Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi |...

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_30.1

 

दैनिक चालू घडामोडी: 16 जून 2021

 

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 16 जून 2021 चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातमी

  1. डॉ. हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 ला संबोधित केले.

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_40.1

  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी जागतिक योग परिषद 2021 च्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले. 21 जून 2021 रोजी होणार्‍या 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांच्यासमवेत ‘मोक्षयतन योग संस्थान’ या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
  • डॉ. हर्ष वर्धन यांनी योगाने कशाप्रकारे कोव्हीड महामारीच्या काळात लोकांना सहाय्य केले आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात, तसेच मानसिक ताणतणाव कमी करण्यास कशी मदत केली यावर प्रकाश टाकला.

 

राज्य बातम्या

2. ओडीशाचा प्रसिद्ध राजा परबा उत्सव साजरा करण्यात आला

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_50.1

  • राजा परबा हा एक तीन दिवसीय अद्वितीय उत्सव असून ओडिशा राज्यात साजरा केला जातो ज्यात मान्सून चे आगमन आणि पृथ्वीचे स्त्रीत्व साजरे केले जाते. या काळात धरती माता किंवा भूदेवी मासिक पाळीतून जाते अशी धारणा आहे. या तीन दिवसात स्त्रिया कोणतेही काम करत नाही आणि चौथा दिवस  शुद्धीस्नानाचा असतो.
  • हा उत्सव विविध पिठांचा देखील मानला जातो आणि यामुळे ओडिशा पर्यटन विकास महामंडळाने “पीठा ऑन व्हील्स” नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘पोडा पीठा’, ‘मंडा’, ‘काकरा’, ‘अरिशा’, ‘चाकुली’ आणि ‘चंद्रकला’ यासारखे विविध प्रकारचे पीठे “पीठा ऑन व्हील्स” दरम्यान  उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पारंपारिक पीठे विकणारी ही वाहने भुवनेश्वर, कटक आणि संबलपूर येथे ठेवण्यात आली आहेत.
  • ओडिशा राज्यातील इतर महोत्सव –कलिंग महोत्सव, चंदन यात्रा, कोणार्क नृत्य महोत्सव, मघा सप्तमी, छाऊ उत्सव, नौखाई, चतर जत्रा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • ओडिशाचे मुख्यमंत्री – नवीन पटनाईक 
  • ओडिशाचे राज्यपाल – गणेशी लाल

 

आंतरराष्ट्रीय बातम्या

3. युएई, ब्राझील, अल्बानिया, गॅबॉन आणि घाना यांची युएनएससी वर निवड

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_60.1

  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने युएई, ब्राझील, अल्बानिया, गॅबॉन आणि घाना यांची 2022-23 या काळाकरिता अस्थायी सदस्य म्हणून निवड केली आहे. भारत, आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाची मुदत 1 जानेवारी 2021 पासून  सुरु झाली आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद स्थापना: 24 ऑक्टोबर 1945.

 

4. नाटो गटाच्या नेत्यांनी चीनला जागतिक सुरक्षा आव्हान म्हणून घोषित केले

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_70.1

  • नाटो गटाच्या नेत्यांनी हे जाहीर केले की चीन हा कायमच सुरक्षेला आव्हान आहे आणि जागतिक सुव्यवस्था बिघडविण्याचे कार्य करीत आहे. हा संदेश म्हणजे अमेरिकेचा चीनच्या व्यापार, सैन्य आणि मानवाधिकार पद्धती विषयी संघटीत आवाज उठवण्याचा प्रयत्न आहे.

 

अर्थव्यवस्था बातम्या

5. घाऊक किंमत निर्देशांक मेमध्ये 12.94 % च्या उच्चांकापर्यंत पोहोचला

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_80.1

  • कच्च्या तेलाच्या आणि उत्पादित वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे मे मध्ये घाऊक किंमत निर्देशांकाची पातळी विक्रमी  12.94 % पर्यंत पोहोचली. कमी बेस इफेक्ट मुळे देखील, मे 2021 मध्ये डब्ल्यूपीआय आधारित महागाई वाढलेली दिसते.
  • मे 2020 मध्ये घाऊक किंमत निर्देशांक -3.37 % होता ते एप्रिल 2021 मध्ये तो 10.94% या दोन अंकी संख्येवर पोहोचला.घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई वाढण्याचा हा सलग पाचवा महिना आहे.

