कोविड -19 मुळे अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे निधन
‘गुड न्यूज’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘छिचोरे’ या सिनेमांत काम करणारी अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोविड -19 च्या त्रासामुळे निधन झाले. त्या चाळीशीच्या आतील वयाच्या होत्या. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त, पाटील यांनी ‘ते आठ दिवस’, ‘बायको देता का बायको’ , ‘ प्रवास’ , ‘पिप्सी’ आणि ‘तुझ माझ अरेंज मॅरेज’ या मराठी चित्रपटांतही काम केले होते.