Marathi govt jobs   »   Daily Current Affairs In Marathi-16 July...

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_30.1

दैनिक चालू घडामोडी: 16   जुलै 2021

चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 16 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.

 

राष्ट्रीय बातम्या 

 1. पंतप्रधान मोदींनी कौशल्य भारत अभियानाच्या 6 व्या वर्धापनदिनानिमित्त संबोधित केले

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_40.1

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2021 रोजी जागतिक युवा कौशल्य दिन 2021 आणि कौशल्य भारत अभियानाच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाला संबोधित केले.
 • आपल्या भाषणात पंतप्रधानांनी “नव्या पिढीतील तरुणांचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज असून स्वावलंबी भारतासाठी तो एक मोठा पाया आहे” असे प्रतिपादन केले.
 • उद्यमशीलता वाढविण्याच्या उद्देशाने 40 कोटी भारतीयांना कौशल्य प्रदान करणे आणि 2022 पर्यंत अनेक योजना आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या मदतीने एक सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जात आहे.

 

 2. मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचे अदानी समूहाकडे हस्तांतर

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_50.1

 • गौतम अदानी यांच्या नेतृत्वातखालील अदानी समूहाने जीव्हीके समूहाकडून ‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ व्यवस्थापनाचे अधिग्रहण केले आहे.
 • या अधिग्रहणामुळे अदानी समूह भारतातील विमानतळ पायाभूत सुविधा कंपन्यांच्या बाबतीत प्रमुख कंपनी बनला आहे.
 • अशा प्रकारे, अदानी समूह आता सहा विमानतळांचे व्यवस्थापन करीत आहे. अहमदाबाद, लखनऊ आणि मंगळूरु मधील तीन विमानतळ अदानी समूहाकडून आधीच सुरू असून गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि जयपूर मधील तीन विमानतळ लवकरच त्यांच्याकडे हस्तांतरित होतील.
 • अदानी ग्रुप नवी मुंबई येथेही विमानतळ उभारणार असून त्यांनी 2024 पर्यंत नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे.

 

 3. राजनाथ सिंह यांनी एआय आधारित तक्रार विश्लेषण अ‍ॅप “सीपीजीआरएएमएस” सुरू केले

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_60.1

 • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंग टूल्सचा वापर करून तक्रारी नोंदवण्यासाठी सीपीजीआरएएमएस हा मोबाइल अनुप्रयोग (अ‍ॅप) सुरु केला आहे.
 • सरकारकडे येणाऱ्या तक्रारींचे निवारण सुधारण्यासाठी ही पहिली एआय-आधारित प्रणाली आहे.
 • या अ‍ॅपचा एक भाग म्हणून विकसित केलेले एआय टूलमध्ये तक्रारीची सामग्री समजून घेण्याची क्षमता आहे ज्यामुळे खोट्या अथवा फसव्या तक्रारींना आळा बसणार आहे आणि तक्रारींचे योग्य निराकरण होणार आहे.

 

 4. मंडुवाडीह रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस करण्यात आले

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_70.1

 • उत्तर-पूर्व रेल्वेने (एनईआर) उत्तर प्रदेशमधील मंडुवाडीह रेल्वे स्थानकाचे नाव बनारस असे ठेवले. रेल्वे मंडळाने नवीन नावासाठी होकार दिल्यानंतर एनईआरने  नवीन फलक बनवून ‘बनारस’ असे नाव लिहिले.
 • या नवीन फलकावर हिंदी, संस्कृत, इंग्रजी आणि उर्दू भाषेत बनारस असे लिहिलेले आहे.

 

राज्य बातम्या 

 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत ‘रुद्राक्ष’ केंद्राचे उद्घाटन केले

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_80.1

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय सहकार आणि अधिवेशन केंद्र “रुद्राक्ष” चे उद्घाटन केले.
 • महत्त्वाच्या बैठका/परिषदा घेण्यासाठी हे एक आकर्षक गंतव्यस्थान ठरणार असून शहरातील व्यापारीवर्ग आणि पर्यटक इकडे आकर्षिले जातील.
 • आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि अधिवेशन केंद्राला “रुद्राक्ष” असे नाव देण्यात आले असून या केंद्रात तब्बल 108 रुद्राक्ष आहेत. त्याचे  छत ‘शिव लिंग’ च्या आकाराचे आहे.
 • जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सीच्या मदतीने हे परिषद केंद्र बांधण्यात आले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • यूपी राजधानी: लखनऊ
 • यूपीच्या राज्यपाल: आनंदीबेन पटेल
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ

 

 6. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी बाईक टॅक्सी योजनेचे अनावरण केले

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_90.1

 • कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटक इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी योजना -2021 चे अनावरण केले.
 • ही स्वयंरोजगारास चालना देईल, पर्यावरणास अनुकूल वातावरणाला चालना देईल, इंधन संवर्धन करेल, सार्वजनिक वाहतूक बळकट करेल आणि संबंधित उद्योग स्थापन करण्यास प्रोत्साहित करेल.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवासासाठी सुरुवातीच्या आणि  शेवटच्या स्थानातील अंतर 10 किमीपेक्षा जास्त असू शकत नाही.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • कर्नाटक राजधानी: बेंगळुरू
 • कर्नाटकचे मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा
 • कर्नाटकचे राज्यपाल: थावरचंद गेहलोत

 

