Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi- 28...

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 28 जुलै 2021

दैनिक चालू घडामोडी: 28 जुलै 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 28 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंगचे केंद्र

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_40.1
अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंगचे केंद्र
 • भारतातील तसेच जगातील उद्योगांची गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारतात एक जागतिक दर्जाचे अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक्ससाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 • भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई च्या साहय्याने या केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
 • सध्या अ‍ॅनिमेशन आणि व्हीएफएक्स क्षेत्रातील मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्था विविध अभ्यासक्रम चालवितात.

 

राज्य बातम्या 

 2. पुरी: नळावाटे दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणारे भारताचे पहिले शहर

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_50.1
पुरी: नळावाटे दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणारे भारताचे पहिले शहर
 • नळाद्वारे 24 तास उच्च प्रतीचे पिण्याचे पाणी पुरविणारे ओडिशा राज्यातील पुरी हे भारतातील पहिले शहर बनले आहे.
 • या मुळे पुरीतील रहिवासी तसेच पर्यटकांना उत्तम पिण्याचे मिळणार असून जवळपास 400 मेट्रिक टन प्लास्टिक कचर्‍यापासून पुरी वासीयांची सुटका होणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • ओडिशाचे मुख्यमंत्री: नवीन पटनाईक
 • ओडिशाचे राज्यपाल: गणेशीलाल

 

 3. आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्यप्रदेश सरकारची देवारण्य योजना

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_60.1
आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्यप्रदेश सरकारची देवारण्य योजना
 • मध्यप्रदेश राज्यात आयुषला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पन्न करण्यासाठी सरकारने ‘देवारण्य’ योजना सुरु केली आहे.
 • राज्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी ही योजना आखली असून राज्यात आयुष औषधांची एक संपूर्ण पुरवठा साखळी विकसित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान
 • राज्यपाल: मंगुभाई छगनभाई पटेल

 

अर्थव्यवस्था बातम्या 

 4. आयएमएफ नुसार वित्तीय वर्ष 22 मध्ये भारताची जीडीपी वाढ 9.5% होणार

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_70.1
आयएमएफ नुसार वित्तीय वर्ष 22 मध्ये भारताची जीडीपी वाढ 9.5% होणार
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) सुधारित अंदाजानुसार भारताच्या जीडीपीतील वाढ वित्तीय वर्ष 2021-22 साठी आधीच्या 12.5% वरून घसरून 9.5% एवढी होणार आहे.
 • वित्तीय वर्ष 2022-23 साली भारताच्या सकल देशांतगर्त उत्पादनातील (जीडीपी) वाढ 8.5% अशी वर्तविली आहे.
 • तर जगाचा विचार केल्यास जीडीपी ची वाढ 2021-22 साली आधीच्या 4.9 % ऐवजी 6.0 % होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • आयएमएफ मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी यू.एस.
 • आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि अध्यक्षा: क्रिस्टलिना जॉर्जियावा.
 • आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ञ: गीता गोपीनाथ

 

 5. आरबीआय लवकरच डिजिटल चलन सुरु करणार

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_80.1
आरबीआय लवकरच डिजिटल चलन सुरु करणार
 • रिझर्व्ह बँक सध्या आपल्या स्वत:च्या डिजिटल चलन, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) च्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीच्या रणनीतीवर काम करीत आहे आणि लवकरच ती घाऊक आणि किरकोळ माध्यमाद्वारे याचे वितरण सुरु करणार आहे.
 • इक्वेडोर, ट्युनिशिया, सेनेगल, स्वीडन, एस्टोनिया, चीन, रशिया, जपान, व्हेनेझुएला आणि इस्त्राईल या देशांनी स्वत:चे डिजिटल चलने बाजारात आणले किंवा त्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

महत्त्वाचे दिवस 

 6. 28 जुलै: जागतिक हिपॅटायटीस दिन

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_90.1
28 जुलै: जागतिक हिपॅटायटीस दिन
 • जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 28 जुलैला “जागतिक हिपॅटायटीस (कावीळ) दिवस” आयोजित  करते.
 • हा दिवस विषाणूजन्य हिपॅटायटीसविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केला जातो, या आजारामुळे यकृतची जळजळ तसेच यकृतच्या कर्करोगासह आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
 • 2021 ची संकल्पना ‘हिपॅटायटीस प्रतीक्षा करू शकत नाही’ (हिपॅटायटीस कान्ट वेट) अशी आहे.
 • 28 जुलै हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे याच दिवशी नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक डॉ. बार्च ब्लम्बरबर्ग यांचा  जन्मदिवस असतो ज्यांनी हिपॅटायटीस बी विषाणूचा शोध लावला आणि विषाणूची निदान चाचणी व लस विकसित केली.
 • हिपॅटायटीस विषाणूचे पाच मुख्य प्रकार आहेत – ए, बी, सी, डी आणि ई त्यापैकी बी आणि सी घातक असून यांमुळे दरवर्षी साधारण 13 लाख लोक मृत्युमुखी पडतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • डब्ल्यूएचओचे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड
 • डब्ल्यूएचओचे महासंचालक: तेद्रोस एडॅनॉम