 

नियुक्ती बातम्या

6. मुकेश शर्मा यांची WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाचे मानद सदस्य म्हणून नियुक्ती

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_90.1

  • आयआयटी कानपूर येथील प्राध्यापक मुकेश शर्मा यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक वायु प्रदूषण आणि आरोग्य – तांत्रिक सल्लागार गट (जीएपीएच-टॅग) चे मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुकेश शर्मा स्थापत्य अभियांत्रिकी विभागाशी संबंधित आणि हवा गुणवत्ता तज्ज्ञ आहेत.
  • तांत्रिक सल्लागार गट डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी आणि वायू प्रदूषण आणि आरोग्यविषयक समस्येमध्ये कार्य करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि माहिती प्रदान करणारी एक सल्लागार संस्था आहे.
  • हा गट सदस्य राष्ट्रांना त्यांची शाश्वत विकास ध्येये (SDGs) 3.9.1, 7.1.2 आणि 11.6.2. पूर्ण करण्यासाठी सहाय्य करतो.

 

समिट आणि कॉन्फरन्स बातम्या

7. 2021 ची नाटो ची शिखर परिषद 2021 बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये पार पडली

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_100.1

  • उत्तर अटलांटिक करार संस्था (नाटो) च्या नेत्यांची नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे शिखर परिषद पार पडली. ही नाटोची 31 वी औपचारिक भेट ठरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पदभार ग्रहण केल्यानंतरच्या पहिल्या विदेश दौऱ्याचा एक भाग म्हणून 30 सदस्यीय नाटो गटाची ही परिषद होती.
  • भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युती कायम राहील याची खात्री करण्यासाठी सर्वसमावेशक उपक्रम “नाटो 2030” च्या अजेंडावर सर्व नेत्यांनी सहमती दर्शविली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नाटोचे मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम
  • नाटो लष्करी समितीचे अध्यक्ष: एअर चीफ मार्शल स्टुअर्ट पीच
  • स्थापना: 4 एप्रिल 1949
  • सदस्य: 30 

 

रँक आणि अहवाल

8. जागतिक दानशूरता निर्देशांका मध्ये भारत 14 व्या स्थानी

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_110.1

  • चॅरिटीज एड फाउंडेशन (सीएएफ) द्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जागतिक दानशूरता निर्देशांका मध्ये भारत 114 देशांमध्ये 14 व्या स्थानावर आहे. या निर्देशांकात इंडोनेशिया पहिल्या स्थानावर आणि त्यानंतर अनुक्रमे  केनिया, नायजेरिया, म्यानमार आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश आहेत.
  • चॅरिटीज एड फाउंडेशन (सीएएफ) ही संस्था युनायटेड किंगडम या देशात असून लोकांचे आयुष्य सुकर करणे आणि दानशूरतेला प्रोत्साहन देण्याचे कार्य करते.

 

बँकिंग बातम्या

9. फेडरल बँकेने इन्फोसिसला ओरॅकल सीएक्स च्या अंमलबजावणीसाठी सूचीबद्ध केले आहे

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_120.1

  • ओरॅकल सीएक्स (कस्टमर एक्सपीरियन्स) व्यासपिठाद्वारे ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी फेडरल बँकेनेओरॅकल आणि इन्फोसिस यांच्यासह सामरिक भागीदारीचा विस्तार केला आहे.
  • या भागीदारीचा उद्देश विपणन, विक्री, ग्राहक सेवा आणि सामाजिक अभिप्राय या द्वारे एक सर्वसमावेशक आणि एकात्मिक ग्राहक सबंध व्यवस्थापन (सीआरएम) यंत्रणा उभारून फेडरल बँकेचे अधिक सुसज्ज करणे आणि  एक माहिती आधारित, उत्कृष्ट ग्राहक निर्माण करणे हा आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकार: श्याम श्रीनिवासन 
  • फेडरल बँकेचे मुख्यालय: अलुवा, केरळ 

विज्ञान आणि तंत्रज्ञान

10. आयआयटी रोपरने भारताचे पहिले वीज मुक्त सीपीएपी उपकरण ‘जीवन वायू’ विकसित केले

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_130.1

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था, (आयआयटी) रोपर ने ‘जीवन वायु’ नावाचे एक उपकरण तयार केले आहे ज्याचा उपयोग कन्टीन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) यंत्राला पर्याय म्हणून करता येऊ शकतो. जीवन वायू 60 लिटर प्रति मिनिट (एलपीएम) पर्यंत उच्च प्रवाह ऑक्सिजन वितरीत करू शकते.
  • विद्युतधारेशिवाय काम करणारे हे भारतातील पहिले असे उपकरण आहे आणि हे ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या O2 सिलेंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन या दोन्ही प्रकारच्या युनिट्स मध्ये काम करू शकते.
  • या तरतुदी विद्यमान सीपीएपी यंत्रामध्ये उपलब्ध नव्हत्या. झोपेदरम्यान श्वासोच्छवासाची बंद होण्याची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सीपीएपी थेरपी ही एक उपचार पद्धती आहे.

क्रीडा बातम्या

11. कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_140.1

  • भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पोलंड खुल्या स्पर्धेमध्ये मध्ये 53 किलो वजनीगटात सुवर्णपदक जिंकले. तिने यापूर्वी, मॅटिओ पेलिकॉन स्पर्धा (मार्च) आणि आशियाई चँपियनशिप (एप्रिल) स्पर्धेत सुवर्णपदक जिंके आहे.
  • तिने अंतिम फेरीत युक्रेनच्या क्रिस्टीना बेरेझा हिचा पराभव केला. तत्पूर्वी, भारतीय कुस्तीपटू अंशु मलिकने तापामुळे 57 किलो वजनी गटाच्या  स्पर्धेतून माघार घेतली.

 

महत्वाचे दिवस

12. कुटुंबाला पैसे पाठविणे आंतरराष्ट्रीय दिवस: 16 जून

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_150.1

  • आंतरराष्ट्रीय कुटुंबाला पैसे पाठविणे दिन (आयडीएफआर) संयुक्त राष्ट्र महासभेने स्वीकारला आणि 16 जून रोजी साजरा केला जातो. 16 जून, 2015 रोजी प्रथम कुटुंबाला पैसे पाठविणे दिवस साजरा करण्यात आला.

 

13. जागतिक वायू दिवस: 15 जून

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_160.1

  • पवन उर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक वायू दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन उर्जा परिषदे(GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.
  • आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्था (IRENA) च्या मते, पवन ऊर्जा ही जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांपैकी एक आहे. भारत 2021-25 दरम्यान 20GW पवन उर्जेची स्थापना करणार आहे. सद्यस्थितीत भारतामध्ये एकूण स्थापित पवनउर्जेची क्षमता 38.7878 GW आहे. सर्वाधिक स्थापित पवनउर्जा क्षमतेत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • जागतिक पवन उर्जा परिषदे(GWEC) मुख्यालय: ब्रुसेल्स, बेल्जियम
  • स्थापना : 2005

विविध बातम्या

14. फेसबुकने ‘रिपोर्ट इट, डोन्ट शेअर इट’ उपक्रम सुरु केला

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_170.1

  • फेसबुकने ‘रिपोर्ट इट, डोन्ट शेअर इट’ उपक्रम सुरु केला ज्यात लोकांना फेसबुकवरील बाल शोषण माहिती नोंदविण्यासाठी आणि इतरांना न पाठवण्यासाठी प्रोस्ताहित केले जाणार आहे. हा उपक्रम  आरंभ इंडिया इनिशिएटिव्ह, सायबर पीस फाउंडेशन आणि अर्पण यांसारख्या सामाजिक संस्थांच्या सहाय्याने चालवला जाणार आहे.
  • हा उपक्रम अ‍ॅनिमेटेड व्हिडिओसह आणला गेला होता जो बालशोषणाच्या सामग्रीच्या अभिसरणांमुळे अशा सामग्रीचा विषय असलेल्या मुलावर होणारा नकारात्मक प्रभाव दृश्यास्पदपणे संप्रेषित करतो.
  •  एखाद्या मुलास जोखीम आहे तेथे सामग्रीचा अहवाल देण्यासाठी 1098 वर कॉल करा आणि चाईल्डलाइन इंडिया फाऊंडेशनला कळवा.  जर फेसबुकच्या अॅप्सच्या कुटुंबावर सामग्री अस्तित्वात असेल तर ती fb.me/onlinechildprotication वर नोंदविली जाऊ शकते.
  • इन्स्टाग्रामवर ‘फ्रीडम टू फीड’ ही कम्युनिटी चालविणारी बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाबरोबरही फेसबुकने भागीदारी केली, जे स्त्रियांना स्तनपानाविषयी बोलण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे आणि त्याभोवतीच्या आव्हानांविषयी मुक्त संवाद आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे:

  • फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मार्क झुकरबर्ग
  • फेसबुक मुख्यालय: कॅलिफोर्निया, यूएस

 

15. आरबीआयने भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे मोबाइलचे प्रीपेड रिचार्ज करण्यास परवानगी दिली

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_180.1

  • आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ‘बिलर कॅटेगरी’ म्हणून ‘मोबाइल प्रीपेड रिचार्ज’ जोडून यावर्षी 31 ऑगस्टपर्यंत भारत बिल पेमेंट सिस्टमची (बीबीपीएस) व्याप्ती वाढविली जाईल.
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारा चालविण्यात येणाऱ्या नेहमीच्या बिलांचे पेमेंटसाठी बीबीपीएस हे एक अंतरसंचालीत व्यासपीठ आहे. बीबीपीएसची नेहमीचे बिल भरण्याचे चे व्यासपीठ म्हणून 2014 मध्ये सुरूवात केली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: दिलीप आसबे
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय: मुंबई 
  • नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना: 2008

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_190.1

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_210.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi | 16 June 2021 Important Current Affairs In Marathi_220.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.