Marathi govt jobs   »   Study Materials   »   आम्ल व आम्लारी

आम्ल व आम्लारी : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

आम्ल व आम्लारी

आम्ल आणि आम्लारी हे रसायनशास्त्राच्या मूलभूत गोष्टी आहेत आम्ल आणि आम्लारी हे रसायनशास्त्राचे आधारस्तंभ तयार करतात. आगामी काळातील आदिवासी विकास विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत रसायनशास्त्र हा विषय फार महत्वाचा आहे. रसायनशास्त्रातील महत्वाच्या घटक म्हणजे आम्ल आणि आम्लारी होय. आम्ल हे लैक्टिक किंवा लिंबूवर्गीय ऍसिडच्या स्वरूपात असतात जे लिंबू किंवा संत्र्यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये असतात. आम्लारी पावडरच्या स्वरूपात असतात जसे की ब्लीचिंग पावडर, अमोनिया इ. आम्ल बेस रसायनशास्त्रातील अनेक संयुगे वेगळे करण्यात मदत करते. आज या लेखात आपण आम्ल आणि म्लारी बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

आम्ल आणि आम्लारी: विहंगावलोकन

आम्ल आणि आम्लारी हे रसायन आहेत जे एकमेकांसोबत क्रिया करून पाणी आणि मीठ तयार करतात. या लेखात आम्ल आणि आम्लारी बद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. ज्यात आम्ल आणि आम्लारीचे गुणधर्म आणि उपयोग याबद्दल चर्चा केली आहे.

आम्ल आणि आम्लारी: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023
विषय सामान्य विज्ञान (रसायनशास्त्र)
लेखाचे नाव आम्ल आणि आम्लारी
हा लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • आम्ल आणि आम्लारीची ओळख
  • आम्ल आणि आम्लारीचे गुणधर्म
  • आम्ल आणि आम्लारीचे उपयोग

आम्ल आणि आम्लारी: आम्ल (Acid) ची ओळख

काही पदार्थ चवीला गोड, काही कडू तर काही आंबट किंवा तुरट असतात. लिंबू, चिंच, व्हिनेगर किंवा आवळा यांसारख्या पदार्थांना आंबट चव, ही त्यांच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयुगांमुळे प्राप्त होते. ह्या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात. आम्ल पाण्यात विद्राव्य असतात व ते क्षरणकारकही असतात. प्राणी आणि वनस्पतींमध्ये सुद्धा आम्ले असतात.

आम्ल (Acid): आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन (H+) उपलब्ध करून देते/निर्माण करते.

आम्लांची काही उदाहरणे: हायड्रोक्लोरिक आम्ल(HCl), नायट्रिक आम्ल (HNO3), सल्फ्युरिक आम्ल (H2S04), व इतर अनेक फळांतील ॲस्काॅर्बिक आम्ल, सायट्रिक आम्ल, व्हिनेगरमधील ॲसेटिक आम्ल, इत्यादी.

आम्ल आणि आम्लारी: आम्लाचे प्रकार

आम्लाचे प्रमुख दोन प्रकार आहेत. एक म्हणे सौम्य आम्ल (Weak Acid) आणि दुसरे तीव्र आम्ल (Strong Acid)

सौम्य आम्ल (Weak Acid) – जे आम्ल पाण्यातील आयनांचे अंशतः पृथक्करण करू शकतात त्यांना कमकुवत आम्ल म्हणतात. खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रीय आम्ल असेही म्हणतात. ही आम्ले क्षीण प्रकृतीची असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ल (weak acid) म्हणतात. उदा.

तीव्र आम्ल (Strong Acid) – जे आम्ल पाण्यात सहज आणि पूर्णपणे आयन विलग करू शकतात त्यांना मजबूत आम्ल म्हणतात. उदाहरण- HCl, H2S04 इ.

काही नैसर्गिक आम्ले व त्यांचे स्त्रोत खाली दिले आहे.

आम्लाचे नाव नैसगिक स्रोत
ॲसिटिक आम्ल व्हिनेगर
ॲस्कॉर्बिक आम्ल संत्रे
टार्टारिक आम्ल चिंच
ऑक्सॅलिक आम्ल टमाटा
लॅक्टिक आम्ल दही
सायट्रिक आम्ल लिंबू

आम्ल आणि आम्लारी: आम्लाचे गुणधर्म

आम्लाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.

  • आम्लाची चव आंबट असते.
  • आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन (H+) हा मुख्य घटक असतो.
  • आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते.
  • आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन कार्बन डाय ऑक्साईड (CO2) वायू मुक्त होतो.
  • आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो.

आम्ल आणि आम्लारी: आम्लाचे उपयोग

आम्लाचे सर्वसामान्य उपयोग खालीलप्रमाणे आहेत.

  • रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात.
  • तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग (dyes/ paints), स्फोटक द्रव्येयांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा वापर होतो.
  • भिन्न-भिन्न क्लोराइड क्षार बनविण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.
  • विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी (विद्युत घट) मध्येही वापरतात.
  • पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो.
  • लाकडाच्या लगद्यापासून पांढराशुभ्र कागद बनविण्याकरिता आम्लाचा वापर होतो.

