Table of Contents
दैनिक चालू घडामोडी: 29 जून 2021
चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 29 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.
राष्ट्रीय बातम्या
- वित्तमंत्री सीतारमण यांनी रु.6,28,993 कोटी रुपयांचे कोव्हीड-19 राहत पॅकेज जाहीर केले
- कोव्हीड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे पिडीत लोकांना आणि व्यवसायांना उभारी देण्यासाठी केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारमण यांनी एकूण रु.6,28,993 कोटी रुपयांच्या 17 उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
- ते महामारीपासून आर्थिक दिलासा(8), सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण(1), वाढ आणि रोजगारासाठी प्रोत्साहन(8) अशा गटांत विभागता येतील.
महामारीपासून आर्थिक दिलासा:
1.कोव्हिड बाधित क्षेत्रांसाठी 1.10 लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजनाः आरोग्य क्षेत्राला- 50000 कोटी पर्यटन आणि इतर क्षेत्राला – 60000 करोड
2. आपत्कालीन क्रेडिट लाइन गॅरंटी योजनेसाठी (ईसीएलजीएस) अतिरिक्त 1.5 लाख कोटी रुपये
3. सूक्ष्म वित्तीय संस्थांसाठी कर्ज हमी योजना (नवीन) जास्तीतजास्त 1.25 लाखांपर्यंत बँकांच्या किमान कर्ज दरापेक्षा (एमसीएलआर) 2% अधिक व्याजदराने कर्ज
4. पर्यटक मार्गदर्शक आणि भागधारकांसाठी योजना:
- या योजनेत पर्यटन मंत्रालय आणि राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या 10700 गाईड्स चा आणि पर्यटन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या सुमारे 1 000 ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम स्टेकहोल्डर्स (टीटीएस) चा समावेश आहे.
- प्रत्येक टीटीएस 10 लाखांपर्यंत आणि प्रत्येक गाईड 1 लाखापर्यंत कर्ज उभारू शकतो
5. 500000 पर्यटकांना मोफत एक महिन्याचा पर्यटन व्हिसा
- या योजनेसाठी 100 करोड रुपये देण्यात आले आहेत
- ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत किंवा 5 लाख पर्यटन व्हिसा जारी होईपर्यंत (जे आधी होईल ते) सुरु राहील.
6. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा विस्तार (एएनबीआयवाय) या योजनेंतर्गत नोंदणीची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
7. डीएपी आणि पी अँड के खतांना अतिरिक्त अनुदान वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये पोषण आधारित अनुदान (एनबीएस) 42,275 कोटी रुपयांपर्यंत वाढविले.
8. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) मे 2021 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत मोफत धान्य वाटप या योजनेचा अंदाजे खर्च रु. 93,869 कोटी असेल.
सार्वजनिक आरोग्य बळकटीकरण:
वित्तीय वर्ष 2021-22 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आणि त्यातही बालकांचे आरोग्य आणि बाल आतोग्य सुविधा यावर भर देण्यासाठी 23,220 कोटी रुपयांची योजना
आर्थिक वाढ आणि रोजगारासाठी प्रोत्साहन:
1. हवामानबदलचा मुकाबला करू शकणाऱ्या नवीन प्रजातींचा वापर वाढविणे
2. पूर्वोत्तर प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ (नेरमॅक) चे पुनरुज्जीवन
3. नॅशनल एक्सपोर्ट इन्शुरन्स अकाउंट (एनईआयए) च्या माध्यमातून 5 वर्षांत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरीक्त 33000 कोटी रुपयांची तरतूद
4. एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (ईसीजीसी) मध्ये पाच वर्षांच्या कालावधीत निर्यात विमा संरक्षण क्षेत्राला इक्विटीद्वारे 88,000 कोटी रुपयांची गुंतवणूक
5. डिजिटल इंडिया:भारतनेट पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून प्रत्येक गावात ब्रॉडबँड सुविधा पोहोचविण्यासाठी रु.19,041 कोटी निधी.
6. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी पीएलआय योजनेचा कालावधी एका वर्षाने वाढवून 2025-26 पर्यंत केला.
7. रिफॉर्म-बेस्ड रिझल्ट-लिंक्ड पॉवर डिस्ट्रीब्यूशन योजनेसाठी 3.03 लाख कोटी रुपये
8. पीपीपी प्रकल्प आणि मालमत्ता विक्रीसाठी नवीन सुव्यवस्थित प्रक्रिया.
राज्य बातम्या
2. आंध्र प्रदेशने एसएएलटी कार्यक्रम सुरु केला
- आंध्र प्रदेशने सरकारी शाळांमध्ये पायाभूत शिक्षणात मुलभूत बदल करण्यासठी सपोर्टिंग आंध्राज लर्निंग ट्रान्सफॉर्मेशन (एसएएलटी) हा कार्यक्रम सुरु केला असून त्याला जागतिक बँकेने 250 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे.
