Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-3 July...

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_2.1

 

दैनिक चालू घडामोडी: 3 जुलै 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 3 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

  1. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक केंद्राची आधार शिला ठेवली

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_3.1

  • राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी लखनऊमध्ये आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक केंद्राची आधारभूत शिला ठेवली. हे केंद्र लखनौमधील ऐशबाग ईदगाहसमोर नझुल जमिनीवर उभारले जाणार आहे आणि त्यात डॉ.आंबेडकरांचा 25 फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे.
  • याचा साधारण खर्च 45.04 कोटी रुपये होणार असून त्याय साधारण 750 लोकांसाठी  ग्रंथालय, संशोधन केंद्र, चित्र गॅलरी, संग्रहालय आणि बहुउद्देशीय अधिवेशन केंद्र असलेली सभागृह असणार आहे.

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

2. डब्ल्यूएचओने चीनला मलेरियामुक्त प्रमाणपत्र दिले

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_4.1

  • 70 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मलेरिया मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीन ला दिले. 1940 च्या दशकात वर्षाला 30 दशलक्ष मलेरियाचे रुग्ण आढळणाऱ्या चीन चे हे यश वाखाणण्याजोगे आहे.
  • डब्ल्यूएचओ मलेरियामुक्त प्रमाणपत्र दिलेला पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील मागील 3 दशकांतला चीन हा एकमेव देश आहे. प्रदेशातील इतर देशांमध्ये ऑस्ट्रेलिया (1981), सिंगापूर (1982) आणि ब्रुनेई दारुसलाम (1987) यांचा समावेश आहे.
  • जागतिक पातळीवर, 40 देश आणि प्रांतांना डब्ल्यूएचओ कडून मलेरियामुक्त प्रमाणपत्र देण्यात आले आहे – अलिकडेच अल साल्वाडोर (2021), अल्जेरिया (2019), अर्जेंटिना (2019), पराग्वे (2018) आणि उझबेकिस्तान (2018) या देशांनी अशी कामगिरी केली.
  • अलिकडच्या वर्षांत, देशाने “1-3-7” धोरणाचा अवलंब करून मलेरिया आजार कमी केला. यातील ‘1’ म्हणजे मलेरिया निदानाची नोंद करण्यासाठी आरोग्य सुविधांसाठी एक दिवसाची अंतिम मुदत. ‘3’ म्हणजे दिवस-अखेरीस 3 आरोग्य अधिकार्‍यांना मलेरियाच्या केसची पुष्टी करणे आणि त्याचा प्रसार होण्याचा धोका निश्चित करणे आवश्यक आहे. आणि ‘7’ म्हणजे 7 दिवसांच्या आत रोगाचा पुढील प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • चीनची राजधानी: बीजिंग
  • चीनची चलन: रेन्मिन्बी
  • चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

 

करार बातम्या

3. एआयएनआयएफएम आणि मायक्रोसॉफ्ट एकत्रितपणे एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान विकसित करणार

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_5.1

  • अरुण जेटली नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट (एजेएनआयएफएम) आणि मायक्रोसॉफ्ट ने एजेएनआयएफएम येथे एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र तयार करण्यासाठी सामरिक भागीदारीची घोषणा केली.
  • सहकार्याने भारतातील सार्वजनिक वित्त व्यवस्थापनाचे भविष्य बदलण्यासाठी क्लाऊड, एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाची भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
  • एजेएनआयएफएम आणि मायक्रोसॉफ्ट एकत्रितपणे केंद्रीय आणि राज्य मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये वित्त आणि संबंधित क्षेत्रांमधील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्यासठी प्रयत्न करणार आहे.
  • सामरिक भागीदारीचा एक भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट आणि एजेएनआयएफएम खालील घटकांवर लक्ष देणार आहे: नाविन्यता केंद्र तयार करणे, उद्योग नेतृत्व, पुनर्रकौशल्य आणि क्षमता निर्माण, भागीदारांसाठी सक्षम परिसंस्था निर्माण करणे

 

नियुक्ती बातम्या

4. उत्तराखंड राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी यांची निवड

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_6.1

  • उत्तराखंड सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून 45 वर्षीय पुष्कर सिंघ धामी लवकरच शपथग्रहण करणार आहेत. ते उधमसिंह नगर जिल्ह्यातील खतिमा मतदार संघाचे आमदार आहेत. ते राजीनामा दिलेल्या तिरथसिंघ रावत यांची जागा घेतील.
  • 16 सप्टेंबर, 1975 रोजी जन्मलेले, पुष्करसिंग धामी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून उत्तराखंडमधील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
  • त्यांनी मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात पदव्युत्तर पदवी आणि सामाजिक जीवनात एलएलबी पदवी घेतली आहे. पुष्करसिंग धामी यांनी 2002 साली उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांच्याकरिता विशेष अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • उत्तराखंडच्या राज्यपाल: बेबी राणी मौर्य

 

पुस्तके आणि लेखक

5. पॅन मॅकमिलन नथुराम गोडसे यांचे चरित्र प्रकाशित करणार

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_7.1

  • मुंबईस्थित पत्रकार धवल कुलकर्णी यांचे “नथूराम गोडसे: द ट्रू स्टोरी ऑफ गांधीज असॅसिन” या पुस्तकाचे प्रकाशन 2022 साली पॅन मॅकमिलन करणार आहे.
  • महात्मा गांधींचे कुप्रसिद्ध मारेकरी नाथूराम गोडसे यांचे चरित्र त्यांच्या जीवनाचा आधुनिक इतिहास आणि समकालीन समाज व राजकारणाच्या मोठ्या संदर्भात वेध घेणार आहे अशी माहिती प्रकाशकांनी दिली.

 

संरक्षण बातम्या

6. 7 वा हिंदी महासागर नौदल परिसंवाद फ्रान्स मध्ये पार पडला

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_8.1

  • हिंद महासागर नौदल परिसंवादाची (आयओएनएस) 7 वी आवृत्ती  1 जुलै 2021 रोजी फ्रान्स मध्ये पार पडली. फ्रेंच नौसेनेतर्फे हा द्विवार्षिक परिसंवाद ला रियुनियन येथे 28 जून पासून आयोजित करण्यात आला होता.
  • भारतातर्फे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करंबीर सिंह यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीने सहभाग घेतला. फ्रान्स 29 जून 2021 पासून दोन वर्षांकरिता या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे.

आयओएनएस बद्दल:

  • हिंद महासागर नौदल परिसंवाद (आयओएनएस) ही द्विवार्षिक बैठकीची एक श्रृंखला आहे, ज्यामध्ये हिंद महासागर प्रदेशातील किनाऱ्यावरील देशांदरम्यान नौदल सहकार्य वाढविणे आणि क्षेत्रीयदृष्ट्या संबंधित सागरी चर्चेसाठी खुला व समावेशक मंच उपलब्ध करुन देणे आणि मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देणे इत्यादी कार्ये केली जातात.
  • पहिल्या परिसंवादाचे आयोजन 2008 साली झाले होते त्यावेळेस भारत अध्यक्षाच्याच्या भूमिकेत होता.

 

क्रीडा बातम्या

7. भारतीय कुस्तीपटू सुमीत मलिक ला उत्तेजक पदार्थ सेवन प्रकरणी दोन वर्षांची बंदी

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_9.1

  • भारतीय कुस्तीपटू सुमीत मलिकवर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. क्रीडा जगातील प्रशासकीय मंडळ यूडब्ल्यूडब्ल्यूने त्याच्या रक्तांच्या नमुन्यात देखील प्रतिबंधित उत्तेजक आढळल्यामुळे त्याच्यावर बंदी कायम ठेवण्यात आली.
  • गेल्या महिन्यात सोफिया येथे झालेल्या वर्ल्ड ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर तात्पुरती बंदी ठेवण्यात आली होती,  या स्पर्धेत तो 125 किलो वजनी गटात टोकियो ऑलिम्पिक साठी पात्र देखील झाला होता.

8. टोकियो पॅराऑलिंपिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून मारियाप्पन थंगावेलू ची निवड 

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_10.1

  • 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात होणाऱ्या टोकियो पॅराऑलिंपिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून उंच-उडीपटू मारियाप्पन थंगावेलू याची निवड राष्ट्रीय समितीद्वारे करण्यात आली आहे.
  • थंगावेलूने 2016 च्या रिओ पॅराऑलिंपिक स्पर्धेत टी-42 प्रकारात सुवर्ण पदक कमावले होते. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न विजेत्या 25 वर्षीय थंगावेलूची निवड टोकियो पॅराऑलिंपिकसाठी 24 खेळाडूंच्या चमूत करण्यात आली आहे.
  • तामिळनाडूतील सालेम जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या थंगावेलूला वयाच्या पाचव्या वर्षी बसच्या अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आले होते.

 

महत्वाचे दिवस

9. 3 जुलै: आंतरराष्ट्रीय सहकार संस्था दिन

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_11.1

  • सहकारी संस्थांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार संस्था दिन पाळण्यात येतो.
  • या वर्षी हा दिवस 3 जुलै रोजी असून हवामान बदलांचा सामना करण्यासाठी सहकारी संस्थांच्या योगादानावर हा दिवस लक्ष केंद्रित केले जाईल. या दिवसाची संकल्पना “रीबिल्ड बेटर टूगेदर” (सर्वांनी मिळून चांगले पुनर्निनिर्माण करू) ही आहे.
  • या दिवशी सहकारी संस्था कशाप्रकारे कोव्हीड-19 महामारीचा सामना करत आहेत आणि समाजाला लोक-केंद्रित आणि पर्यावरणदृष्ट्या न्याय  पुनर्प्राप्तीसाठी मदत करत आहेत या वर भर असेल. या दिवसाची सुरुवात 1923 ला झाली. सहकारी संस्था जगभरातील 10% लोकसंख्येला नोकरीची संधी देतात.

 

निधन बातम्या

10. अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_12.1

  • दोन वेळा संरक्षण सचिव आणि एकेकाळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन झाले.
  • त्यांना इराक युद्धाचा अनुभव होता आणि दोन वेळा पेंटागोन चे प्रमुख असलेले ते एकमेव व्यक्ती आहेत. 1975-77 या काळात ते अमेरिकेचे सर्वात तरुण संरक्षण सचिव होते.

 

विविध बातम्या

11. नवीन उडी मारणाऱ्या कोळी प्रजातीला 26/11 शहीद तुकाराम ओंबळे यांचे नाव देण्यात आले

Daily Current Affairs In Marathi-3 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-3 जुलै 2021_13.1

  • ठाणे-कल्याण भागात नव्याने शोध लागलेल्या दोन उडणाऱ्या कोळींच्या प्रजातीपैकी एका प्रजातीला 26/11 हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांचे नाव देण्यात आले आहे.
  • या प्रजातीचे शास्त्रीय नाव  ‘आयकियस तुकारामी’ असे ठेवण्यात आले आहे. ध्रुव ए. प्रजापती, जॉन कॅलेब, सोमनाथ बी. कुंभार आणि राजेश सानप या शास्त्रज्ञांनी नवीन प्रजातीच्या शोधाचा दाखला देणारा पेपर रशियन विज्ञान मासिक अँथ्रोपोडा सिलेक्टामध्ये प्रकाशित केला आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!