आम्ल आणि आम्लारी: आम्लारी (Base) ची ओळख

आम्लारी हा एक असा पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साइड आयन (OH-) निर्माण करतात. उदा. NaOH (aq) ब्रॉन्स्टेड-लॉरी बेस थिअरी असे सांगते की प्रोटॉन स्वीकारणारे कोणतेही पदार्थ आम्लारी असतात. ते जितक्या वेगाने प्रोटॉन स्वीकारेल तितकी मूलभूतता अधिक मजबूत होईल. काही आम्लारीचे नाव, रासायनिक सूत्र आणि त्यांचे उपयोग खाली देण्यात आली आहे.

आम्लारीचे नाव रासायनिक सूत्र उपयोग
सोडिअम हायड्रॉक्साइड /कॉस्टिक सोडा NaOH कपडे धुण्याच्या साबण बनविण्याकरिता
पोटॅशिअम हायड्रॉक्साइड/पोटॅश KOH आंघोळीचे साबण आणि शॅम्पू
कॅल्शिअम हायडॉक्साइड/चुन्याची निळी Ca(OH)2 चुना/रंग सफेदीकरिता
अमोनिअम हायड्रॉक्साइड NH4OH खते तयार करण्यासाठी
मॅग्नेशिअम हायड्रॉक्साइड/मिल्क ऑफ मॅग्नेशिआ Mg(OH)2 आम्लविरोधक औषध

आम्ल आणि आम्लारी: आम्लारीचे गुणधर्म

आम्लारीचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहे.

  • आम्लारीची चव कडवट असते.
  • त्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो.
  • आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH-)हा मुख्य घटक असतो.
  • सामान्यतः धातूंची ऑक्साइड आम्लारीधर्मी असतात

आम्ल आणि आम्लारी: दर्शक (Indicator)

जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात, ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात. आम्ल किंवा आम्लारी पदार्थांची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी दर्शक (Indicator) म्हणून विशिष्ट पदार्थांचा वापर केला जातो. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना ‘दर्शक’ असे म्हणतात.

प्रयोगशाळेतील दर्शक: आम्ल व आम्लारी पदार्थांचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेत मुख्यत्वे लिटमस
कागदाचा वापर केला जातो. हा कागद लायकेन (दगडफूल) नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार
केला जातो. तो तांबडा किंवा निळ्या रंगाचा असतो. निळा लिटमस आम्लात बुडविल्यावर तांबडा होतो आणि तांबडा लिटमस कागद आम्लारीमुळे निळा होतो. त्याच प्रमाणे फिनॉल्फथॅलिन, मिथिल ऑरेंज व मिथिल रेड हे दर्शक द्रावणस्वरूपात प्रयोगशाळेत वापरले जातात. मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये गुलाबी, तर आम्लारीमध्ये पिवळा होतो. फिनॉल्फथॅलिन आम्लामध्ये रंगहीन व आम्लारीमध्ये गुलाबी असतो. वैश्विक दर्शक (Universal Indicator) हे द्रावणरूपात असणारे दर्शक आम्ल, आम्लारीच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळे रंगबदल दाखवितात

आम्ल आणि आम्लारी
लिटमस पेपर टेस्ट
दर्शक पदार्थाचे नाव दर्शकाचे मूळ रंग आम्लातील रंग आम्लारीतील रंग
लिटमस कागद निळा तांबडा निळा (तसाच राहतो)
लिटमस कागद तांबडा तांबडा (तसाच राहतो) निळा
मिथिल ऑरेंज नारंगी गुलाबी पिवळा
फिनॉल्फ्थॅलिन रंगहीन रंगहीन गुलाबी
मिथिल रेड तांबडा तांबडा पिवळा

आम्ल आणि आम्लारी यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न

Q1. मिथिल ऑरेंज आम्लात टाकल्यानंतर कोणता रंग दर्शवितो?

(a) गुलाबी

(b) पिवळा

(c) तांबडा

(d) लाल

S1. Ans. (a)

Sol. मिथिल ऑरेंज आम्लात टाकल्यानंतर गुलाबी रंग दर्शवितो

Q2. अमोनिअम हायड्रॉक्साइडचा उपयोग कशासाठी होतो?

(a) चुना तयार करण्यासाठी

(b) साबण बनविण्यासाठी

(c) खते तयार करण्यासाठी

(d) यापैकी नाही

S2. Ans. (c)

Sol. अमोनिअम हायड्रॉक्साइडचा उपयोग खते तयार करण्यासाठी होतो.

Q3. आम्लाची चव कशी आहे?

(a) आंबट

(b) तिखट

(c) कडू

(d) तुरट

S3. Ans. (a)

Sol. आम्लाची चव आंबट असते.

Q4. खालीलपैकी ॲसिटिक आम्लाचा नैसर्गिक स्त्रोत कोणता आहे?

(a) दही

(b) संत्र

(c) लिंबू

(d) व्हिनेगर

S4. Ans. (d)

Sol. व्हिनेगर हे ॲसिटिक आम्लचे नैसर्गिक स्त्रोत आहे.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

आम्ल म्हणजे काय?

आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन (H+) उपलब्ध करून देते/निर्माण करते.

आम्लारी म्हणजे काय?

आम्लारी हा एक असा पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साइड आयन (OH-) निर्माण करतात.

आम्ल आणि आम्लारीचे pH मूल्य किती असते?

आम्लाचे pH मूल्य 7 पेक्षा जास्त आणिआम्लारीचे pH मूल्य 7 पेक्षा कमी आहे.