Table of Contents
भारताच्या पंचवार्षिक योजना: आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य
भारताच्या पंचवार्षिक योजना– महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पंचवार्षिक योजनेवर (Five Year Plans of India) प्रश्न विचारल्या जातात. आगामी आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा Topic आहे. आज आपण या लेखात भारताच्या पंचवार्षिक योजना व त्यावरील काही प्रश्न – उत्तरे पाहणार आहोत.
भारताच्या पंचवार्षिक योजना: विहंगावलोकन
भारताच्या पंचवार्षिक योजना : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
विषय | भारतीय अर्थव्यवस्था |
उपयोगिता | आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी |
लेखाचे नाव | भारताच्या पंचवार्षिक योजना |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो? |
|
भारताच्या पंचवार्षिक योजना
भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अत्यंत कमी कृषी उत्पादन, औद्योगिक क्षेत्राचा अल्प विकास आणि फाळणी मुळे निर्माण झालेली सुरक्षेची समस्या या पार्श्वभूमीवर भारताने आर्थिक विकासाचा कोणता मार्ग अवलंबवावा यावर स्वातंत्राच्या आधीपासून चर्चा-विनिमय घडत होते. भांडवली अर्थव्यवस्थेत झालेल्या प्रचंड हानीमुळे आणि देशातील नेत्यांवर असलेल्या समाजवादाच्या प्रभावामुळे भारताने नियोजन पूर्वक विकासाचा मार्ग अवलंबला. या लेखात आपण 1951 पासून सुरु झालेल्या पंचवार्षिक योजनांचा आढावा घेणार आहोत.
योजना |
प्रतिमान/ अध्यक्ष |
लक्ष्य वाढ (%) |
वास्तविक वाढ (%) |
मुख्य भर / घोषवाक्य |
वैशिष्ट्ये |
पहिली योजना
1951-56 |
प्रतिमान- हेरॉल्ड डोमर | 2.1 | 3.6 | कृषी क्षेत्र |
|
दुसरी योजना
1956-61 |
प्रतिमान- पी. सी. महालनोबिस | 4.5 | 4.1 | जड व मूलभूत उद्योग |
|
तिसरी योजना
1961-66 |
प्रतिमान-पी. सी. महालनोबिस | 5.6 | 2.7 | कृषी व मूलभूत उद्योग |
|
चौथी योजना
1969-74 |
प्रतिमान-धनंजय गाडगीळ | 5.7 | 2 | घोषवाक्य – स्थैर्यासह आर्थिक विकास साधणे |
|
पाचवी योजना
1974-78 |
प्रतिमान-अॅलन मान व अशोक रुद्र | 4.4 | 4.8 | दारिद्र्य नर्मूलन व स्वावलंबन |
|
सहावी योजना
1980-85 |
प्रतिमान-अॅलन मान व अशोक रुद्र | 5.2 | 5.54 | दारिद्र्य नर्मूलन व रोजगार निर्मिती |
|
सातवी योजना
1985-90 |
प्रतिमान-ब्रह्मानंद – वकील | 5 | 6 | उत्पादक रोजगार निर्मिती |
|
आठवी योजना
1992-97 |
प्रतिमान-राव- मनमोहन /LPG | 5.6 | 6.8 | मानवी विकास |
|
नववी योजना
1997-2002 |
अध्यक्ष –आय.के.गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी | 6.5 | 5.5 | घोषवाक्य – सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक विकास |
|
दहावी योजना
2002-07 |
अध्यक्ष – अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग | 8 | 7.8 | कृषी क्षेत्र- अर्थव्यवस्थेचे प्रेरक बळ आणि गाभा क्षेत्र |
|
अकरावी योजना
2007-12 |
अध्यक्ष- मनमोहन सिंग
प्रतिमान – पुरा |
9 | 8.2 | घोषवाक्य – जलद,शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी |
|
बारावी योजना
2012-17 |
अध्यक्ष –मनमोहन सिंग (2017 पर्यंतच) | 8 | 7.4 | घोषवाक्य – जलद,शाश्वत आणि अधिक समावेशक वृद्धी |
|
योजना अवकाश / योजना सुट्टी – तीन वार्षिक योजना (स्वावलंबन योजना)
कार्यकाल – 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969
अध्यक्ष –इंदिरा गांधी
प्रतिमान-पी. सी. महालनोबिस
महत्त्वाच्या घडामोडी –
रुपयाचे अवमूल्यन (1966) -36.5%
पंजाब-हरियाणा ची निर्मिती (1966)
हरितक्रांतीची सुरुवात
एचवायव्हीपी कार्यक्रम (1966-67) – तांदूळ, गहू, मका, ज्वारी, बाजरी या पिकांसाठी
सरकती योजना –
कार्यकाल – 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980
अध्यक्ष – मोरारजी देसाई आणि चरणसिंग
प्रतिमान – गुन्नार मिर्डाल प्रतिमान
महत्त्वाच्या घडामोडी –
जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना (1978)
कामासाठी अन्न योजना (1979)
वार्षिक योजना- स्वावलंबन योजना
कार्यकाल – 1 एप्रिल 1990 ते 31 मार्च 1991 आणि 1 एप्रिल 1991 ते 31 मार्च 1992
अध्यक्ष –चंद्रशेखर आणि नरसिंहराव
महत्त्वाच्या घडामोडी –
एलपीजी मॉडेल स्वीकारले आणि नवीन औद्योगिक धोरण
हर्षद मेहता घोटाळा (1991)
सेबी ची स्थापना (1992)
रुपयाचे अवमूल्यन
रुपया चालू खात्यावर अर्ध-परिवर्तनीय
प्रश्न – उत्तरे :
Q1.खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा राहिला ?
