Marathi govt jobs   »   India ranked 20th in Global Startup...

India ranked 20th in Global Startup Ecosystem Index 2021 I ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021 मध्ये भारत 20व्या क्रमांकावर

India ranked 20th in Global Startup Ecosystem Index 2021 I ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021 मध्ये भारत 20व्या क्रमांकावर_2.1

 

ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021 मध्ये भारत 20व्या क्रमांकावर

स्टार्टअप ब्किंक ने प्रकाशित केलेल्या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021 (जागतिक नवउद्योग परिसंस्था निर्देशांक) मध्ये 100 देशांच्या यादीत भारत 20 व्या क्रमांकावर आहे. 2019 साली भारत 17 व्या क्रमांकावर आणि 2020 साली 23व्या क्रमांकावर होता. या अहवालाच्या म्हणण्यानुसार भारताने आपली नवउद्योग परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी पायाभूत सुविधा व इंटरनेटचा वेग अधिक चांगला  करण्याची आवश्यकता आहे.

 शहरांचा विचार केल्यास पहिल्या 1000 शहरांमध्ये भारतातील 43 शहरे आहेत आणि त्यातील बेंगळुरू (10 वे), नवी दिल्ली (14 वे), मुंबई (16 वे) ही शहरे पहिल्या 20 शहरांमध्ये आहेत.

देशांचा विचार केल्यास गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही अमेरिका, ब्रिटन, इस्त्राईल, कॅनडा आणि जर्मनी पहिल्या पाच स्थानांवर आहेत.

अहवालात प्रत्येक स्थानासाठी गुण आहेत जे तीन मापदंडांच्या साहय्याने ठरविले जातात, ते म्हणजे संख्या, गुणवत्ता आणि व्यवसाय वातावरण.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!