 

 7. 28 जुलै: जागतिक निसर्ग संवर्धन दिन

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_100.1
28 जुलै: जागतिक निसर्ग संवर्धन दिन
 • दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो.
 • हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे निसर्गाचे रक्षण करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करणे.

 

बैठक आणि परिषद बातम्या 

 8. ताजिकिस्तानमध्ये एससीओ संरक्षण मंत्र्यांची बैठक

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_110.1
ताजिकिस्तानमध्ये एससीओ संरक्षण मंत्र्यांची बैठक
 • भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी 27 ते 29 जुलै दरम्यान ताजिकिस्तानच्या दुशांबे येथे तीन दिवसीय दौर्‍यावर आहेत.
 • संरक्षण मंत्री आपले ताजिकिस्तानचे समकक्ष कर्नल जनरल शेराली मिरझो यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांबाबत आणि परस्पर स्वारस्याच्या इतर मुद्द्यांवर चर्चा करतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • ताजिकिस्तानची राजधानी: दुशांबे
 • ताजिकिस्तानचे चलन: ताजिकिस्तान सोमोनी
 • ताजिकिस्तानचे अध्यक्ष: इमोमाली रहमन
 • ताजिकिस्तानची अधिकृत भाषा: ताजिकि

 

संरक्षण बातम्या 

 9. इंद्रा 2021: भारत-रशिया लष्करी सराव

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_120.1
इंद्रा 2021: भारत-रशिया लष्करी सराव
 • भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त युद्धाभ्यास इंद्रा ची 12 वी आवृत्ती 1 ते 13 ऑगस्ट 2021 दरम्यान रशियातील वोल्गोग्रॅड येथे आयोजित केली जाणार आहे.
 • इंद्रा -21 युद्धाभ्यासमुळे भारत आणि रशिया च्या सैन्यामधील परस्पर विश्वास आणि परस्पर कार्यक्षमता आणखी मजबूत होईल आणि दोन्ही देशांचे सैन्य सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यात सक्षम होतील.

 

क्रीडा बातम्या 

 10. मोमीजी निशिया -ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_130.1
मोमीजी निशिया -ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती
 • जपानच्या 13 वर्षे 330 दिवसांच्या मोमीजी निशिया हिने स्केटबोर्डिंग या खेळात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत सर्वात तरुण विजेत्यांपैकी एक होण्याचा मान मिळविला आहे.
 • या स्पर्धेत ब्राझीलच्या रायसा लील (13 वर्षे आणि 203 दिवस) यांनी रौप्यपदक जिंकले तर जपानच्या फूना नाकायमा (16 वर्षे) यांनी कांस्यपदक जिंकले.
 • 1936 सालच्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या डायव्हिंग स्पर्धेत युएसए च्या चमूतील मार्जोरी गेस्ट्रिंग (13 वर्षे आणि 268 दिवस) ही सर्वात तरुण सुवर्णपदक विजेती आहे.

 

 

नियुक्ती बातम्या

 11. बसवराज बोम्मई- कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_140.1
बसवराज बोम्मई- कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री
 • भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत एकमताने लिंगायत समाजाचे आमदार बसवराज एस बोम्मई यांना कर्नाटकचे 23 वे मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले आहे. ते बी.एस. येडियुरप्पा यांची जागा घेतील.
 • यापूर्वी येडियुरप्पा सरकारमध्ये बसवराज बोम्मई गृहमंत्री होते. ते दोनवेळाचे विधान परिषदेचे आमदार आणि हवेरी जिल्ह्यातील शिग्गाव मतदार संघाचे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

 • कर्नाटकचे राज्यपाल: थावरचंद गहलोत
 • कर्नाटकची राजधानी: बेंगळुरू

 

 

Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_150.1
मिशन MPSC त्रिशूळ बॅच

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_170.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi- 28 July 2021_180.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.