Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-2 July...

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_30.1

 

दैनिक चालू घडामोडी: 2  जुलै 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 2 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या

 1. डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्षे पूर्ण

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_40.1

 • 1 जुलै 2021 रोजी डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्षे पूर्ण झाली. डिजिटल इंडिया ही सरकारची डिजिटल सशक्त समाज निर्माण करण्यासाठीची आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत वृद्धी करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे.
 • या कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2015 ला केली होती. मागील 6 वर्षांत या प्रकल्पाअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण, कॉमन सर्व्हिसेस सेंटर, डिजीलॉकर आणि मोबाइल-आधारित उमंग सेवा या सारखे अनेक उपक्रम सुरु केले आहेत.
 • जनधन बँक खाती, मोबाइल फोन आणि आधार (जेएएम) ने सरकारला डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विविध योजनांचा लाभ देण्यास मदत केली

प्रमुख दृष्टीकोन: 

 • प्रत्येक नागरिकासाठी मुख्य उपयुक्तता म्हणून डिजिटल पायाभूत सुविधा
 • मागणीनुसार शासन आणि सेवा
 • नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण

 

राज्य बातम्या

2. उत्तराखंडच्या जंगलांमध्ये संशोधकांना आढळला कृष्ण-उदर कोरल सर्प 

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_50.1

 • संशोधकांना इतिहासात प्रथमच उत्तराखंडच्या जंगलांमध्ये कृष्ण-उदर प्रवाळ सर्प आढळला आहे. हा साप इलापिडा कुटुंब आणि सायनोमिक्रस वर्गातील असून त्याचे शास्त्रीय नाव एस निग्रिव्हेंटर असे आहे.
 • मसूरी वनविभागातील बेनोग वन्यजीव अभयारण्य (बीडब्ल्यूएस) च्या भदराज विभागात तो आढळून आला. सध्या जगात एकूण प्रवाळ सर्पांच्या एकूण 107 जाती असून भारतात केवळ 7 जाती आढळतात.
 • सर्पदंशाच्या उपचार व्यवस्थापनावरील आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार जगभरात 2000 हून अधिक सापांच्या जाती आहेत.
 • त्यातील सुमारे 300 भारतात आढळतात आणि त्यापैकी साधारण 52 प्रकारचे साप विषारी आहेत. भारतातील विषारी साप ‘एलापिडे’, ‘व्हिपरिडे’ आणि हायड्रोफिडी ’(समुद्री साप) या तीन कुटुंबातील आहेत.
 • वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या अनुसूची II अन्वये कोब्रा, रॅट स्नेक आणि चेकर्ड केलबॅक सर्प  संरक्षित आहेत आणि बाकीचे सर्व सर्प  अनुसूची IV अन्वये संरक्षित आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

 • उत्तराखंडचे मुख्यमंत्री: तीरथसिंग रावत
 • उत्तराखंडच्या राज्यपाल: बेबी राणी मौर्य

 

3. आंध्रप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी ‘वायएसआर बिमा’ योजना सुरु केली

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_60.1

 • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी नवीन मार्गदर्शक सूचनांसह ‘वायएसआर बिमा’ योजना सुरू केली असून विम्याचा दावा सुलभ होण्याकरिता मृताच्या कुटुंबाला सरकार थेट रक्कम देणार आहे.
 • वायएसआर विमा योजनेमार्फत 1.32 लाख कुटुंबांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने सन 2021-22 मध्ये 750 कोटी रुपये खर्च केले असून मागील दोन वर्षांत वायएसआर बिमा योजनेसाठी  राज्य सरकारने 1307 कोटी रुपये खर्च केले आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री: वाय.एस. जगन मोहन रेड्डी
 • राज्यपाल: बिस्व भूषण हरीचंदन

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

4. जागतिक बँकेने कोरोनाविषाणू प्रतिबंधक लसीसाठीचे आर्थिक सहाय्य $20 अब्ज पर्यंत वाढविले

