येक पदासाठीच्या प्रमाणपत्रे / कागदपत्रांच्या साक्षांकित सत्य प्रतीचा स्वतंत्र संच ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसोबत जोडावा.
- उमेदवारांनी ओळख पटविण्यासाठी स्वतः चे छायाचित्र असणारे वैध ओळखपत्र सोबत आणावे.
-
प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहणा-या उमेदवारांचा बायोमेट्रिक डाटा (अंगठ्याचा ठसा तपासला जाणार असल्याने जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
-
प्रमाणपत्रे / कागदपत्रांच्या वैधतेच्या अधिन राहून उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करण्यात येईल व ती संचालनालयाच्या http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.