Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi- 27...

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 | दैनिक चालू घडामोडी: 27 जुलै 2021

दैनिक चालू घडामोडी: 27 जुलै 2021

Daily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB,  अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 27 जुलै 2021 चे सर्व महत्वाचे Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. ढोलाविरा- भारतातील नवीन जागतिक वारसा स्थळ

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_40.1
ढोलाविरा- भारतातील नवीन जागतिक वारसा स्थळ
 • गुजरातमधील हडप्पा-युगातील धोलाविरा महानगराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील भारताचे 40 वे स्थळ म्हणून समावेश करण्यात आला आहे.
 • यामुळे गुजरातमध्ये पावागढजवळील चंपानेर, पाटणमधील राणी की वाव आणि अहमदाबाद ऐतिहासिक शहर ही ठिकाणे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाली आहेत.
 • चीनमधील फुझौ शहरात सुरु असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 44 व्या सत्रात याआधीच तेलंगणातील 13व्या शतकातील रुद्रेश्वरा / रामप्पा मंदिराचा भारतातातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केला आहे.

 

राज्य बातम्या 

 2. बीएस येडीयुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_50.1
बीएस येडीयुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
 • कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते 26 जुलै 2019 रोजी कर्नाटक चे 19 वे मुख्यमंत्री बनले होते.
 • त्यांनी चार वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले असून असे करणारे ते कर्नाटकचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • कर्नाटकची राजधानी: बेंगळुरू
 • कर्नाटकचे राज्यपाल: थावरचंद गेहलोत

 

 3. बृहत सोहरा पाणीपुरवठा योजना

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_60.1
बृहत सोहरा पाणीपुरवठा योजना
 • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांच्या हस्ते मेघालयातील पूर्व खासी डोंगररांगांमधील सोहरा येथे बहुप्रतिक्षित बृहत सोहरा पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
 • या योजनेसाठी ईशान्य भारत विकास मंत्रालयाने 2019 साली उत्तर पूर्व विशेष पायाभूत सुविधा विकास योजनेंतर्गत (एनईएसआयडीएस) 24.08 कोटी रुपये मंजूर केले होते.
 • या शिवाय केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसाम रायफल्सच्या सोहरा वनीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून त्यांनी सोहरा येथे वृक्षारोपण केले.

 

 4. आसाममध्ये बांबू औद्योगिक उद्यान

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_70.1
आसाममध्ये बांबू औद्योगिक उद्यान
 • आसामचे मुख्यमंत्री, हिमंता बिस्वा सरमा यांनी मंदेरदिंसा गावातील, दिमा हसाओ येथे बांबूच्या औद्योगिक उद्यानाचा पाया घातला.
 • या प्रकल्पाची निर्मिती ईशान्य भारत विकास मंत्रालयाद्वारे करण्यात आली असून यासाठी 50 करोड रुपये खर्च येणार आहे.
 • या उद्यानामुळे येथील लोकांना शाश्वत रोजगार मिळणार असून प्रदेशाच्या विकासाला हातभार लागणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
 • आसामचे मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

 5. फिलीपिन्सने गोल्डन राईस लागवडसाठी मान्यता दिली

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_80.1
फिलीपिन्सने गोल्डन राईस लागवडसाठी मान्यता दिली
 • फिलिपिन्स हा अनुवंशिकरित्या सुधारित “सोनेरी तांदूळ”(गोल्डन राईस) च्या व्यावसायिक उत्पादनास मान्यता देणारा जगातील पहिला देश ठरला आहे. तांदळाची ही जात मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे.
 • आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेच्या (आयआरआरआय) सहकार्याने कृषी विभाग -फिलिपीन्स राईस रिसर्च इन्स्टिट्यूट (डीए-फिलरिस) विभागाने सुमारे दोन दशकांच्या संशोधनानंतर सुवर्ण तांदूळ विकसित केला आहे.
 • पिवळ्या चमकदार रंगामुळे या गोल्डन राईस असे नाव देण्यात आले असून हा तांदूळ अ जीवनसत्त्वाने समृद्ध आहे.
 • या तांदळामुळे सहा महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमधील रातंधळेपणा तसेच कुपोषण यावर महत्त्वाचा उपाय आहे.
 • दक्षिण व आग्नेय आशियातील व्यापारी संउत्पादनासाठी मंजूरी मिळालेला हा पहिला अनुवांशिकरित्या सुधारित भात आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • फिलिपिन्सचे अध्यक्ष: रॉड्रिगो दुतेर्ते.
 • फिलिपिन्स राजधानी: मनिला.
 • फिलीपिन्स चलन: फिलिपिन्स पेसो

 

 6. नवीन जागतिक वारसा स्थळे- माद्रिदचे पासेओ डेल प्राडो आणि रेटिरीओ उद्यान

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_90.1
नवीन जागतिक वारसा स्थळे- माद्रिदचे पासेओ डेल प्राडो आणि रेटिरीओ उद्यान
 • स्पेनमधील माद्रिदच्या ऐतिहासिक पासेओ डेल प्राडो बुलेव्हार्ड आणि रेटिओ उद्यान यांचा  युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.

