दैनिक चालू घडामोडी: 11 आणि 12 जुलै
चालू घडामोडी हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकता. चालू घडामोडींच्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, RRB अशा अनेक स्पर्धापरीक्षांमधे बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तर देता येतात आणि ते पण खूप कमी वेळात आणि तो वेळ आपण दुसऱ्या प्रशांसाठी लावता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्यला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.
येथे आम्ही सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन समस्यांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला 11 आणि 12 जुलै 2021चे सर्व महत्वाचे चालू घडामोडी पाहुयात.
राज्य बातम्या
1. भारताच्या पहिल्या क्रिप्टोगॅमिक उद्यानाचे उत्तराखंडमध्ये उद्घाटन
- उत्तराखंडमधील देहरादूनच्या देवबन भागात सुमारे 50 वेगवेगळ्या प्रजातींसह भारताच्या पहिल्या क्रिप्टोगॅमिक उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.
- हे उद्यान 9000 फुटांवर स्थित असून याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अनूप नौटियाल यांच्या हस्ते करण्यात आले.
- क्रिप्टोगॅमे म्हणजे “लपलेले पुनरुत्पादन” याचा अर्थ असा होतो की बियाणे, फुले तयार होत नाहीत. क्रिप्टोगॅम्स बिगर-बियाणे रोपांचे प्रतिनिधित्व करतात. एकपेशीय वनस्पती, ब्रायोफाईट्स (मॉस, लिव्हरवोर्ट्स), लिकेन, फर्न आणि बुरशी हे क्रिप्टोगॅमची उदाहरणे आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- उत्तराखंडच्या राज्यपाल: बेबी राणी मौर्य
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री: पुष्करसिंग धामी
2. नागपूर येथे भारतातील पहिल्या खासगी एलएनजी सुविधेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नागपूर येथे भारताच्या पहिल्या खासगी द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
- नागपूर जबलपूर महामार्गाजवळील कामठी रस्त्यावरील आयुर्वेदिक औषधे तयार करणाऱ्या वैद्यनाथ आयुर्वेदिक समूहाद्वारे या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बातम्या
3. ट्विटरने विनय प्रकाश यांची निवासी तक्रार अधिकारी म्हणून नियुक्ती केली
- ट्विटरने विनय प्रकाश यांचे नाव निवासी तक्रार अधिकारी (आरजीओ) म्हणून निश्चित केले आहे. पेजवर दिलेला ईमेल आयडी वापरुन वापरकर्ते विनय प्रकाश यांच्याशी संपर्क साधू शकतात.
- याआधी ट्विटरने कॅलिफोर्नियास्थित जेरेमी केसल यांची नियुक्ती भारतासाठी नवीन तक्रार निवारण अधिकारी म्हणून केली होती.
- भारतातील नवीन आयटी नियमांनुसार 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या सोशल मिडिया कंपनीने मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि तक्रार निवारण अधिकारी या तीन प्रमुख कर्मचार्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे आणि हे तिन्ही कर्मचारी भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
4. इथिओपियाच्या निवडणुकीत अॅबी अहमद यांचा विजय
- मागील महिन्यात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत इथिओपियाचे विद्यमान पंतप्रधान अॅबी अहमद यांचा विजय झाला असून ते दुसऱ्या पंचवार्षिक कार्यकालाची सुरुवात करतील.
- अॅबी अहमद यांच्या प्रोस्पॅरिटी पार्टी या पक्षाने 436 पैकी 410 जागांवर विजय मिळवत एकतर्फी विजयाची नोंद केली.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- इथिओपिया राजधानी: अदिस अबाबा
- इथिओपिया चलन: इथिओपियन बीर
अर्थव्यवस्था बातम्या
5. निर्मला सीतारमण यांनी तिसर्या जी -20 वित्त मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती दर्शविली
- इटलीच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आलेल्या तिसऱ्या जी -20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर्स (एफएमसीबीजी) बैठकीत भारताच्या केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारमण यांनी आभासी पद्धतीने उपस्थिती दर्शविली.
- दोन दिवस चाललेल्या या बैठकीत जागतिक आर्थिक जोखीम आणि आरोग्यविषयक आव्हाने, कोव्हीड-19 महामारीतून उभारी घेण्यासाठी धोरणे, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, शाश्वत वित्त व वित्तीय क्षेत्र या सह विविध विषयांवर चर्चा झाली.
- श्रीमती सीतारमण यांनी आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या तीन उत्प्रेरकांसाठी इटलीने दाखविलेल्या सजगतेबद्दल त्या देशाचे कौतुक केले.