(a) नववी पंचवार्षिक योजना
(b) दहावी पंचवार्षिक योजना
(c) अकरावी पंचवार्षिक योजना
(d) बारावी पंचवार्षिक योजना
Q2.’गरीबी हटाव’ (दारिद्य निर्मूलन) ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?
(a) तिसऱ्या योजनेत
(b) चौथ्या योजनेत
(c) पाचव्या योजनेत
(d) सहाव्या योजनेत
Q3. पाचव्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसूदा कोणी तयार केला होता ?
(a) सी.सुब्रममिअम
(b) अशोक मेहता
(c) मोहन धारिया
(d) डी.पी.धर
Q4. आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे?
(a) समाजवादी समाज रचना निर्माण करणे
(b) आर्थिक विषमता कमी करणे
(c) विभागीय समतोल
(d) औद्योगिकरण
Q5. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेशी महालनोबिस प्रकल्प प्रारूप संबंधित होते?
(a) पहिली पंचवार्षिक योजना
(b) दुसरी पंचवार्षिक योजना
(c) तिसरी पंचवार्षिक योजना
(d) चौथी पंचवार्षिक योजना
Q6. नव्या भारताबाबत पंडीत नेहरूंचा दृष्टीकोण खालीलपैकी कोणत्या तत्त्वांशी संबंधित आहे?
(a) भांडवलशाहीचे तत्त्व
(b) समाजवादाचे तत्त्व
(c) लष्करशाहीचे तत्त्व
(d) लोकशाही समाजवादाचे तत्त्व
Q7. कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या 25% पेक्षा जास्त होता?
(a) सहावी पंचवार्षिक योजना
(b) सातवी पंचवार्षिक योजना
(c) आठवी पंचवार्षिक योजना
(d) वरील सर्व
Q8. दुसऱ्या पंचवार्षिक योजनाकाळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही?
- रुरकेला (ओरिसा)
- भिलाई (छत्तिसगड)
- दुर्गापूर (प. बंगाल)
- बोकारो (झारखंड)
(a) फक्त 1 आणि 2
(b) फक्त 3
(c) फक्त 4
(d) फक्त 1 आणि 4
Q9. बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (2012-17) मुख्य उद्दिष्ट कोणते होते?
(a) आर्थिक वृद्धि व स्थिर विकास साधणे
(b) जलद वृद्धि व विकास साधणे
(c) जलद व अधिक सर्वसमावेशक वृद्धि साधणे
(d) जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वद्धि साधने
Q10. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या काळात राबवली गेली ?
(a) 1950-1955
(b) 1951-1956
(c) 1941-1946
(d) 1961-1966
Solutions
S1. Ans (c)
Sol. अकराव्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा होता. अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2007–2012 हा होता.
S2. Ans (c)
Sol.गरीबी हटाव (दारिद्य निर्मूलन) ची घोषणा 5 व्या योजनेत करण्यात आली होती.
5 वी योजना – 1974-1978.
S3. Ans (d)
Sol.पाचव्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसूदा डी.पी. धर यांनी तयार केला होता.
S4. Ans (a)
Sol. आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट- समाजवादी समाज रचना निर्माण करणे.
S5. Ans (b)
Sol. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेशी महालनोबिस प्रकल्प प्रारूप संबंधित होते.
S6. Ans (d)
Sol. नव्या भारताबाबत पंडीत नेहरूंचा दृष्टीकोण लोकशाही समाजवादाचे तत्त्व या तत्त्वांशी संबंधित आहे.
S7. Ans (d)
Sol.
S8. Ans (c)
Sol. रुरकेला (ओरिसा),भिलाई (छत्तिसगड),दुर्गापूर (प. बंगाल) – दुसरी पंचवार्षिक योजना.
बोकारो (झारखंड) – चौथी पंचवार्षिक योजना.
S9. Ans (d)
Sol.बाराव्या पंचवार्षिक योजनेचे (2012-17) मुख्य उद्दिष्ट – जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वद्धि साधने.
S10. Ans (b)
Sol. भारताची पहिली पंचवार्षिक योजना 1951-1956 या काळात राबवली गेली.
Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.