माजी केंद्रीय मंत्री श्री चमन लाल गुप्ता यांचे निधन
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री चमन लाल गुप्ता यांचे निधन झाले आहे. 1972 मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेचे सदस्य बनून त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ विख्यात राजकीय कारकीर्द सांभाळली. जम्मूच्या उधमपूर मतदार संघातील ते 11 व्या, 12 व्या आणि 13 व्या लोकसभेचे सदस्य होते.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
त्याशिवाय चमनलाल गुप्ता हे 13 ऑक्टोबर 1999 ते 1 सप्टेंबर 2001 दरम्यान नागरी उड्डाण मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय ( स्वतंत्र कार्यभार) केंद्रीय राज्यमंत्री (1 सप्टेंबर 2001 ते 30 जून 2002) आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री (1 जुलै 2002 ते 2004) होते.