- पायाभूत शिक्षण देणाऱ्या शाळांचे बळकटीकरण करणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे व कौशल्य विकास करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आंध्र प्रदेश राज्यात साधारण 40 लाख विद्यार्थी आणि 2 लाख शिक्षक आहेत.
कार्यक्रमाविषयी:
- हा कार्यक्रम 5 वर्षांचा असून महत्त्वपूर्ण उद्दीष्टे गाठल्यानंतरच जागतिक बँकेकडून कर्जाचे वितरण होणार आहे. सरकारने सर्व अंगणवाड्यांना पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये रूपांतरित करून जवळच्या शाळांशी जोडले आहे.
- आंध्र प्रदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), राज्य शिक्षण व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था (एसआयईएमएटी) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) या सारख्या संस्थांचे मजबुतीकरण करणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
- शाळांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार नवीन प्रशासकीय रचनाही स्थापन करीत आहे जसे एपी स्कूल एजुकेशन रेग्युलेटरी अॅन्ड मॉनिटरींग कमिशन.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री: वाय.एस. जगन मोहन रेड्डी
- आंध्र प्रदेशचे राज्यपाल: बिस्वा भूषण हरीचंदन
आंतरराष्ट्रीय बातम्या
3. अविश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी राजीनामा दिला
- संसदेत अविश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांनी 28 जून 2021 रोजी राजीनामा दिला. 63 वर्षीय लोफवेन अविश्वासदर्शक ठरावाद्वारे पराभूत झालेले स्वीडनचे पहिले शासकीय पुढारी आहेत. ते 2014 पासून स्वीडनचे पंतप्रधान होते.
- भाडे नियंत्रणे सुलभ करण्याच्या योजनेच्या निषेधार्थ डाव्या पक्षाने स्वत:च असा ठराव मांडण्याचे ठरविल्यानंतर स्वीडनचा अति-उजवा पक्ष स्वीडन डेमोक्रॅट असा ठराव मांडला.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- स्वीडनची राजधानी: स्टॉकहोम
- चलन: स्वीडिश क्रोना
4. युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान “सी ब्रीझ ड्रिल” सराव पार पडला
- अमेरिका आणि युक्रेन च्या दरम्यान “सी ब्रीझ ड्रिल” नावाचा नौदलाचा संयुक्त सराव काळ्या समुद्रामध्ये (ब्लॅक सी) पार पडला. दोन्ही देशांचे रशियाबरोबर असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा सराव महत्त्वाचा ठरतो.
- नुकेतच ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या एचएमएस डिफेन्डरने काळ्या समुद्रामधील क्रीमिया जवळून नौकानयन केले. रशियाने ब्रिटनच्या या कृतीचा निशेष केला आहे. सी ब्रीझ ड्रिल सराव 1997 पासून होत असून ही 21 वी खेप आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- युक्रेनचे अध्यक्ष: वोल्डीमायर झेलेन्स्की
- युक्रेनची राजधानी: कीव्ह
- युक्रेनचे चलन: युक्रेनियन रिव्निया
- यूएसची राजधानी: वॉशिंग्टन, डीसी
- युएसएचे अध्यक्ष: जो बिडेन
- यूएसचे चलन: युनायटेड स्टेट्स डॉलर
5. टर्की आणि अझरबैजान यांच्यादरम्यान बाकू येथे संयुक्त लष्करी सराव सुरु
- टर्की आणि अझरबैजान यांच्यादरम्यान बाकू येथे “मुस्तफा केमाल अतातुर्क- 2021” हा लष्करी सराव सुरु झाला आहे. या राष्ट्रांची संरक्षण सिद्धता वाढविण्याच्य हेतूने या सरावात सुमारे 600 जवान सहभागी होणार आहेत. दोन देशांमधील संरक्षण संवाद सुधारणे हा या सरावाचा उद्देश आहे.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- टर्कीचे अध्यक्ष: रेसेप तैयिप एर्दोगान
- टर्कीची राजधानी: अंकारा
- टर्कीचे चलन: तुर्की लीरा
- अझरबैजानची राजधानी: बाकू
- अझरबैजानचे पंतप्रधान: अली असडोव
- अझरबैजानचे अध्यक्ष: इल्हम अलीयेव्ह
- अझरबैजानचे चलन: अझरबैजान मॅनॅट
नियुक्ती बातम्या
6. प्रवीण सिन्हा यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती
- केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चे विशेष संचालक म्हणून प्रवीण सिन्हा यांच्या नियुक्तीस कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (एसीसी) मान्यता दिली आहे. संचालकांनंतर विशेष संचालक सीबीआयमधील दुसरे वरिष्ठ पद आहे.
- या आधी राकेश अस्थाना सीबीआयचे विशेष संचालक होते. सिन्हा हे गुजरात-केडरमधील 1988 तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत आणि याआधी त्यांना सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- केंद्रीय अन्वेषण विभाग, मुख्यालय: नवी दिल्ली
- केंद्रीय अन्वेषण विभाग, स्थापना: 1 एप्रिल 1963
7. ट्विटरने कॅलिफोर्नियास्थित जेरेमी केसल यांची भारतातील तक्रार (निवारण) अधिकारी म्हणून नियुक्ती केली
- नवीन माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत ट्विटरने, कॅलिफोर्नियास्थित जेरेमी केसल यांची भारतासाठी नवीन तक्रार (निवारण) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे.
- केसल ट्विटरचे ग्लोबल लीगल पॉलिसी डायरेक्टर (जागितक कायदेशीर धोरण संचलक) आहेत. तक्रार निवारण अधिकारी भारताचे रहिवासी असणे आवश्यक असल्याने ही नियुक्ती माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 ना धरून असल्याचे दिसत नाही.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जॅक डोर्सी
- ट्विटरची स्थापनाः 21 मार्च 2006
- ट्विटरचे मुख्यालय: सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
8. व्हॉट्सअॅपने भारतातील पेमेंट्स चे प्रमुख म्हणून महेश महात्मे यांची नियुक्ती केली
- व्हॉट्सअॅपने भारतातील पेमेंट्स व्यवJसायाच्या वाढीसाठी संचालक म्हणून माजी अॅमेझॉन कार्यकारी महेश महात्मे यांची नियुक्ती केली आहे. व्हॉट्सअॅप पेमेंट्स संचालक या नात्याने महात्मे ग्राहकांचा अनुभव सुधारणे, सेवेची गुणवत्ता सुधारणे या बाबींकडे लक्ष देतील.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- व्हॉट्सअॅपची स्थापना: 2009
- व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी: विल कॅथकार्ट
- व्हॉट्सअॅपचे मुख्यालय: मेनलो पार्क, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
- व्हॉट्सअॅपची अधिग्रहण तारीख: 19 फेब्रुवारी 2014
- व्हॉट्सअॅपचे संस्थापक: जान कौम, ब्रायन अॅक्टन
- व्हॉट्सअॅपची पालक संस्था: फेसबुक
पुरस्कार बातम्या
9. पत्रकार पी साईनाथ यांना जपानचा फुकुओका ग्रँड प्राइज पुरस्कार जाहीर
- पत्रकार पालागुम्मी साईनाथ यांना 2021 साठीचा जपानचा फुकुओका ग्रँड प्राइज पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानच्या फुकुओका शहर आणि फुकुओका सिटी इंटरनॅशनल फाऊंडेशनने स्थापित केलेला हा पुरस्कार आशियाई संस्कृती जपण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना देण्यात येतो.
- याव्यतिरिक्त इतर दोन पुरस्कार मिंग-किंग काळात चीनच्या सामाजिक-आर्थिक इतिहासामध्ये तज्ज्ञ असलेले जपानमधील इतिहासकार प्राध्यापक किशिमोतो मिओ यांना अकॅडमिक्स पुरस्कार देण्यात आला आणि थायलंडमधील लेखक आणि चित्रपट निर्माते प्रब्दा युन यांना कला व संस्कृती पुरस्कार देण्यात आला.
- साईनाथ यांचा जन्म चेन्नई येथे झाला असून त्यांनी द हिंदूचे संपादक म्हणून आणि ब्लिट्ज या राजकीय मासिकाचे उपसंपादक म्हणून काम पहिले आहे.
- त्यांना 1995 मध्ये पत्रकारितेसाठी युरोपियन कमिशनचा लोरेन्झो नताली पुरस्कार आणि 2000 साली अॅम्नेस्टी आंतरराष्ट्रीय ग्लोबल ह्युमन राईट्स जर्नालिझम पुरस्कार देण्यात आला.
- 2001 साली युनायटेड नेशन्स फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनचा बोरमा पुरस्कार आणि 2007 साली आशियाई पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.
- “एव्हरीबडी लव्हस् गुड ड्रॉट” हे त्यांचे प्रमुख पुस्तक असून टाइम्स ऑफ इंडिया मधील ‘द फेस ऑफ पुअर इंडिया’ या स्तंभातील 85 लेखांचा संग्रह आहे.
संरक्षण बातम्या
10. डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून ‘अग्नी-पी’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडीशाच्या बालासोर किनाऱ्याजवळील अब्दुल कलाम बेटावरून नव्या पिढीचे आण्विक-क्षमताधारित ‘अग्नी-पी (प्राईम)’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
- अग्नि-प्राइम हे अग्नि वर्गातील क्षेपणास्त्रांचा अद्ययावत प्रकार आहे. हे जमिनीवरून-जमिनीवर मारा करणारे असून त्याची भेदन कक्षा 1000 ते 2000 किमी आहे.
