Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Indore: India’s first Water Plus certified...

Indore: India’s first ‘Water Plus’ certified city | इंदूर: भारतातील पहिले ‘वॉटर प्लस’ प्रमाणित शहर

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

इंदूर: भारतातील पहिले ‘वॉटर प्लस’ प्रमाणित शहर

स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशातील पहिले ‘वॉटर प्लस’ प्रमाणित शहर होण्याचा मान मध्य प्रदेश राज्यातील इंदूर ला मिळालेला आहे. भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूर च्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. आपल्या प्रशासनाद्वारे नद्या आणि नाल्यांमध्ये स्वच्छता राखणाऱ्या शहराला वॉटर प्लस सिटी प्रमाणपत्र दिले जाते. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रदान केलेल्या प्रोटोकॉल आणि टूलकिट नुसार, घरांमधून, व्यावसायिक आस्थापनांमधून सोडलेले सर्व सांडपाणी समाधानकारक पातळीवर प्रक्रिया करूनच पर्यावरणात सोडले असेल तर शहराला वॉटर प्लस म्हणून घोषित केले जाऊ शकते. इंदूर शहरातील 30 टक्के सांडपाणी योग्य प्रक्रिया करून बगीचे, बांधकाम इत्यादी ठिकाणी वापरले जाते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री: शिवराज सिंह चौहान
  • मध्य प्रदेशचे राज्यपाल: मंगूभाई छगनभाई पटेल

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!