 

 7. इंडोनेशियात जगातील सर्वात मोठे तरंगते सौर क्षेत्र

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_100.1
इंडोनेशियात जगातील सर्वात मोठे तरंगते सौर क्षेत्र
 • सिंगापूरच्या सनसेप ग्रुपने इंडोनेशियातील बाटम शहरात जगातील सर्वात मोठे तरंगते सौर क्षेत्र आणि उर्जा संचय प्रणाली तयार करण्यासाठी 2 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची योजना आखली आहे ज्यामुळे या शहराची नूतनीकरणक्षम वीज उत्पादन क्षमता दुप्पट होणार आहे.
 • या सौर क्षेत्राची एकूण क्षमता 2.2 गिगावॅट्स असणार आहे. या फार्म मुळे बाटम बेटातील दुरियांगकांग जलाशयातील 1600 हेक्टर (4000 एकर) क्षेत्र व्यापेल जाईल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • इंडोनेशियाची राजधानी: जकार्ता
 • इंडोनेशियाचे चलन: इंडोनेशियन रुपिया

 

 8. उझबेकिस्तानने ‘मध्य-दक्षिण आशिया’ परिषद 2021 चे आयोजन केले

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_110.1
उझबेकिस्तानने ‘मध्य-दक्षिण आशिया’ परिषद 2021 चे आयोजन केले
 • उझबेकिस्तानने “मध्य आणि दक्षिण एशिया: प्रादेशिक संपर्क,आव्हाने आणि संधी ” या आशयाची उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद ताशकंद येथे आयोजित केली आहे.
 • ही परिषद उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झीयोयेव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.आंतरराष्ट्रीय परिषदेला संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी आभासी पद्धतीने संबोधित केले.
 • भारतातर्फे केंद्रीय परराष्ट्र एस. जयशंकर यांनी या परिषदेला हजेरी लावली. डॉ. जयशंकर यांनी मध्य आशियाई देशांकरिता इराणमधील चाबहार बंदर समुद्रापर्यंत ‘सुरक्षित, व्यवहार्य आणि अखंड मार्ग’ आहे असे प्रतिपादन केले.
 • आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन कॉरिडोर (आयएनएसटीसी) मध्ये या बंदराचा समावेश करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे तसेच चाबहार बंदराच्या संयुक्त वापरावर भारत-उझबेकिस्तान-इराण-अफगाणिस्तान या चार देशांचा संयुक्त  कार्य गट तयार करण्यात आला आहे.

 

अर्थव्यवस्था बातम्या

 9. केअर रेटिंग्ज नुसार भारताची जीडीपी वाढ 8.8% – 9%

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_120.1
केअर रेटिंग्ज नुसार भारताची जीडीपी वाढ 8.8% – 9%
 • केअर रेटिंग्स संस्थेचा असा अंदाज आहे की चालू आर्थिक वर्षात, 2021-22 (एफवाय 22) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर 8.8 ते 9 % असेल.
 • भारताची वित्तीय तूट रु.17.38 लाख करोड ते रु.17.68 लाख करोड असेल असा अंदाज देखील या वित्तीय अहवालात वर्तविण्यात आला आहे.
 • या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य वाढीची क्षेत्र कृषी आणि औद्योगिक क्षेत्र असतील.

 

 

महत्त्वाचे दिवस 

 10. 27 जुलै: सीआरपीएफ स्थापना दिन

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_130.1
27 जुलै: सीआरपीएफ स्थापना दिन
 • 27 जुलै 2021 रोजी  केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) आपला 83 वा स्थापना दिन साजरा केला.
 • सीआरपीएफ गृह मंत्रालयाच्या (एमएचए) अंतर्गत भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आहे.
 • स्थापना: 27 जुलै 1939 (क्राउन रिप्रेझेन्टेटिव्ह पोलीस म्हणून)
 • सीआरपीएफ कायदा: 28 डिसेंबर 1949 (केंद्रीय राखीव पोलिस दलाने असे नामकरण)

 

 11. कांदळवन परीसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन

 

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_140.1
कांदळवन परीसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन
 • दरवर्षी 26 जुलै रोजी कांदळवन परीसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन (जागतिक कांदळवन दिवस) अद्वितीय, विशेष आणि असुरक्षित परीसंस्था म्हणून कांदळवनांना असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि या परीसंस्थेचे शाश्वत व्यवस्थापन, संवर्धन आणि उपयोगांसाठीच्या उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.
 • हा दिवस 2015 पासून युनेस्को मार्फत आयोजित केला जातो.
 • याच दिवशी 1998 मध्ये ग्रीनपीसचे कार्यकर्ते हॅहो डॅनियल नानोटो यांचा इक्वेडोर मधील मुइस्ने कांदळवनांची पुनर्लागवड करण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या वेळी दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते.

