Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi- 30...

Daily Current Affairs In Marathi- 30 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 30 जुलै 2021

दैनिक चालू घडामोडी: 30  जुलै 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता 30 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ना आरक्षण

Reservation for OBCs and EWS in medical education | वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ना आरक्षण
वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ना आरक्षण
  • केंद्र सरकारने अखिल भारतीय कोटा (एआयक्यू) योजनेंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतक अभ्यासक्रमांसाठी ओबीसींसाठी 27% आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांना 10% आरक्षण जाहीर केले आहे.
  • एआयक्यू योजनेंतर्गत, पदवी शिक्षणासाठी  15% जागा आणि पदव्युत्तर स्तरावर 50% जागा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
  • एआयक्यू योजना 1986 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोणत्याही राज्यातल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यात असलेल्या चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकण्याची अधिवास सक्ती मुक्त-गुणवत्ता-आधारित संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आली होती.

 

राज्य बातम्या 

 2. नागालँडमधील भूत जोलोकिया मिरच्यांची लंडनला निर्यात

Bhoot Jolokia chillies from Nagaland exported to London | नागालँडमधील भूत जोलोकिया मिरच्यांची लंडनला निर्यात
नागालँडमधील भूत जोलोकिया मिरच्यांची लंडनला निर्यात
  • नागालँडमधील राजा मिरची किंवा भूत जोलोकिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘राजा मिरचा‘ ची पहिल्यांदाच लंडनला निर्यात करण्यात आली आहे.
  • स्कोव्हिल हीट युनिटवर आधारित जगातील सर्वात तिखट मिरच्यांच्या यादीत ही मिरची पहिल्या पाचात आहे.
  • या मिरचीला 2008 साली जीआय टॅग देण्यात आले असून 2007 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकने तिला जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून घोषीत केले.

 

 3. केरळ पोलिसांचा ‘पिंक प्रोटेक्शन’ प्रकल्प

Kerala police launched ‘Pink Protection’ project | केरळ पोलिसांचा 'पिंक प्रोटेक्शन' प्रकल्प
केरळ पोलिसांचा ‘पिंक प्रोटेक्शन’ प्रकल्प
  • केरळ पोलिसांनी सार्वजनिक, खासगी आणि डिजिटल ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पिंक प्रोटेक्शन’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे.
  • यात 10 घटक आहेत, त्यातील एक विद्यमान पिंक पोलिस पेट्रोलिंग सिस्टम, पिंक जनमैत्री बीट सक्रिय करणे हा आहे.
  • पंचायत सदस्य, शेजारी आणि इतर स्थानिकांकडून माहिती गोळा करतील आणि पुढील कारवाईसाठी स्टेशन हाऊस अधिकाऱ्यांकडे देतील.
  • केरळ राज्य रस्ता परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आणि खासगी बस आणि शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानकांसह अन्य सार्वजनिक ठिकाणी खास प्रशिक्षित महिला पोलिस अधिकारी तैनात करण्यात येतील. सर्व 14 जिल्ह्यांमध्ये पिंक नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
  • गर्दीच्या ठिकाणी समाजकंटकांची उपस्थिती शोधण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी पिंक शॅडो गस्त पथकही तैनात केले जाईल.
  • प्रकल्पाचा एक भाग म्हणून “पिंक रोमियो” नावाचे महिला पोलिस अधिकाऱ्यांचे बुलेटस्वार गस्ती पथकही सुरू करण्यात आली आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • केरळचे मुख्यमंत्री: पिनाराई विजयन
  • केरळचे राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान

 

अर्थव्यवस्था बातम्या 

 4. आरबीआयने मडगाव अर्बन को-ऑप बँकेचा परवाना रद्द केला

RBI cancelled Madgaum Urban Co-op Bank's license | आरबीआयने मडगाव अर्बन को-ऑप बँकेचा परवाना रद्द केला
आरबीआयने मडगाव अर्बन को-ऑप बँकेचा परवाना रद्द केला

आरबीआयने मडगाव अर्बन को-ऑप बँकेचा परवाना रद्द केला

  • सध्याची बिकट आर्थिक स्थितीमुळे आपल्या सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकत नसल्याच्या कारणामुळे रिझर्व्ह बँकेने मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मडगाव, गोवाचा परवाना रद्द केला आहे.
  • सुमारे 99 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची पूर्ण रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) कडून मिळेल.
  • सहकारी संस्थांच्या निबंधक, गोवा यांनाही बँक बंद करण्यासाठी आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटरची नियुक्ती करण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