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_70.1

 • जागतिक बँकेने कोव्हीड-19 लसीकरणासाठी विकसनशील देशांना अतिरिक्त 8 अब्ज डॉलर्स अर्थसहाय्य घोषीत केले आहे त्यामुळे आता एकूण अर्थसहाय्य 20 अब्ज डॉलर्स इतके होणार आहे.
 • हा निधी पुढील 18 महिन्यांसाठी 2022 पर्यंत वापरण्यात येईल. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपॅस यांनी अतिरिक्त लससाठा असणाऱ्या सर्व देशांना तो विकसनशील देशांना वापरण्याकरिता उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.
 • त्याव्यतिरिक्त जागतिक बँकेने 51 विकसनशील देशांकरिता, ज्यातील अर्ध्याहून अधिक देश आफ्रिका खंडातील आहेत, कोव्हीड  लस विक्री आणि वितरणासाठी अतिरिक्त 4 अब्ज डॉलर्स चा निधी उभा केला आहे.

5. राफेलने 300 किमी भेदन कक्षेचे सी ब्रेकर एआय क्षेपणास्त्राचे अनावरण केले

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_80.1

 • इस्त्रायली संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी राफेल अ‍ॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टम्सने सी ब्रेकर या 5 व्या पिढीच्या क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे.
 • हे क्षेपणास्त्र स्वायत्त, सुस्पष्ट-मार्गदर्शित प्रणाली असून 300 किलोमीटरपर्यंतच्या समुद्री व जमिनीवरील लक्ष्य निश्चितपणे भेदू शकते. हे क्षेपणास्त्र विविध माध्यमाद्वारे प्रक्षेपित करता येऊ शकते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

 • इस्त्राईलचे पंतप्रधान: नफ्ताली बेनेट
 • इस्त्राईल राजधानी: जेरुसलेम
 • चलन: इस्रायली शेकेल

 

अर्थव्यवस्था बातम्या

6. चालू आर्थिक वर्षात भारताच्या चालू खात्यावर ०.9% चे अधिक्य

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_90.1

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, वित्तीय वर्ष 2021 मध्ये भारताच्या चालू खात्यावर जीडीपीच्या 0.9% अधिक्य (करंट अकाऊंट सरपल्स) आहे.
 • याचे कारण म्हणजे भारताच्या व्यापार तुटीत झालेली प्रचंड घट. भारताची व्यापार तूट (ट्रेड डेफिसिट) 2019-20 साली $157.5 अब्जावरून 2020-21 साली $102. 2 अब्जापर्यंत घसरली.  भारताने 17 वर्षांत प्रथमच चालू खात्यावर अधिक्य अनुभवले आहे.

चालू खात्यावरील अधिशेष / तूट ही निर्यात आणि आयात यातील फरक आहे

 • चालू खात्यावरील अधिशेष = निर्यात > आयात
 • चालू खात्यावरील तूट = आयात > निर्यात

बँकिंग बातम्या

7. स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपला 66 वा वर्धापनदिन साजरा केला

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_100.1

 • एसबीआय ही देशातील सर्वात जुनी व्यावसायिक बँक असून ती 1 जुलै रोजी आपले 66 वा स्थापनादिन  साजरा करीत आहे. एसबीआय ही पूर्वाश्रमीची 1806 साली स्थापन झालेली बँक ऑफ कलकत्ता होती नंतर तिचे रुपांतर इम्पेरिअल बँकेत झाले. 
 • बँक ऑफ मद्रास अन्य दोन प्रांतीय बँकाकलकत्ता बँक आणि मुंबई बँकेत विलीन होऊन इम्पेरिअल बँक तयार झाली तिचे 1 जुलै 1955 ला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रुपांतर झाले.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

 • एसबीआय अध्यक्ष: दिनेशकुमार खारा
 • एसबीआय मुख्यालय: मुंबई
 • एसबीआय स्थापना: 1 जुलै 1955

