इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. के के अग्रवाल यांचे निधन
प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के के अग्रवाल यांचे कोविडशी झुंज देताना निधन झाले आहे. ते प्रख्यात फिजीशियन आणि कार्डिओलॉजिस्ट होते, त्यांनी हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. 2005 मध्ये त्यांना डॉ. बी सी रॉय पुरस्कार आणि 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल भारताचा हा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य