 5. 76 व्या यूएनजीएच्या अध्यक्षपदी मालदीव ची निवड

Maldives won the Presidency of the 76th UNGA | 76 व्या यूएनजीएच्या अध्यक्षपदी मालदीव ची निवड
76 व्या यूएनजीएच्या अध्यक्षपदी मालदीव ची निवड
  • मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) 76 व्या अधिवेशनाचे अध्यक्षपदी निवडणूक झाली आहे.
  • संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) इतिहासात प्रथमच यूएनजीएमध्ये मालदीव अध्यक्षपद भूषवणार आहे. मालदीवने 1965 साली युएन चे सदस्यत्व स्वीकारले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • मालदीवचे अध्यक्ष: इब्राहिम मोहम्मद सोलिह
  • मालदीवची राजधानी: माले 
  • मालदीवचे चलन: मालदीव रुफिया

महत्त्वाचे दिवस

 6. 30 जुलै: व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस

30th July: World Day Against Trafficking in Persons | 30 जुलै: व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस
30 जुलै: व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस
  • मानवी तस्करीला बळी पडलेल्यांच्या परिस्थितीविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 30 जुलै रोजी व्यक्तींच्या तस्करीविरोधात जागतिक दिवस आयोजित करते.
  • 2013 मध्ये, महासभेद्वारे या दिनाची घोषणा करण्यात आली.
  • 2021 ची संकल्पना: “पीडितांचे आवाज मार्ग दाखवतात”. (व्हिक्टिमस् व्हॉईसेस लीड द वे)

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • अमलीपदार्थ आणि गुन्ह्यासंबंधी संयुक्त राष्ट्राचे कार्यालयाचे(युएनओडीसी) मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
  • अमलीपदार्थ आणि गुन्ह्यासंबंधी संयुक्त राष्ट्राचे कार्यालयाची(युएनओडीसी) स्थापना: 1997

 

 7. 30 जुलै: आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस

30 July: International Day of Friendship | 30 जुलै: आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
30 जुलै: आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
  • दरवर्षी 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. जीवनात मित्र आणि मैत्रीचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • 2011 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने वंश, रंग, लिंग, धर्म इत्यादींचा विचार न करता विविध देशांच्या लोकांमध्ये मैत्रीचे दृढ बंधन निर्माण करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय मैत्री दिन घोषित केला.
  • या दिवसाचा प्रस्ताव युनेस्को ने दिला होता.

 

करार बातम्या 

 8. बीआयएल आणि आयबीएम ‘एअरपोर्ट इन बॉक्स’ व्यासपीठ उभारणार

BIAL and IBM to set up ‘Airport in a Box’ platform | बीआयएल आणि आयबीएम 'एअरपोर्ट इन बॉक्स' व्यासपीठ उभारणार
बीआयएल आणि आयबीएम ‘एअरपोर्ट इन बॉक्स’ व्यासपीठ उभारणार
  • बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएल) ने ‘आयबीएम’ कंपनीसोबत ‘एअरपोर्ट इन बॉक्स’ व्यासपीठ उभारणारण्यासाठी करार केला आहे.
  • बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएल) ला त्याची उत्पादकता सुधारण्यासाठी, माहिती तंत्रज्ञान सेवा स्वयंचलित करण्यासाठी, प्रवासी वाहतुकीत भविष्यातील वाढ हाताळण्यासाठी आणि खर्च कमी करण्यास मदत करण्यासाठी हा भागीदारी करार मदत करणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अरविंद कृष्णा.
  • आयबीएम मुख्यालय: आर्मोंक, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स

 

 9. इंटेल आणि सीबीएसईने ‘सर्वांसाठी एआय’ प्रकल्प सुरु केला

Intel and CBSE launches ‘AI For All’ | इंटेल आणि सीबीएसईने 'सर्वांसाठी एआय' प्रकल्प सुरु केला
इंटेल आणि सीबीएसईने ‘सर्वांसाठी एआय’ प्रकल्प सुरु केला
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई) आणि इंटेल यांनी भारतातील प्रत्येकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ची मूलभूत समज निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘एआय फॉर ऑल उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली.
  • एआय फॉर ऑल हा 4 तासांचा, स्व-गती असलेला शैक्षणिक कार्यक्रम आहे जो एआयला सर्वसमावेशक पद्धतीने शिकवितो.
  • पहिल्या वर्षामध्ये 1 लाख नागरिकांना एआय बाबत परिचय देण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाचे आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी: पॅट गेलसिंगर
  • इंटेलची स्थापना: 18 जुलै 1968
  • इंटेल मुख्यालय: सांता क्लारा, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • इंटेल संस्थापक: गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉयस

 

पुरस्कार बातम्या 

 10. वैदेही डोंगरे: नवीन मिस इंडिया यूएसए

Vaidehi Dongre: New Miss India USA | वैदेही डोंगरे: नवीन मिस इंडिया यूएसए
वैदेही डोंगरे: नवीन मिस इंडिया यूएसए
  • मिशिगन येथील 25 वर्षीय युवती वैदेही डोंगरे हिने सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया यूएसए 2021 हा  किताब जिंकला आहे. जॉर्जियाची अर्शी ललानी दुसऱ्या तर नॉर्थ कॅरोलिनाची मीरा कासारी तिसऱ्या स्थानावर आहेत.
  • आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये शिक्षण घेतलेल्या डोंगरे हिने कथ्थक नृत्यातून भारतीय शास्त्रीय नृत्याची निर्दोष कामगिरी केल्याबद्दल स्पर्धेमध्ये ‘मिस टॅलेंटेड’ हे विजेतेपद पटकावले.
  • या स्पर्धेत मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए आणि मिस टीन इंडिया यूएसए असे तीन विजेते निवडण्यात आले.

 

नियुक्ती बातम्या 

 11. रमेश नायर: कॉलिअर्सचे भारतातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

Ramesh Nair: Colliers' new India CEO | रमेश नायर: कॉलिअर्सचे भारतातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी
रमेश नायर: कॉलिअर्सचे भारतातील नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी
  • मालमत्ता सल्लागार कॉलिअर्सने रमेश नायर यांची भारतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि आशियातील व्यवस्थापकीय संचालक, बाजार विकास, म्हणून नियुक्ती केली आहे.
  • नायर जेएलएल इंडियामधून कॉलियर्समध्ये दाखल झाले आहेत, जिथे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि देशप्रमुख म्हणून काम पाहिले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • कॉलिअर्सचे एशिया पॅसिफिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जॉन केनी
  • कॉलिअर्स सीईओ: जे एस हेनिक
  • कॉलिअर्स मुख्यालय: टोरोंटो, कॅनडा
  • कॉलिअर्स स्थापना: 1976, ऑस्ट्रेलिया

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या 

 12. कोव्हीहोम: आयआयटी हैदराबाद ची कोव्हीड टेस्ट किट

COVIHOME: Covid test kit by IIT Hyderabad | कोव्हीहोम: आयआयटी हैदराबाद ची कोव्हीड टेस्ट किट
कोव्हीहोम: आयआयटी हैदराबाद ची कोव्हीड टेस्ट किट
  • “कोव्हीहोम” नावाची भारतातील पहिली जलद इलेक्ट्रॉनिक कोविड -19 आरएनए चाचणी किट भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद येथील एका संशोधन गटाने विकसित केली आहे.
  • सेल्युलर आणि मॉलीक्युलर जीवशास्त्र केंद्राद्वारे किटचे प्रमाणीकरण केले गेले आहे आणि कोविड-19 शोधण्यासाठी या किटचा घरी आरामात उपयोग केला जाऊ शकतो.
  • या चाचणी किटचा मुख्य फायदा असा आहे की त्याला आरटी-पीसीआरची (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन) आवश्यक नाही.
  • ही चाचणी लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसलेल्या दोन्ही रुग्णांसाठी 30 मिनिटांच्या आत निकाल देऊ शकते.

 

क्रीडा बातम्या

 13. वंतिका अग्रवाल: राष्ट्रीय महिला ऑनलाइन बुद्धिबळ विजेती

Vantika Agarwal won national women online chess title | वंतिका अग्रवालने राष्ट्रीय महिला ऑनलाइन बुद्धिबळ विजेतेपद पटकावले
वंतिका अग्रवाल: राष्ट्रीय महिला ऑनलाइन बुद्धिबळ विजेती
  • वंतिका अग्रवालने राष्ट्रीय महिला ऑनलाइन बुद्धिबळ विजेतेपद पटकावले आहे. तिने 11 फेऱ्यांमध्ये 9.5 गुण मिळवले.
  • पश्चिम बंगालच्या अर्पिता मुखर्जीने दुसरा आणि तामिळनाडूच्या श्रीजा शेषाद्रीने स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला.

 

 निधन बातम्या 

 14. इंग्लंडचे माजी गोलंदाज माईक हेंड्रिक यांचे निधन

Former England bowler Mike Hendrick passes away | इंग्लंडचे माजी गोलंदाज माईक हेंड्रिक यांचे निधन
इंग्लंडचे माजी गोलंदाज माईक हेंड्रिक यांचे निधन
  • इंग्लंड आणि डर्बशायरचा माजी गोलंदाज माईक हेंड्रिक याचे निधन झाले आहे. इंग्लंडला दोन अ‍ॅशेस मालिकेतील विजयांमध्ये त्याने प्रमुख भूमिका बजावली आणि 1974 ते 1981 दरम्यान आपल्या देशासाठी 30 कसोटीत 87 विकेट घेतल्या.
  • ते आयर्लंडचे पहिले व्यावसायिक प्रशिक्षक देखील होते.

 

 

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

मिशन MPSC त्रिशूळ बॅच
मिशन MPSC त्रिशूळ बॅच

 

Sharing is caring!