- ही तीन उप्रेरके म्हणजे डिजिटलीकरण, हवामान बदल कृती आणि शाश्वत पायाभूत सुविधा.
महत्त्वाचे दिवस
6. 11 जुलै: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस
- आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
- वाढत्या लोकसंख्येच्या परिणामाबद्दल आणि जनतेत लिंग समानता, कुटुंब नियोजनाचे महत्त्व, दारिद्र्य, माता आरोग्य, मानवी हक्क इत्यादी विषयांबद्दल जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- 2021 ची संकल्पना: “कोव्हीड-19 महामारीचा प्रजनन क्षमतेवर होणारा परिणाम”
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवसाची पार्श्वभूमी:
- 1989 साली संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या कार्यकारी मंडळाने 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जाच्या वर गेल्याच्या स्मरणार्थ 11 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस म्हणून आयोजित करण्याचे ठरवले.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने डिसेंबर 1990 मध्ये ठराव क्रमांक 45/216 पारित करून या दिनाची औपचारिक सुरुवात केली. 11 जुलै 1990 रोजी हा दिवस 90 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रथम आयोजित करण्यात आला.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
- संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या कार्यकारी संचालिका: नतालिया कनेम
- संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी स्थापना: 1969
7. 12 जुलै: जागतिक मलाला दिन
- युवा कार्यकर्त्या मलाला यूसुफजईचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 12 जुलैला जागतिक मलाला दिन म्हणून घोषित केले आहे. जगभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी मलाला युसूफजईचा जन्मदिन मलाला दिन म्हणून साजरा केला जातो.
- 9 ऑक्टोबर 2012 रोजी मलालाला जाहीररीत्या मुलींच्या शिक्षणाची वकिली केल्याबद्दल तालिबानी अतिरेक्यांनी डोक्यात गोळी घातली होती पण या हल्ल्यातून ती बचावली.
- तरुण मुलींना शाळेत जाण्यास मदत करण्यासाठी तिने मलाला फंड ही एक ना-नफा संस्था स्थापन केली आणि “मी आहे मलाला” नावाच्या पुस्तकाचे सह-लेखन केले.
मलालाला मिळालेले इतर सन्मान आणि पुरस्कार:
- 2012 -पाकिस्तान सरकारने पहिला राष्ट्रीय युवा शांतता पुरस्कार.
- 2014 – वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार मिळविणारी सर्वात तरुण व्यक्ती ठरली.
- 2015- ‘ही नेम्ड मी मलाला’ माहितीपट ऑस्करसाठी निवडण्यात आला होता.
- 2019- जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन – संयुक्त राष्ट्र
- मलाला यांना मानद कॅनेडियन नागरिकत्व देखील देण्यात आले आहे आणि कॅनडामधील हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधणारी ती सर्वात तरुण व्यक्ती बनली आहे.
- ‘वी आर डिसप्लेस्ड’ – दुसरे पुस्तक.
क्रीडा बातम्या
8. विम्बल्डन अजिंक्यपद स्पर्धा 2021: विजेत्यांची संपूर्ण यादी
- पुरुष गटात नोवाक जोकोविचने विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात मट्टेओ बेरेटेटिनीचा 6-7 (4-7), 6-4, 6-4, 6-3 असा पराभव करत आपले सहावे विम्बल्डन विजेतेपद आणि 20 वा ग्रँडस्लॅम करंडक जिंकला.
- या विजयासह जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासह 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी केली.
- विविध श्रेणींमध्ये विजेत्यांची संपूर्ण यादी:
क्र. | श्रेणी | विजेता | उपविजेता |
---|---|---|---|
1. | पुरुष एकेरी | नोवाक जोकोविच (सर्बिया) | मट्टेओ बेरेटिनी (इटली) |
2. | महिला एकेरी | अॅशलेह बार्टी (ऑस्ट्रेलिया) | करोलना प्लिस्कोव्ह (झेक प्रजासत्ताक) |
3. | पुरुष दुहेरी | निकोला मेक्टिय आणि मेटे पेव्हिए | मार्सेल ग्रॅनोलॉरर्स आणि होरासिओ झेबेलॉस |
4. | महिला दुहेरी | हिसिए सु-वेई आणि एलिस मर्टेन्स | वेरोनिका कुदेरमेटोवा आणि एलेना वेस्निना |
5. | मिश्र दुहेरी | नील स्कूप्सकी आणि डिजायरा क्रॅव्हझिक | जो सॅलिसबरी आणि हॅरिएट डार्ट |
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:
- विम्बल्डन चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी एक आहे, ज्यात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनचा देखील समावेश आहे.