आंतरराष्ट्रीय बातम्या 

 7. चीनने जगातील पहिली व्यावसायिक लघु मॉड्यूलर अणुभट्टी बांधण्यास सुरूवात केली

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_100.1

 • चीनने देशातील हेनान प्रांतातील चांगझियांग अणु उर्जा संयंत्र येथे जगातील पहिली व्यावसायिक लघु मॉड्यूलर अणुभट्टी ‘लिंगलॉंग वन’  बांधण्यास अधिकृतपणे सुरुवात केली.
 • हा प्रकल्प चीनच्या  राष्ट्रीय  अणूउर्जा कॉर्पोरेशनच्या (सीएनएनसी) च्या लिंगलॉंग वन (एसीपी 100) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या अणुभट्टी मध्ये एक बहुउद्देशीय, 125 मेगावॅट क्षमतेची एसएमआर अणुभट्टी आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • चीन राजधानी: बीजिंग
 • चीन चलन: रेन्मिन्बी
 • चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

 

 8. इस्राईलमध्ये दूतावास उघडणारा युएई पहिला आखाती देश

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_110.1

 • द्विपक्षीय संबंधात सुधारणा करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्याच्या जवळपास एक वर्षानंतर संयुक्त अरब अमिरातीने इस्त्राईलमध्ये आपला दूतावास उघडला आहे.
 • असे करणारा तो पहिला आखाती देश ठरला असून हा दूतावास तेल अवीव स्टॉक एक्सचेंज इमारतीमध्ये स्थित आहे.
 • या समारंभास इस्रायलचे नवे अध्यक्ष आयझॅक हर्जोग उपस्थित होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • युएई राजधानी: अबु धाबी
 • युएई चलन: संयुक्त अरब अमिराती दिरहम
 • युएईचे अध्यक्ष: खलीफा बिन जायद अल नाह्यान
 • इस्त्राईलचे पंतप्रधान: नफ्ताली बेनेट

 

 9. सिंगापूरने जगातील सर्वात मोठे तरंगत्या सौर पॅनेल फार्मचे अनावरण केले

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_120.1

 • सिंगापूरने जगातील सर्वात मोठे तरंगते सौर पॅनेल फार्मचे अनावरण केले. हा प्रकल्प हवामान बदलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2025 पर्यंत सौरऊर्जेचे उत्पादन चौपट करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
 • पश्चिम सिंगापूरमधील जलाशयावर वसलेले, 60 मेगावॅट- सौर फोटोव्होल्टिक फार्म सेम्बकॉर्प इंडस्ट्रीजच्या संपूर्ण मालकीच्या सहाय्यक कंपनीने बनविले आहे.
 • या शेताचा विस्तार 45 फुटबॉल मैदाना इतका असून सिंगापूरच्या 5 जलशुद्धीकरण यत्रांना वीजपुरवठा करण्यास सक्षम आहे.
 • सोलर फार्ममुळे दरवर्षी सुमारे 32 किलोटन कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

 • सिंगापूर चलन: सिंगापूर डॉलर
 • सिंगापूरची राजधानी: सिंगापूर
 • सिंगापूरचे पंतप्रधान: ली हिसियन लूंग

 

कराराच्या बातम्या 

 10. आयएएचईने नोएडामध्ये सीएटीटीएस ची स्थापना करण्यासाठी न्यू साउथ वेल्स विद्यापीठाशी करार केला

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_130.1

 • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय महामार्ग अभियांत्रिकी (आयएएचई) ने उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे उन्नत परिवहन तंत्रज्ञान व प्रणाली  (सीएटीटीएस) स्थापन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स विद्यापीठाशी करार केला आहे.
 • रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका आभासी समारंभात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • सीएटीटीएस वाहतुकीच्या क्षेत्रात ऑस्ट्रेलिया आणि भारतमधील उद्योग आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्टता केंद्र असेल (सीओई) तसेच प्रगत परिवहन प्रणालीच्या नाविन्यपूर्ण, संशोधन आणि विकासासाठी संधी देखील प्रदान करेल.

 

क्रीडा बातम्या 

 11. बाबर आझम एकदिवसीय सामन्यांत सर्वात वेगवान 14 शतके ठोकणारा फलंदाज ठरला

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_140.1

 • पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने एजबॅस्टन येथे  झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी करत एकदिवसीय सामन्यांत सर्वात वेगवान 14 शतके ठोकणारा फलंदाज ठरला.त्याने आपली 14 शतके केवळ 81 सामन्यांत पूर्ण केली.
 • त्याने हाशिम अमला, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज एकदिवसीय सामन्यांत सर्वात वेगवान 14 शतके ठोकणारा फलंदाज ठरला मागे टाकले.

 

 12. गोकुळम केरळ एफसी एएफसी महिलांच्या क्लब अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_150.1

 • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) 2020-21 च्या एएफसी क्लब अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गोकुळम केरळ फुटबॉल क्लब ची निवड केली आहे.
 • बंगळुरु येथे 2019-20 च्या इंडियन वुमन लीग (आयडब्ल्यूएल) च्या अंतिम फेरीत क्रिफसा एफसीला पराभूत करून गोकुळम केरळ एफसी राष्ट्रीय विजेतेपद मिळविणारा केरळचा पहिला संघ ठरला होता.

 

निधन बातम्या 

 13. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_160.1

 • तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन झाले आहे. ‘तमस’, ‘मम्मो’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘झुबैदा’, ‘बधाई हो’ आणि दैनिक धारावाहिक ‘बालिका वधू’ इत्यादी भूमिकांसाठी त्या प्रसिद्ध होत्या.
 • 2020 साली आलेला झोया अख्तर दिग्दर्शित ‘घोस्ट स्टोरीज‘ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_170.1

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_190.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Daily Current Affairs In Marathi-16 July 2021 | महत्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी-16 जुलै 2021_200.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.