पुस्तके आणि लेखक
11. कौशिक बसू यांचे “पॉलिसीमेकर्स जर्नलः नवी दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी” हे पुस्तक प्रकाशित
- “पॉलिसीमेकर्स जर्नलः नवी दिल्ली टू वॉशिंग्टन डीसी” नावाचे कौशिक बसू लिखित पुस्तक प्रकाशित होणार आहे. कौशिक बसू यांच्या भारताचे मुख्य आर्थिक सल्लगार ते जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ पर्यंतचा प्रवास या पुस्तकात वाचायला मिळणार आहे.
- कौशिक बसू यांच्याविषयी: 2009- 2012 : युपीए च्या काळात भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार, 2012-2016: वॉशिंग्टन डीसी येथे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ, सध्या ते कॉर्नेल विद्यापीठातील अर्थशास्त्रचे प्राध्यापक आहेत
12. “काश्मिरी सेंचुरी: पोर्ट्रेट ऑफ अ सोसायटी इन फ्लक्स” हे पुस्तक प्रकाशित
- खेमलता वखलु यांनी लिहिलेले “काश्मिरी सेंचुरी: पोर्ट्रेट ऑफ अ सोसायटी इन फ्लक्स” हे पुस्तक नुकतेच प्रकशित झाले.
- त्या एक लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीय नेत्या असून जम्मू-काश्मीरमधील अनेक लोकांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी गेली 50 वर्षे प्रयत्नरत आहेत. या पुस्तकात काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
क्रीडा बातम्या
13. दीपिका कुमारीने जिंकले तिरंदाजी विश्वकप स्टेज 3 स्पर्धेत सुवर्णपदक
- पॅरिसमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वकपच्या तिसर्या टप्प्यात एका दिवसात तीन सलग तीन सुवर्ण पदकांची कमाई करून भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने नवीन विश्वविक्रम निर्माण केला.
- रांचीच्या दीपिकाने महिला रिकर्व्ह वैयक्तिक, संघ आणि मिश्र जोडी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. भारताने चार सुवर्णपदकांसह पदकतालिकेत प्रथम क्रमांक पटकाविला. चौथे सुवर्णपदक कंपाऊंड विभागात पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत अभिषेक वर्माने पटकावले.
महत्वाचे दिवस
14. 29 जून: आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिवस
- आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिवस हा दिवस दरवर्षी 29 जून रोजी संयुक्त राष्ट्र संघाकडून पाळण्यात येतो. उष्ण कटिबंधीय क्षेत्रात असलेली असामान्य विविधता आणि या प्रदेशात असलेल्या देशांसमोरील आव्हाने आणि संधी अधोरेखित करण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो.
- आघाडीच्या बारा उष्णकटिबंधीय संशोधन संस्थांमार्फात ‘उष्ण कटिबंध स्थिती अहवाला’ ची पहिली आवृत्ती 29 जून 2014 साली प्रकाशित करण्यात आली.
15. 29 जून : राष्ट्रीय सांख्यिकी दिन
- प्रा. पी सी महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकार दरवर्षी 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून आयोजित करते.
- सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीसाठी सांख्यिकी असलेले महत्त्व तरुणांना पटवून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. दैनंदिन आयुष्यात सांख्यिकी चा वापर आणि महत्त्व वाढविणे हा देखील या दिवसाचा उद्देश आहे.
- 2021 ची संकल्पना: “एसडीजी 2 – उपासमार दूर करणे, अन्नसुरक्षा प्राप्त करणे, पोषणात वाढ करणे व शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे.”
- हा दिवस पहिल्यांदा 29 जून 2007 रोजी साजरा करण्यात आला. दिवंगत प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी आर्थिक नियोजन आणि सांख्यिकीय विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा विचार करून भारत सरकारने हा दिवस पाळण्याचे ठरविले.
- 29 जून 1893 रोजी जन्मलेले प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस भारतीय सांख्यिकीचे जनक म्हणून ओळखले जातात. दोन डेटा सेटचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी सुचविलेल्या उपायांना महालनोबिस अंतर (महालनोबिस डिस्टन्स) म्हणून ओळखले जातात.
- ते नियोजन आयोगाचे (1956-1961) दरम्यान सदस्य होते आणि त्यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी दोन-क्षेत्रातील इनपुट-आउटपुट प्रारूप दिले जे नंतर नेहरू-महालनोबिस प्रारूप म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी डिसेंबर 1931 मध्ये भारतीय सांख्यिकी संस्था (आयएसआय) ची स्थापना कोलकाता येथे केली.
- त्यांना पद्म विभूषण (1968), ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून वेल्डन मेमोरियल पुरस्कार (1944) रॉयल सोसायटी, लंडनचे फेलो (1945) इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा