Table of Contents
DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 जाहीर
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केले आहे. सदर कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 30/11/2023 व 01/12/2023 रोजी झालेल्या कागदपत्र पडताळणी साठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांसाठी आहे. निर्देशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक), अधीक्षक (तांत्रिक), मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स), वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल, साहाय्यक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या संवर्गातील एकूण 772 पदांसाठी DVET महाराष्ट्र भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आज या लेखात आपण DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
DVET महाराष्ट्र कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023: विहंगावलोकन
DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) |
भरतीचे नाव | DVET महाराष्ट्र भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 772 |
लेखाचे नाव | DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 |
DVET चे अधिकृत संकेतस्थळ | www.dvet.gov.in |
DVET भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 PDF
दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी DVET महाराष्ट्र भरती 2023 मधील पात्र उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीचे आयोजन केले आहे. दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी कागदपत्र पडताळणी होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 PDF डाउनलोड करू शकतात.
DVET महाराष्ट्र भरती कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 2023 PDF
कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचा पत्ता
पात्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, मुंबई, द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड, नवीन इमारत, 3 रा मजला, बाळासाहेब ठाकूर वाडी, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व), मुंबई-81 येथे उपस्थित रहावे.
कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना
- प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) करिता उमेदवाराने व्यक्तीशः स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे. उमेदवाराऐवजी अन्य व्यक्तीस/नातेवाईकास प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) करिता उपस्थित राहता येणार नाही.
- प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहिल्यानंतर उमेदवाराने संबंधित मूळ प्रमाणपत्र / कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) करिता बोलाविण्यात आले याचा अर्थ उमेदवाराची निवड झाली असा होत नाही. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) अंती पात्र ठरलेले उमेदवार पुढील भरती प्रक्रियेकरिता पात्र ठरतील.
- उमेदवाराचे अनुभव प्रमाणपत्राची प्रथम प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल. तसेच जात/दिव्यांग/अनाथ/ नॉनक्रिमीलेयर इत्यादी प्रमाणपत्र/कागदपत्र सक्षम प्राधिकारी/आस्थापनांना तपासणीकरिता पाठविण्यात येतील.
- उमेदवाराने सादर केलेले प्रमाणपत्र/कागदपत्र खोटे/बनावट असल्याचे आढळून आल्यास उमेदवारास सर्व पदांच्या पदभरतीच्या पुढील टप्याकरिता अपात्र ठरविण्यात येईल व उमेदवाराच्या नांवाचा समावेश काळ्या यादीत करण्यात येईल. तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व अधिनस्त शासकीय संस्था/कार्यालयातील पदभरतीकरिता कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात येईल.
- प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणीअंती उमेदवार अपात्र ठरल्यास त्या प्रमाणात तात्पुरत्या निवड यादीतील अतिरिक्त उमेदवारांची प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी करण्यात येईल. याबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येईल.
- प्रमाणपत्र/कागदपत्र पडताळणी (Document Verification) प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय “संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-400001.” यांचा राहील.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.