Table of Contents
वनस्पतींचे वर्गीकरण: आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य
वनस्पतींचे वर्गीकरण – महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वनस्पतींचे वर्गीकरण या घटकावर प्रश्न विचारल्या जातात. आगामी आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा Topic आहे. आज आपण या लेखात वनस्पतींचे वर्गीकरण व त्यावरील काही प्रश्न – उत्तरे पाहणार आहोत.
वनस्पतींचे वर्गीकरण : विहंगावलोकन
वनस्पतींचे वर्गीकरण : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | सामान्य विज्ञान |
उपयोगिता | आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | वनस्पतींचे वर्गीकरण |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो? |
|
वनस्पतींचे वर्गीकरण
सृष्टी : वनस्पती
- पेशीभित्तिकायुक्त दृश्यकेंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला ‘वनस्पती’ म्हणून ओळखले जाते.
- वनस्पती हरितद्रव्यांच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत.
- वनस्पतीशास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पतीसृष्टीचे दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला गेला.
वनस्पतींचे वर्गीकरण
- सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत, हे विचारात घेतले जाते.
- त्यानंतर, पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्थांचे असणे किंवा नसणे विचारात घेतले जाते. वनस्पतींमध्ये बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो
- शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात.
- वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि बिजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबिजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात.
अबीजपत्री वनस्पती :
1.थॅलोफायटा (Thallophyta)
- या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात.
- मूळ-खोड-पाने-फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या, हरितद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल (Algae) म्हणतात.
- एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात.
- उदा. स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम, इत्यादी. यातील काही वनस्पती गोड्या तर काही खारट पाण्यात आढळतात.
- या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतूरूपी असते.
- ह्याच गटात हरीतद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व व बुरशांचा स्वतंत्रपणे समावेश होतो, त्यास कवके (Fungi) असे म्हणतात.
(थॅलोफायटा वनस्पती)
2. ब्रायोफायटा (Bryophyta)
- ह्या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात.
- त्या निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात.
- यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते.
- ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते.
- या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.
- पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात.
- उदा. मॉस (फ्युनारिआ), मर्केशिया, अॅन्थॉसिरॉस, रिक्सिया, इत्यादी.
(ब्रायोफायटा वनस्पती)
3. टेरिडोफायटा (Pteridophyta)
- या वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात, पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात.
- यांना फुले फळे येत नाहीत.
- त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते.
- उदा., फर्न्स नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया, – टेरीस, एडीअँटम, इक्विसेटम, लायकोपोडियम, इत्यादी.
- या वनस्पतींमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते.
(टेरिडोफायटा वनस्पती)
बीजपत्री वनस्पती :
ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात, त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात. यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजतांना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो. बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे ह्या वैशिष्ट्यांवरून बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग आहेत.
1. अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)
- अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक असतात.
- या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात.
- पानांचा मुकुट तयार झालेला असतो.
- या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात.
- यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos – न झाकलेले/अनावृत्त, Sperm- बीज.
- उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.
(अनावृत्तबीजी वनस्पती)
2.आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)
- या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत.
- फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात.
- या बियांवर आवरण असते.
- Angios – Cover म्हणजे आवरण, sperm – बी.
- ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात, तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.
प्रश्न – उत्तरे
Q1. स्ट्रॉबेरी हे कोणत्या प्रकारचे फळ आहे?
Ans – अॅग्रीगेट
Q2. वनस्पतींना द्विनामपद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केली ?
Ans – कार्ल्स लिनीयस
Q3. कोणते निळे-हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायुचे स्थिरीकरण करते व भातशेताची सुपीकता वाढवते ?
Ans – नॉसटॉक
Q4.खालीलपैकी कोणता कॅटायन वनस्पतीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतो?
Ans – K+
Q5.. टॅक्सानॉमी हा शब्द कोणी दिला?
Ans – डिकॅन्डोल
Q6.. ‘ड्रासेरा’ वनस्पती, ही कोणत्या वर्गामध्ये आहे ?
Ans – कीटकभक्षक वनस्पती
Q7. पाण्यात वाढणाऱ्या, परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
Ans – स्पायरोगायरा
Q8. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था, बिजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात.
Ans – टेरीडोफायटा
Q9.अमरवेल ही कोणती वनस्पती आहे ?
Ans – खोडावर वाढणारी परजीवी
Q10. वनस्पती वर्गीकरणातील पायाभूत घटक कोणता ?
Ans – स्पीशीज
Q11. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती कोणी शोधुन काढली ?
Ans – बेनथम आणि हुकर
Q12. आवृत्तबीजी वनस्पतीवर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती आहे ?
Ans – वोल्फीया
Q13. वनस्पती पेशीत कोणत्या ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते ?
Ans – रायबोझोमस्
Q14. नेचे कोणत्या गटात येतात?
Ans -टेरीडोफायटा
Q15. सूर्यफूल ही कोणती वनस्पती आहे ?
Ans – द्विबीजपत्री
Q16. ब्रायोफायटा कोणत्या बाबतींत टेरिडोफायटा पेक्षा वेगळेअसतात ?
Ans – बिगर वाहिनीयुक्त
Q17.कोणते शेवाळ ‘अगार’ नावाच्या पदार्थाचे व्यावसायिक उत्पादनाकरिता वापरतात ?
Ans – लाल शैवाळ
Q18. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत ?
Ans – द्विवार्षीक
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.