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान बातम्या

 12. नासाने युरोपा मोहिमेसाठी स्पेसएक्सची निवड केली

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_150.1
नासाने युरोपा मोहिमेसाठी स्पेसएक्सची निवड केली
 • अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने गुरु ग्रहाचा उपग्रह युरोपाची सविस्तर तपासणी करण्यासाठीच्या जगातील पहिल्या मोहिमेत प्रक्षेपण सेवा पुरवण्यासाठी कॅलिफोर्नियास्थित स्पेसएक्सची निवड केली आहे.
 • या मोहिमेचे नाव ‘यूरोपा क्लिपर मिशन’ असून याचे प्रक्षेपण फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथे लॉन्च कॉम्प्लेक्स 39 ए येथून फाल्कन हेवी रॉकेटच्या सहाय्याने ऑक्टोबर 2024 ला होणार आहे.
 • या मोहिमेचा उद्देश युरोपा या बर्फाच्छादित उपग्रहावर जीवनासाठी अनुकूल परिस्थिती आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करणे, युरोपाच्या पृष्ठभागावर उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा तयार करणे, त्याची रचना निश्चित करणे, अलीकडील किंवा चालू असलेल्या भूवैज्ञानिक क्रियेची लक्षणे शोधणे, चंद्राच्या बर्फाच्या थराची जाडी मोजणे, पृष्ठभागावरील तलावांचा शोध घेणे, युरोपाच्या समुद्राची खोली आणि खारटपणा मोजणे हे आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • नासा प्रशासकीय प्रमुख: बिल नेल्सन.
 • नासाचे मुख्यालय: वॉशिंग्टन डी.सी., युनायटेड स्टेट्स
 • नासाची स्थापना: 1 ऑक्टोबर 1958.
 • स्पेसएक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: एलोन मस्क.
 • स्पेसएक्सची स्थापना: 2002.
 • स्पेसएक्स मुख्यालय: कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 

 

क्रीडा बातम्या 

 13. प्रिया मलिकने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_160.1
प्रिया मलिकने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
 • भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या  2021 च्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
 • तिने महिलांच्या 73 किलो वजनी गटात केसेनिया पट्टापोविचचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
 • या स्पर्धेत भारताने 5 सुवर्णपदकांसह एकूण 13 पदक जिंकले आहेत.

 

 14. युटो होरिगोम-स्केटबोर्डिंगमधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_170.1
युटो होरिगोम-स्केटबोर्डिंगमधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक
 • जपानच्या युटो होरिगोमेने ऑलिम्पिकमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या स्केटबोर्डिंग खेळाच्या अरिके अर्बन स्पोर्ट येथे पुरुषांच्या स्ट्रीट स्केटिंग अंतिम स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले आहे.
 • या स्पर्धेत ब्राझीलच्या केल्विन हॉफलरने रौप्यपदक जिंकले तर अमेरिकेच्या जागर ईटनने कांस्यपदक जिंकले.

 

 

निधन बातम्या 

 15. ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_180.1
ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचे निधन
 • ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री जयंती यांचे निधन झाले आहे.
 • त्यांनी 1963 साली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये सुमारे 500 चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 • कन्नड चित्रपटसृष्टीत त्यांना ‘अभिनया शारधे’ म्हणजे ‘अभिनयाची देवी’ म्हणून ओळखले जात असे.
 • त्यांनी कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार सात वेळा आणि दोनदा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले.

 

संरक्षण बातम्या 

 16. कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_190.1
कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021
 • भारतीय नौदल जहाज तलवार ने आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 26 जुलै 2021 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत आयोजित कटलग एक्सप्रेस युद्धाभ्यास 2021 मध्ये भाग घेतला आहे.
 • पूर्व आफ्रिका आणि पश्चिम हिंद महासागरातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक सागरी सुरक्षेस चालना देण्यासाठी हा युद्धाभ्यास दरवर्षी आयोजित केला जातो.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_200.1
मिशन MPSC त्रिशूळ बॅच

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_220.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi- 27 July 2021 चालू घडामोडी_230.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.