- लंडनमधील विंबल्डन ऑल इंग्लंड क्लबमध्ये 1877 पासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
9. अर्जेंटिनाने ब्राझीलला नमवत कोपा अमेरिका 2021 चषक जिंकला
- रिओ दि जानेरो मधील मराकाना स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने नेमारच्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव करत कोपा अमेरिका 2021 चषक जिंकला.
- कोपा अमेरिका ही दक्षिण अमेरिकेच्या फुटबॉल संघ कॉन्मेबॉलच्या वतीने आयोजित पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची 47 वी आवृत्ती होती. 1991 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा प्रेक्षकांविना भरविण्यात आली.
10. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी 7 सदस्यीय कार्य गटाची स्थापना केली
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्थानिक खेळाडूंना भरपाई पॅकेज आणि देशांतर्गत क्रिकेटच्या इतर बाबींचा विचार करण्यासाठी सात सदस्यीय कार्य गट स्थापना केली आहे.
- कोव्हीड-19 महामारीमुळे स्थगित झालेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमुळे झालेल्या नुकसानाचा खेळाडूंना योग्य मोबदला देण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आला आहे.
गटाचे सदस्य
- रोहन जेटली (उत्तर विभाग)
- युधवीर सिंग (मध्य विभाग)
- जयदेव शाह (पश्चिम विभाग)
- देवजित सैकिया (उत्तर-पूर्व विभाग)
- अविशेक डालमिया (पूर्व विभाग)
- संतोष मेनन (दक्षिण विभाग)
- मोहम्मद अझरुद्दीन (दक्षिण विभाग)
11. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू महमूदुल्लाहने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
- हरारे स्पोर्ट्स क्लब येथे बांगलादेशच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या दरम्यान बांगलादेशचा क्रिकेटपटू महमूदुल्लाह रियादने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
- 2009 मध्ये बांगलादेशच्या वेस्ट इंडिज दौर्यामध्ये महमूदुल्लाने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
12. समीर बॅनर्जीने विम्बल्डन कनिष्ठ पुरुष वर्गाचे जेतेपद पटकावले
- ऑल इंग्लंड क्लबमध्ये भरविण्यात आलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ वर्गातील विम्बल्डन चे जेतेपद भारतीय-अमेरिकी समीर बॅनर्जीने पटकावले.
- त्याने अमेरिकेच्याच व्हिक्टर लिलोव्हचा 7-5, 6-3 असा पराभव केला.
निधन बातम्या
13. महान आयुर्वेद चिकित्सक डॉ पी के वॉरियर यांचे निधन
- आयुर्वेदामध्ये जगभरात सर्वात प्रतिष्ठित नाव असलेले भारताचे महान आयुर्वेद चिकित्सक डॉ पी के वॉरियर यांचे निधन झाले आहे. ते 100 वर्षांचे होते.
- केरळमधील कोटकक्कल येथे असलेल्या आरोग्यसेवा आर्य वैद्य शाळाचे मुख्य चिकित्सक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त होते.
- डॉ. वॉरियर यांना 1999 साली पद्मश्री आणि 2010 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्मृतीपर्वम या त्यांच्या आत्मचरित्राला 2009 साली केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार बातम्या
14. सय्यद उस्मान अझर मकसुसी यांना ‘कॉमनवेल्थ पॉईंट्स ऑफ लाइट’ पुरस्कार प्राप्त
- हैदराबादमधील सामाजिक कार्यकर्ते सय्यद उस्मान अझर मकसुसी जे “भुकेला धर्म नसतो [हंगर हॅज नो रिलीजन]” या कार्यक्रमाद्वारे दररोज हजारो भुकेल्यांना अन्न दान करतात.
- त्यांच्या या मोहिमेसाठी त्यांना युकेच्या प्रतिष्ठित कॉमनवेल्थ पॉईंट्स ऑफ लाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुस्तके आणि लेखक
15. पंतप्रधान मोदी यांना ‘श्री गुरु गोबिंद सिंह यांचे रामायण’ ची प्रथम प्रत सुपूर्द
- प्रख्यात वकील केटीएस तुलसी यांच्या माता दिवंगत बलजित कौर तुलसी यांनी लिहिलेल्या “श्री गुरु गोबिंद सिंहजी यांचे रामायण” या पुस्तकाची पहिली प्रत भारताचे प्रतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. हे पुस्तक इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्सने प्रकाशित केले आहे.
- त्याशिवाय पंतप्रधानांनी छत्तीसगडचे कॉंग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार केटीएस तुळसी यांच्या गुरबानी वाणीतील पठणाचे लोकार्पण करण्यात आले.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा