Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-30 June...

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_30.1

 

दैनिक चालू घडामोडी: 30 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 30 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

 1. केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब आणि जगातील पाचव्या-सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅकचे उद्घाटन केले

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_40.1

 • केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इंदूरमधील नॅट्रॅक्स – हाय-स्पीड ट्रॅक (एचएसटी) चे उद्घाटन केले जो आशियातील हा सर्वात लांब ट्रॅक आहे.
 • 1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित केलेला नॅट्रॅक्स हा दुचाकी वाहनांपासून ते अवजड ट्रॅक्टर-ट्रेलरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठीच्या वेगाच्या कामगिरीच्या चाचण्यांसाठी वन-स्टॉप समाधान आहे.
 • हा जागतिक दर्जाचा 11.3 किमीचा हाय स्पीड ट्रॅक भारताला वाहन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे उत्पादक क्षेत्र बनविण्याच्या उद्देशाने हे महत्त्वाचे पाउल आहे.

 

2. पंतप्रधान मोदींनी जपानी शैलीतील झेन गार्डन आणि कायझेन अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन केले

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_50.1

 • पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (एएमए) प्रांगणात झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
 • हे दोन नवीन उपक्रम गुजरातमध्ये ‘मिनी-जपान’ तयार करण्याच्या पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षेचा भाग आहेत. नव्याने सुरू झालेल्या झेन गार्डनमध्ये जपानी कला, संस्कृती, लँडस्केप आणि आर्किटेक्चरच्या अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल. झेन गार्डनमध्ये भगवान बुद्धाची प्रतिमा आहे.
 • एएमए आणि इंडो-जपान फ्रेंडशिप असोसिएशन (आयजेएफए), गुजरातमधील जपान माहिती व अभ्यास केंद्राच्या सहकार्याने आणि ह्योगो इंटरनेशनल असोसिएशन (एचआयए) यांनी संयुक्तपणे हे गार्डन निर्माण केले आहे.

 

3. केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ‘आयटीएटी ई-द्वार’ चे उद्घाटन

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_60.1

 • केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत आयकर अपील न्यायाधिकरणाचे (आयटीएटी) ई-फाइलिंग पोर्टल ‘आयटीएटी ई-द्वार’ औपचारिकरित्या सुरू केले.
 • नव्याने विकसित केलेले ई-फाईलिंग पोर्टल द्वारे पक्षकारांना त्यांचे अपील, विविध अनुप्रयोग, कागदपत्रे, कागदी पुस्तके इ. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल करणे सोयीचे होणार आहे.
 • आयटीएटीचे नंतरच्या टप्प्यात पेपरलेस बेंच म्हणून विशिष्ट खंडपीठांची नेमणूक करण्याचे उद्दिष्ट आहे. या पोर्टल उद्देश आयकर विभागाच्या अपिलीय प्राधिकरणाच्या सर्व कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे.

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

4. युरोपियन अंतराळ संस्था प्रथमच अपंग (अक्षम) अंतराळवीरांना नियुक्त करणार

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_70.1

 • युरोपियन अंतराळ संस्था जगातील पहिल्या शारीरिकरित्या अक्षम अंतराळवीराला नियुक्त करून त्याला अंतराळात पाठवणार आहे.
 • ईएसए अपंग-अंतराळवीरांसाठी तंत्रज्ञान विकसित करीत आहे ज्याने “अंतराळ सर्वांसाठी” हा संदेश जगभर पोहोचेल. जुलै 2021 मध्ये अ‍ॅमेझॉनचे संस्थापक बेझोस स्वत:च्या अवकाशयानाने अंतराळात जाणारे पहिले मानव ठरतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

 • युरोपियन स्पेस एजन्सी ही 22 सदस्य देशांची एक आंतर-शासकीय संस्था आहे
 • युरोपियन अंतराळ संस्था स्थापना: 1975  
 • युरोपियन अंतराळ संस्था मुख्यालय: पॅरिस

 

5. फिलिपिन्स देशाचा एफएटीएफ च्या करड्या यादीत समावेश

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_80.1

 • फिलिपिन्स देशाचा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या करड्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर हैती, माल्टा आणि दक्षिण सुदान या देशांना देखील करड्या यादीत टाकण्यात आले आहे.
 • आता या देशांना वर्षातून तीनदा एफएटीएफकडे प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक असेल. फिलिपाईन्सला 2000 साली या टाकण्यात आले होते पण नंतर 2005 साली त्याला या यादीतून काढण्यात आले होते.
 • एफएटीएफ च्या करड्या यादीत समावेश होणाऱ्या देशांना अधिकच्या नियंत्रणाखाली ठेवले जाते आणि त्यांना ठराविक कालावधीत धोरणात्मक निर्णय घेऊन सुधारणा करणे भाग असते.
 • एफएटीएफ काळी यादी:  या यादीत समावेश होणाऱ्या देशांना मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठाविरूद्धच्या जागतिक लढाईत असहकार करणारे देश म्हणून घोषीत करण्यात येते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

 • फिलिपिन्सचे अध्यक्ष: रॉड्रिगो दुतेर्ते
 • फिलिपिन्सची राजधानी: मनिला
 • फिलिपाईन्सचे चलन: फिलिपिन्स पेसो

 

6. चीनने जगातील दुसरे सर्वात मोठे जलविद्युत धरण सुरु केले

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_90.1

 • चीन सरकारने बायहात येथील जगातील दुसरे सर्वात मोठ्या जलविद्युत धरणातून उर्जा निर्मितीस सुरुवात केली आहे. हे धरण चीनच्या आग्नेय भागातील जिन्शा नदीवर उभारण्यात आले आहे. हे धरण 289 मीटर उंच असून ते दुहेरी-वक्रता कमानी पद्धतीचे आहे आणि त्यात उर्जा निर्मितीचे 16 युनिट्स आहेत.
 • प्रत्येक युनिटची क्षमता 1 दशलक्ष किलोवॅट असून हे धरण “थ्री गॉर्जेस धरणानंतर” दुसरे सर्वात मोठे धरण आहे, ज्याची एकूण क्षमता 22.5 दशलक्ष किलोवॅट आहे. दोन्ही धरणे राज्य सरकारच्या थ्री गॉर्जेज ग्रुप कॉर्पोरेशनने बांधली आहेत. ही जलविद्युत, सौर आणि पवन निर्मितीतील जगातील सर्वात मोठी गुंतवणूकदार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

 • चीनची राजधानी: बीजिंग
 • चीनचे चलन: रेन्मिन्बी
 • चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

 

नियुक्ती बातम्या

7. आयएफयुएनए अध्यक्षपदी शंभूनाथ श्रीवास्तव यांची नियुक्ती

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_100.1

 • अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि छत्तीसगडचे माजी प्रमुख लोकायुक्त निवृत्त न्यायाधीश शंभूनाथ श्रीवास्तव यांची इंडियन फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन (आयएफयूएनए) च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
 • इंडियन फेडरेशन ऑफ युनायटेड नेशन्स असोसिएशन ही संयुक्त राष्ट्र संघटना आणि तिच्या विशेष एजन्सीच्या उद्दीष्टांना प्रोत्साहन देणारी एक ना-नफा तत्त्वावर असलेली संस्था आहे. यूएनच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे विशेष सल्लागार म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

 

क्रीडा बातम्या

8. आयसीसी पुरूष टी -20 विश्व कप स्पर्धेचे आयोजन युएई मध्ये

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_110.1

 • आयसीसी पुरूष टी -20 विश्वकप स्पर्धा 2020 जी आधी भारतात होणार होती ती आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती ला भरविण्यात येणार आहे. या स्पर्धा जरी भारताबाहेर होणार असली तरी त्याचे आयोजन मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च करणार आहे.
 • ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी येथे होणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

 • बीसीसीआयचे सचिव: जय शाह
 • बीसीसीआयचे अध्यक्ष: सौरव गांगुली
 • बीसीसीआयचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
 • स्थापना: डिसेंबर 1928

 

9. क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारी शफाली वर्मा ठरली सर्वात तरुण भारतीय

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_120.1

 • ब्रिस्टल येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळतांना भारतीय सलामीवीर शफाली वर्मा क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारी सर्वात तरुण भारतीय आणि एकुणातील 5 वी सर्वात तरुण  खेळाडू ठरली आहे. तिचे सध्या वय 17 वर्षे आणि 150 दिवस आहे.
 • यात पहिल्या स्थानावर अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान हा 17 वर्षे आणि 78 दिवस. त्यानंतर इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलर. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद अमीर याचा क्रमांक लागतो.

 

10. भारतीय नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकले

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_130.1

 • आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या राही सरनोबतने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
 • सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत एक रौप्य व दोन कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय आहे. पात्रता फेरीत तिने 600 पैकी 591 गुणांची कमाई केली.
 • अंतिम सामन्यात फ्रान्सच्या मॅथिल्ले लॅमोलेने रौप्यपदक तर रशियच्या व्हिटालिना बटसरशकिना हिने कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाज मनु भाकरला 7 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकपूर्वीची ही शेवटची स्पर्धा आहे.आयएसएसएफ विश्वकप स्पर्धा 2021 क्रोएशियाच्या ओसीजेक येथे आयोजित करण्यात आली होती.

 

11. डोपींग चाचणीत दोषी आढळल्यामुळे बंदी मिळविणारी पहिली महिला क्रिकेटपटू: अंशुला राव

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_140.1

 • उत्तेजक पदार्थ सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे 4 वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागणारी मध्य प्रदेशची अष्टपैलू क्रिकेटपटू अंशुला राव पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
 • जुलै 2020 मध्ये झालेल्या चाचणीत दोषी आढळल्यामुळे नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीच्या (नाडा) पॅनेलने तिला बंदीची शिक्षा ठोठावली. यापूर्वी तिला बंदी घातलेल्या अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉइड ’19 – नॉरान्ड्रोस्टेरॉनचे’ सेवन केल्याबद्दलही दोषी ठरविण्यात आले होते.

 

पुस्तके आणि लेखक

12. “अ‍ॅनॉमलिज इन लॉ अँड जस्टीस” या पुस्तकाचे सीजेआय एन.व्ही.रामण्णा यांच्या हस्ते लोकार्पण

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_150.1

 • भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही.रामण्णा यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.व्ही. रवींद्रन यांनी लिहिलेल्या “अ‍ॅनॉमलिज इन लॉ अँड जस्टीस” ( कायदा आणि न्यायातील विषमता) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
 • या पुस्तकाद्वारे कायदा आणि कायदेशीर प्रणाली अद्याप विकसित होत आहे आणि प्रणालीमध्ये दीर्घकाळ टिकून राहिलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिक सजग विचारांची आवश्यकता आहे हे सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

 

महत्वाचे दिवस

13. 30 जून: आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_160.1

 • दरवर्षी 30 जून रोजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लघुग्रहांच्या संभाव्य आघाताबद्द्ल जनजागृती करणे आणि या आघातादरम्यान करावयाच्या संकटाच्या संप्रेषण कृतीबद्दल जनतेला माहिती देणे हा आहे.
 • 30 जून 1908 रोजी रशियन फेडरेशनच्या सायबेरिया येथील तुंगुस्का झालेल्या लघुग्रह आघाताच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने डिसेंबर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने एका ठरावाद्वारे 30 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन म्हणून पाळण्याचे ठरविले.
 • लघुग्रह एक लहान खडकाळ वस्तू असून मंगळ व गुरूच्या कक्षेदरम्यान आढळतात. त्यांचा आकार छोट्या दगडापासून ते 600 मैल लांब महाकाय खडकाएवढा असू शकतो. सूर्याला परिभ्रमण करीत असले तरी त्यांच्या लहान आकारामुळे त्यांना ग्रह मानण्यात येत नाही, ते सूर्यमालेतील उरलेले पदार्थ म्हणून ओळखले जातात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

 • युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन आउटर स्पेस अफेयर्स (यूएनओओएसए) चे संचालक: सायमोनेटा डी पिप्पो 

 

14. 30 जून: आंतरराष्ट्रीय संसादवाद दिवस

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_170.1

 • दरवर्षी 30 जून रोजी आंतरराष्ट्रीय संसादवाद दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हा दिवस संसदेने प्रातिनिधिक लोकशाहीत साध्य केलेल्या विविध उद्दिष्टांबद्दल आणि आत्म-आकलन करणे, अधिक महिला आणि तरूण खासदारांना सामावून घेण्यासह काम करणे आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची वेळ नवीन तंत्रज्ञान या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.
 • 1889 साली स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय आंतर-संसदीय संघटनेच्या स्थापनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र महासभेने 2018 साली या दिनाची घोषणा केली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:

 • आंतर-संसदीय संघाचे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड
 • आंतर-संसदीय संघाच्य अध्यक्षा: गॅब्रिएला कुएव्हस बॅरन
 • आंतर-संसदीय संघाची स्थापनः 1889
 • आंतर-संसदीय संघाचे सरचिटणीस: मार्टिन चुंगोंग

 

निधन बातम्या

15. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चलचित्रकार आणि दिग्दर्शक सिवन यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_180.1

 • चेमीन नावाच्या चित्रपटासाठी केलेल्या छायाचीत्रणामुळे प्रकाशझोतात आलेले मल्याळम चित्रपट सृष्टीतील विख्यात चलचित्रकार आणि दिग्दर्शक सिवन यांचे नुकतेच निधन झाले.
 • कारकीर्दीत त्यांना 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये अभयम, यागम, केशु, कोचू कोचू मोहनगल, ओरू यथ्रा, इत्यादींचा समावेश आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_200.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi-30 June 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-30 जून 2021_210.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.