8. दुसऱ्या तिमाहीमध्ये सरकारने लघु-बचत योजनांवरील व्याज दर कायम ठेवले 

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_110.1

 • 2021-22 च्या दुसर्‍या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) लघु बचत योजनांवरील व्याज दर 2021-22 च्या पहिल्या  तिमाहीपेक्षा (एप्रिल-जून) बदलणार नाही , अशी घोषणा भारत सरकारने केली आहे.
 • सरकार लघू  बचत योजनांचे व्याज दर तिमाही आधारावर अधिसूचित करते.
 • 2021-22 च्या दुसर्‍या तिमाहीसाठी विविध व्याजदर पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

व्यवसाय बातम्या

9. फ्लिपकार्टने 25 लाखाहून अधिक ऑनलाईन उद्योजकांना सक्षम करण्यासाठी शॉपसी सुरू केले

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_120.1

 • कोणत्याही गुंतवणूकीशिवाय स्वत:चा ऑनलाईन उद्योग सुरु करणाऱ्या उद्योजकांसाठी  फ्लिपकार्टने शॉपसी नावाचे एक अ‍ॅप सुरु केले आहे.
 • फ्लिपकार्टने 2023 पर्यंत शॉपसीच्या सहाय्याने 25 दशलक्ष ऑनलाईन उद्योजकांना सक्षम करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. फ्लिपकार्ट विक्रेत्यांनी ऑफर केलेल्या 15 कोटी उत्पादनांचा विस्तृत कॅटलॉग शॉपसीचे वापरकर्ते सामायिक करण्यास सक्षम असतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • फ्लिपकार्ट मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक
 • फ्लिपकार्ट सीईओ: कल्याण कृष्णमूर्ती

बँकिंग बातम्या

10. आयसीआयसीआय बँकेने डॉक्टरांसाठी ‘सॅल्यूट डॉक्टर’ हे बँकिंग सोल्यूशन्स सुरू केले

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_130.1

 • आयसीआयसीआय बँकेने वैद्यकीय डॉक्टरांकरिता भारतातील सर्वात व्यापक बँकिंग सोल्यूशन बाजारात आणले आहे. ‘
 • सॅल्यूट डॉक्टर’ असे नाव असलेल्या या सोल्यूशनमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यापासून ज्येष्ठ वैद्यकीय सल्लागारापर्यंत ते रुग्णालयाच्या मालकापर्यंत सर्वांसाठी मूल्यवर्धित बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत.
 • या उपक्रमाचे संचालन आयसीआयसीआय स्टॅक या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे केले गेले आहे जे जवळजवळ 500 प्रकारच्या सेवा प्रदान करते. या सोल्यूशनद्वारे डॉक्टरांना वयक्तिक तसेच व्यावसायिक सेव प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • आयसीआयसीआय बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
 • आयसीआयसीआय बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी
 • आयसीआयसीआय बँक टॅगलाइनः हम है ना, ख्याल आपका

11. एचडीएफसी बँकेने ‘सलाम दिल से’ हा उपक्रम सुरू केला 

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_140.1

 • देशभरातील डॉक्टरांना अभिवादन करण्यासाठी, कोव्हीड महामारी दरम्यान डॉक्टरांनी केलेल्या  अथक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एचडीएफसी बँकेने ‘सलाम दिल से’ हा उपक्रम सुरू केला आहे.
 • या उपक्रमाचा एक भाग म्हणून, बँकेने www.salaamdilsey.com एक वेब प्लॅटफॉर्म तयार केला आहे ज्यामध्ये सामान्य लोक जाऊन डॉक्टरांसाठी धन्यवाद संदेश सामायिक करू शकतात आणि ई-मेल, सामाजिक माध्यमांद्वारे शेअर करू शकतात.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

 • एचडीएफसी बँकेचे मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
 • एचडीएफसी बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: शशिधर जगदीशन
 • एचडीएफसी बँकेची टॅगलाइनः आम्हाला आपले जग समजते (वी अंडरस्टँड युअर वर्ल्ड)

 

संरक्षण बातम्या

12. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने दक्षिण कोरियच्या जहाजासह संयुक्त सैन्य सराव केला 

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_150.1

 • पूर्व चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचा दक्षिण कोरियच्या जहाजासह संयुक्त सैन्य सराव पार पडला.
 • 28 जून रोजी स्वदेशी बनावटीची भारतीय युद्धनौका एएसडब्ल्यू कॉर्वेट आयएनएस किल्टन आणि कोरिया प्रजासत्ताकच्या नौसेनेचे आरओकेएस गेओंगनम या डेगू-क्लास फ्रिगेट हे जहाज या सरावात सामील झाले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • नौदलप्रमुख: अ‍ॅडमिरल करंबीर सिंह
 • भारतीय नौदलाची स्थापनाः 26 जानेवारी 1950

 

13. ग्रीन रोबोटिक्सने विकसित केला भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रोन डिफेन्स डोम ‘इंद्रजाल’

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_160.1

 • हैदराबादस्थित ग्रीन रोबोटिक्सने भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रोन डिफेन्स डोम ‘इंद्रजाल’ विकसित केले आहे.
 • हवाई हल्य्यांपासून सुमारे 1000-2000 चौरस किलोमीटर क्षेत्राचे स्वायत्तपणे संरक्षण करण्यास हे ड्रोन डिफेन्स डोम सक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.
 • हे मानवरहित हवाई विमान(यूएव्ही) आणि लो-रडार क्रॉस सेक्शन (आरसीएस) सारख्या हवाई हल्ल्यांचे मूल्यांकन करून त्यावर कार्य करून या क्षेत्राचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. वायुसेनेच्या जम्मू विमानतळावरील नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्शभूमीवर हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे.

इंद्रजाल ची वैशिष्ट्ये:

 • कायमस्वरूपी प्रसंगनिष्ठ जागरूकता
 • इंटिग्रेटेड आणि इंटेलिजेंट नेटवर्क
 • 9-10 तंत्रज्ञानाचे संक्रमित संयोजन
 • 24 × 7 सतत आणि स्वायत्त देखरेख, कृती आणि ट्रॅकिंग

महत्वाचे दिवस

14. 02 जुलै: जागतिक क्रीडा पत्रकारिता दिवस

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_170.1

 • दरवर्षी 2 जुलै रोजी  स्तरावर जागतिक क्रीडा पत्रकारिता दिवस पाळण्यात येतो. या दिवसाचे उद्दिष्ट हे क्रीडा पत्रकारांच्या कार्याचा अभिस्वीकार करणे आणि त्यांना अधिक उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहन देणे हे आहे. क्रीडा पत्रकारितेतील व्यवसायातील मानके राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ ही संघटना कार्य करते.
 • 1994 साली आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघाच्या (एआयपीएस70 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने या दिवसाची सुरुवात झाली. एआयपीएस ही संघटना 2 जुलै 1924 रोजी पॅरिसमधील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान स्थापन करण्यात आली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • एआयपीएसचे मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड
 • एआयपीएसचे अध्यक्ष: जियानी मेर्लो 

 

15. 02 जुलै: जागतिक यूएफओ दिवस

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_180.1

 • दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक स्तरावर जागतिक यूएफओ दिवस (डब्ल्यूयूडी) साजरा केला जातो.
 • हा दिवस जागतिक यूएफओ डे संस्थे (डब्ल्यूयूएफओडीओ) द्वारे अज्ञात उडणाऱ्या वस्तूंच्या [अनआयडेन्टिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स (यूएफओ)] च्या अस्तित्वाला मान्यता देण्यासाठी समर्पित आहे.

 

निधन बातम्या

16. भारताचे माजी फुटबॉलपटू प्रसन्नन यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi-2 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-2 जुलै 2021_190.1

 • माजी भारतीय फुटबॉलपटू एम प्रसन्नन यांचे निधन झाले आहे. 1970 च्या दशकात ते मधल्या फळीतील खेळाडू म्हणून इंद्रसिंग आणि दोराईस्वामी नटराज यांच्यासारख्या भारतीय फुटबॉलच्या दिग्गजांसह खेळले होते.
 • संतोष ट्रॉफी, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ते केरळ, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांकडून खेळले.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!