Table of Contents
महाराष्ट्राची मानचिन्हे
महाराष्ट्राची मानचिन्हे: कोणत्याची राज्याची संस्कुती, पर्यावरण, इतिहास याचे दर्शन आपल्याला त्या राज्याच्या मानचिन्हावरून कळते. जसे भारताचे राष्ट्रीय फुल कमळ आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्य मानचिन्ह आहेत. महाराष्ट्र हे पश्चिम आणि मध्य भारतातील एक राज्य आहे, ज्याने दख्खनच्या पठाराचा मोठा भाग व्यापला आहे. महाराष्ट्र हे भारतातील दुसरे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. आज या लेखात आपण महाराष्ट्राची मानचिन्हे कोणकोणते आहे, त्या सर्वांची एक यादी आणि महाराष्ट्राची मानचिन्हे बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. ज्याचा फायदा आगामी काळातील सरळसेवा भरती जसे कि, आगामी काळातील जिल्हा न्यायालय भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
महाराष्ट्राच्या मानचिन्हांची यादी
महाराष्ट्राच्या मानचिन्हांची यादी: महाराष्ट्राच्या मानचिन्हांची यादी (List of Maharashtra State Symbol) खालील तक्त्यात दिली आहे.
Maharashtra State Symbols | Name in Marathi | Name in English |
महाराष्ट्राचा राज्य प्राणी | शेकरू | Indian Giant Squirrel |
महाराष्ट्राचे राज्य फुल | ताम्हण किवा जारूळ | Tamhin, Jarul |
महाराष्ट्राचा राज्य पक्षी | हरियाल | Yellow-Footed Green Pigeon (Hariyal) |
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष | आंबा | Mango |
महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू | ब्ल्यू मॉरमॉन | Blue Mormon (Papilio Polymnestor) |
महाराष्ट्राचा राज्य खेळ | कबड्डी | Kabaddi |
महाराष्ट्राचे राज्य मासे | रोहू | Rohu |
महाराष्ट्राचे राज्य गीत | जय जय महाराष्ट्र माझा | Jay Jay Maharashra Majha |
महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष | पांढरी चिप्पी | White chippy |
List of National Highways in India (Updated)
राज्य प्राणी- शेकरू
राज्य प्राणी- शेकरू: महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे. शेकरू बद्दल माहिती खालीलप्रमाणे
- शेकरू ज्याला सामान्यतः मलबार जायंट गिलहरी म्हणून ओळखले जाते, ही एक विशाल बहुरंगी वृक्ष गिलहरी आहे जी केवळ भारतातील जंगल आणि जंगलात आढळते.
- भक्षकांपासून वाचण्यासाठी, शेकरू सहसा 11 मीटर उंचीच्या मोठ्या झाडांमध्ये घरटे बांधतात.
- शेकरूचे डोके-आणि-शरीराची लांबी 25-50 सेमी, शेपटीची लांबी समान किंवा किंचित मोठी आणि 1.5-2 किलो वजन आहे.
- यात लक्षवेधी एक-, दोन- किंवा तीन-टोन रंगसंगती आहे. वापरलेल्या रंगांमध्ये पांढरा, क्रिमी-बेज, बफ, टॅन, रस्ट, लाल-मरुण, तपकिरी, गडद सील तपकिरी आणि काळा यांचा समावेश होतो.
राज्य पक्षी-हरियाल
राज्य पक्षी-हरियाल: हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. तो आनंद सागर, शेगाव येथे आढळतो. पाचू-कवडा या कबुतराच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालाच्या अंगावर असतात. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीच्या झाडावर तो असतो. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. त्यांचा विणीचा हंगाम मार्च 2 ते जून असतो.
राज्य झाड- आंबा
राज्य झाड- आंबा: एक प्रसिद्ध, सदापर्णी, 15 ते 25 मीटर उंच, घेर 4 ते 5 मीटर आणि आकार घुमटासारखा असलेला हा वृक्ष. याची साल जाड, गर्द करडी किंवा काळपट, खरबरीत, भेगाळ, खवलेदार असते. पाने साधी, कोवळेपणी लालसर, नंतर तपकिरी होतात. शेवटी ती गर्द हिरवी, चकचकीत, लांबट भाल्यासारखी दिसतात. फुले लहान असतात, लालसर किंवा पिवळट व तिखट वासाची असतात. झाडाला जानेवारी-मार्चमध्ये मोहोर येतो. नंतर मे-जूनमध्ये आंबे धरतात. आंबा भारतात अत्यंत लोकप्रिय असून जगातल्या उत्कृष्ट फळांपैकी एक आहे.
राज्य फुलपाखरू – ब्ल्यू मॉरमॉन
राज्य फुलपाखरू – ब्ल्यू मॉरमॉन: ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे. ब्ल्यू मॉरमॉनचे पंख 120-150 मिमी आहेत. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात, तसेच पंखाच्या खालची बाजूकाळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात. ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला महाराष्ट्रात राणी पाकोळी’ म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये हे फुलपाखरू आढळते.
राज्य फुल- ताम्हण
राज्य फुल- ताम्हण: तामण हा पानझडी वृक्ष लिथ्रेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव लॅगरस्ट्रोमिया स्पेसिओजा आहे. हा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील असून भारत, श्रीलंका, म्यानमार, चीन, मलेशिया या देशांत आढळतो. तामणाच्या फुलांच्या पाकळ्या चुरगळलेल्या व क्रेप कागदासारख्या दिसतात, म्हणून त्याला इंग्रजीत क्रेप फ्लॉवर असेही म्हणतात. भारतात हा वृक्ष शोभेकरिता सर्वत्र लावलेला दिसतो. रस्त्याच्या कडेला व बागेत हा सामान्यपणे आढळतो.
महाराष्ट्राची मानचिन्हे: नमुना प्रश्न
प्रश्न 1. _____ हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.
(a) वाघ
(b) सिंह
(c) शेकरू
(d) हत्ती
उत्तर- (c)
प्रश्न 2. हरियाल या पक्ष्याला कोणत्या नावाने ओळखले जात नाही?
(a) डव्ह
(b) हिरवा होला
(c) हरोळी
(d) यलो फुटेड् ग्रीन पिजन
उत्तर- (a)
प्रश्न 3. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे ______ राज्य ठरले आहे.
(a) दुसरे
(b) पहिले
(c) पाचवे
(d) तिसरे
उत्तर- (b)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.